‘अडोस पडोस — चित्र नाट्य खेळ’ हा एक विलक्षण कमालीचा प्रयोग १५ सप्टेंबरला पुण्याच्या झपुर्झा आर्ट म्युझियममध्ये झाला. ‘चित्र नाट्य खेळ’ असं याकरिता कारण यात चित्र, नाटक दोन्ही आहेत आणि हा खरच वेगवेगळ्या जागी एखाद्या खेळासारखा खेळला जातो. हा प्रयोग विलक्षण होता तो यासाठी कारण यातून आपल्याला स्थिर चित्रांमधला किवा स्थिर फोटोज मधला अर्थ कळू लागतो. आपण फोटोज कडे जास्त जिव्हाळ्याने बघू लागतो. इंद्रजीत खांबे हे भयंकर कल्पना शक्ती असलेले नव्या पिढीतले फॉटोग्राफर आहेत. ते मोबाईल, कॅमेरा अगदी सर्व माध्यमांचा वापर करून फोटोग्राफी करत असतात. त्यांच्या फोटोजचे विषयसुद्धा मजेशीर असतात. आपल्या रोजच्या आयुष्यातले, घरात त्यांच्या मुलांचे, आपल्या संस्कृतीतल्या वेगवेगळ्या गोष्टींचे…
Author: शिवम पंचभाई
आपली मराठी रंगभूमी ही खऱ्या अर्थाने परिपूर्ण म्हणून नावाजली जाते ती, स्थानिक भाषेत वेगवेगळ्या भाषेत होणाऱ्या हौशी नाटकांमुळे! अशा वेगवेगळ्या भागात होणाऱ्या हौशी नाटकांची एक घट्ट मूठ बांधली जाते ती महाराष्ट्रात होत असलेल्या वेगवेगळ्या नाट्य महोत्सवांमुळे! अशाच काही नामांकित नाट्य महोत्सवांपैकी एक असलेला नाट्य महोत्सव म्हणजे कुडाळचा ‘बाबा वर्दम स्मृती नाट्य महोत्सव’! हौशी आणि प्रायोगिक रंगभूमीवर कोकण विभागात अविरतपणे २७ वर्षांपासून बाबा वर्दम थिएटर ही संस्था मोलाचं काम करते आहे. इथे आयोजित होत आलेल्या नाट्य महोत्सवाने महाराष्ट्रात आपले एक वेगळं स्थांन तयार केलं आहे. कुडाळची परिपूर्ण संस्कृती, आयोजकांतर्फे होणारं उत्तम व्यवस्थापन आणि प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद ही या महोत्सवाची विशेष ओळख!…
आज मराठी व्यावसायिक नाटक जगभरात मान वर करून चालू शकतं याचं मुख्य श्रेय जातं मराठी नाट्य निर्मात्याना! त्यांच्या योगदानामुळेच मराठी रंगभूमी एवढी बहरू शकली आणि त्यांच्याचमुळे नाटकाचा प्रपंच मोठा होत गेला. या मुख्य नाटक निर्मात्यांपैकी एक म्हणजे ‘भद्रकाली प्रॉडक्शन्स’! मच्छिंद्र कांबळी यांच्या पुढाकाराने २७ जुलै १९८२ साली भद्रकालीची सुरुवात सुंदर तळाशिलकर लिखित आणि रमेश रणदिवे दिग्दर्शित ‘चाकरमानी’ या भद्रकालीची निर्मिती असलेल्या पहिल्या नाटकाने रवींद्र नाट्य मंदिरला झाली होती. मच्छिंद्र कांबळी स्वतः एक उत्तम कलाकार होतेच, त्याचबरोबर प्रेक्षकांना कोणती गोष्ट कशी सांगितली गेली पाहिजे याचं अचूक गणित त्यांना गवसलं होतं. यंदा भद्रकाली ४२ वा वर्धापन दिन साजरा करत आहे. या ४२…
मराठी रंगभूमीला नाट्य स्पर्धांची मोठी परंपरा लाभली आहे. मनोरंजन क्षेत्रात काम करणारे आघाडीचे कलाकार याच स्पर्धांमधून पुढे येतात आणि पुढच्या पिढीला आदर्श वाटेल असं काम करत जातात. या कलाकारांना घडवण्यात नाट्य स्पर्धांचा मोठा वाटा असतो. उत्तम कलाकृती आणि उत्तम कलाकार निवडून त्याना रंगमंच उपलब्ध करून देण्याचं महत्वाचं काम नाट्य स्पर्धा करत असतात. अशाच नामांकित स्पर्धांपैकी एक असणारी स्पर्धा म्हणजे ‘सुवर्ण कलश राज्यस्तरीय खुली एकांकिका स्पर्धा’! अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या बोरीवली शाखेतर्फे दरवर्षी ही स्पर्धा आयोजित केली जाते. हे स्पर्धेचे १० वे वर्ष आहे. राज्यभरातून मोठ्या संख्येने कलाकार यात सहभागी होतात. दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा ‘सुवर्ण कलश २०२४’ या स्पर्धेचं…
[UPDATE] महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत घेण्यात येणाऱ्या, राज्य नाट्य स्पर्धेतील प्रवेशिका सादर करण्यास ५ सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ करण्यात आली आहे. सर्वसामान्य मराठी माणसात एक कलाकार लपलेला असतो. रोजच्या धावपळीत, जगण्याच्या धडपडीत हा कलाकार कुठेतरी सुटत जातो. पण या लपलेल्या कलाकाराला प्रोत्साहन देण्यासाठी आणि नव्या दमाच्या कलाकारांना रंगमंच उपलब्ध करून देण्यासाठी १९६१ पासून महाराष्ट्र सरकार राज्यातील सर्व कलांचे जतन, संवर्धन व त्यांमध्ये नवनवीन संशोधन व्हावे या उद्देशाने नाट्य, नृत्य, संगीत, लोककला, साहित्य व चित्रपट या कलांना समृद्ध आणि सक्षम करण्यासाठी सतत कार्यरत आहे. याच उद्देशाने शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचनालयाच्या वतीने दि. १५ नोव्हेंबर २०२४ पासून सुरू होणाऱ्या होणाऱ्या हौशी मराठी,…
एरव्ही कठीण वाटणारं, समजायला अवघड दिसणारं ‘विज्ञान’ जर आपल्याला नाटकाच्या अनुभवातून बघायला मिळालं तर? कल्पना मजेशीर वाटते ना!? सर्वसामान्य लोकांच्या दैनंदिन आयुष्यात विज्ञानाचा प्रचार आणि प्रसार व्हावा या उद्देशाने मराठी विज्ञान परिषद गेल्या ५८ वर्षांपासून वेगवेगळ्या पद्धतीने काम करत आहे. मराठी लोकांच्या मनात वैज्ञानिक दृष्टिकोन जागरूक करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. त्यांच्याच पुढाकाराने, २०१५ साली मराठी विज्ञान परिषदेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाचा मुहूर्त साधून, समाजाच्या सर्व घटकापर्यंत विज्ञान सुलभतेने पोहोचवता यावे या उद्देशाने ‘राज्यस्तरीय विज्ञान एकांकिका स्पर्धा’ ही अभिनव कल्पना सुरू करण्यात आली. गेली ९ वर्ष ही स्पर्धा सातत्याने सुरू आहे. यंदाचं हे स्पर्धेचं १० वं वर्ष आहे. राज्यस्तरीय विज्ञान एकांकिका…