Author: साक्षी जाधव

मी साक्षी जाधव. मी पत्रकारतेच्या पदवीचे शिक्षण घेत आहे. रंगभूमीसाठी काम करणे माझी आवड आहे. नाटकांना प्रकाशयोजना करणे आणि नवनवीन गोष्टी शोधून काढण्यात खूप उत्साह वाटतो.

कलाकार रंगमंचावर एकटा असून प्रेक्षकांना खिळवून ठेवत असेल तर तो ताकदीचा कलाकार मानला जातो. एकपात्री किंवा द्विपात्री नाट्य सादर करताना कलाकाराचा लक्षवेधी अभिनय असावा लागतो. अशाच कलाकारांच्या अभिनयाची कसोटी पाहण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ, पनवेल आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पनवेल शाखा तसेच पुरस्कृत भाजपा सांस्कृतिक सेल-उत्तर रायगड आयोजित करत आहेत ‘एकपात्री व द्विपात्री अभिनय स्पर्धा’ वर्ष तिसरे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद आणि श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ, पनवेल हे दरवर्षी वेगवेगळ्या नाट्यस्पर्धांचे आयोजन करतात.  ‘रंगमंच आमचा कलाविष्कार तुमचा’ अस म्हणून अटल करंडक एकांकिका स्पर्धा, मायबोली एकपात्री अभिनय स्पर्धा, एकपात्री आणि…

Read More

रंगभूमीवर अनेक नाटक अजरामर झाली. अनेक नाटक त्यातील कलाकार महाराष्ट्रात सर्वाधिक प्रयोग करून लोकांच्या मनात रुजू झाले. असेच एक बहारदार विनोदी नाटक म्हणजे सही रे सही. या नाटकाने अनेक कलाकार घडवले. सही रे सही या नाटकाचा पहिला प्रयोग १५ ऑगस्ट २००२ ला झाला आणि यंदाच्या वर्षी हे नाटक २० वर्ष पूर्ण करत आहे. सही रे सही चा प्रवास लता नार्वेकर यांच्या श्रीचिंतमणी निर्मित केदार शिंदे लिखित आणि दिग्दर्शित ‘ सही रे सही’ नाटकाचा पहिला प्रयोग १५ ऑगस्ट २००२ रोजी झाला आणि सही रे सहीला सुरुवात झाली. हे नाटक उभे राहिले ते भरत, अंकुश आणि केदार शिंदे यांच्या मैत्रीमुळे. एका सही…

Read More

राज्यस्तरीय प्रायोगिक रंगभूमी सातत्याने नवी उमेद घेऊन प्रेक्षकांसाठी मेजवानी घेऊन येते. अनेक प्रयत्नातून नवीन विषय रंगमंचावर आणले जातात आणि प्रेक्षक मायबापकडून भरभरून प्रतिसाद मिळतो. असेच एक अनोखे नाटक शिव रणभूमी प्रशांत प्रतिष्ठान निर्मित माळरानावर फुललेलं नाटक ‘आय. एम. पुंगळ्या शारुक्या आगीमहुळ’ हे प्रेक्षकपसंती मिळवत आहे. फासे पारधी समाजावर आधारित या नाटकाचे कथानक एका जोडप्याच्या आयुष्यावर लिहिले आहे. प्रेक्षक मागणीनुसार या नाटकाचे पुन्हा प्रयोग होणार आहेत. मंगळवार २ ऑगस्ट  सायं. ४.३० वाजता गडकरी रंगायतन, ठाणे  मंगळवार १६ ऑगस्ट सायं. ४.०० वाजता विष्णुदास भावे, वाशी आय. एम. पुंगळ्या शारूक्या आगीमहुळ हे नाटक म्हणजे मोकळ्या माळरानावर संसार थाटलेल्या जोडप्याची कथा आहे. फासेपारधी समाजातील…

Read More

एखाद्या कादंबरीवर आधारित नाटक करताना अवाढव्य कथेला कमीत कमी वेळात मांडताना लेखकाचे कस लागतात आणि नाटकाची संहिता लिहताना कथेचा आणि पात्रांचा पूर्ण अभ्यास करावा लागतो. या दोन्ही गोष्टींचा विचार भद्रकाली प्रोडक्शन्सने केला. भद्रकाली प्रोडक्शन्स घेऊन येत आहेत दृष्टी आणि कृष्णकिनारा अशी दोन कादंबरीवर आधारित नाटके तसेच भद्रकाली प्रोडक्शन्स निर्मित संगीत देवबाभळी नाटकाचा अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे. भद्रकाली प्रोडक्शन्स यंदाच्या वर्षी या संस्थेला ४० वर्ष पूर्ण झाली. ‘चाकरमानी’ या नाटकापासून सुरुवात केली आणि दरवर्षी वेगवेगळ्या विषयावर भाष्य करणारे नाटक करत या वर्षी नवीन नाटकांची निर्मिती करण्यात येणार आहे पण ती नाटके कोणती असणार हे अजून गुपित असून याबद्दल प्रेक्षकांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्सुकता दिसून येते.…

Read More

मुले आई-वडिलांची म्हातारेपणातील काठी असतात तसेच आई-वडील मुलांच्या तरुण वयातील आधारस्तंभ. तरुण पिढीला नवनवीन संधी मिळतात. भविष्यात ते त्यांचे मार्ग स्वतःच निवडून अनेक छंद, कला जोपासत स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा प्रयत्न करतात. अनेक पालकांना वाटत असते की आपल्या पाल्यांनी यश गाठावे, आर्थिकदृष्ट्या कणखर व्हावे यासाठी व्यावसायिक क्षेत्र जसे डॉक्टर, इंजिनिअर, वकील, सी.ए, इत्यादी. निवडून त्यातच करिअर करावे. पण जेव्हा मुलांची इच्छा आणि पालकांची अपेक्षा विरुद्ध असतात तेव्हा पालक आणि पाल्यांमध्ये मतभेद निर्माण होऊ लागतात. पालकांनी मुलांना कला जोपासून आवडत्या क्षेत्रात यश मिळवण्यासाठी सहकार्य करावे, असा संदेश देणारे ‘जोकर’ सादर करीत आहे ‘अनुमित नाट्य संस्था’. जोकर ‘जोकर’ ही एकांकिका २०१९ या…

Read More

अनेक नाटकांचे महोत्सव सुरू असताना अभिजात नाट्य संस्था प्रस्तुत करत आहे आगळा-वेगळा महोत्सव. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त नाट्य व संगीत क्षेत्रातील विविध मान्यवर दिग्गज कलाकारांच्या उपस्थितीत रंगणार आहे २४ तासांचा महामहोत्सव! ‘अभिजात’ नाट्यसंस्था या महोत्सवाचे आयोजन करत असून हा महोत्सव दोन सत्रात होणार आहे. अभिजात नाट्य महोत्सव — महामहोत्सवाचे वेळापत्रक अभिजात नाट्य महोत्सव — महामहोत्सवात सादर होणारी नाटकं या महोत्सवात ‘टिळक आणि आगरकर’ व ‘होय मी सावरकर बोलतोय!’ यांचे सादरीकरण होणार आहे. या दोन ऐतिहासिक नाटकांच्यामध्ये मनोरंजन म्हणून ‘वासूची सासू’ हे विनोदी नाटक सादर करण्यात येणार आहे. हा महोत्सव म्हणजे प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी कलाकारांची कसोटी असणार आहे. टिळक आणि आगरकर लोकमान्य बाळ गंगाधर…

Read More

कलेचा आधारस्तंभ म्हणजे रंगमंच. सूचक प्रकाशयोजनेत डोळ्यासमोर घडणाऱ्या गोष्टी प्रेक्षकांच्या मनाला भुरळ पाडतात. पण नाटक ही अशी कला आहे जी पाहताना जेवढी गुंतवून ठेवते तेवढीच ऐकताना विलीन करून घेते. ‘एका अंध प्रेक्षकालासुद्धा नाटकाचा आस्वाद घेता आला पाहिजे’, असं म्हणतात. नाटकाच्या सादरीकरणासह महत्वाची असते संहिता. संहितेत प्रत्येक पात्र वेगळे असते आणि प्रत्येक पात्राची गोष्ट असते. संहिता किंवा गोष्ट ऐकताना आपल्यासमोर उभे राहणारे दृश्य हे आपण केलेले दिग्दर्शन असते. आपण आपल्या रोजच्या जीवनाशी कथेचा संबंध जोडण्यास सुरुवात करतो. अशीच उत्तम संहिता नाटकाची शक्ती असते. संहितेचे वाचन जेवढे रम्यक तेवढेच आपण कथेत हरवले जातो. कथा वाचनाला कलेचा दर्जा लाभल्यामुळे दरवर्षप्रमाणेच या वर्षी iapar…

Read More

विश्वात घडणाऱ्या अनेक घटना आणि घडामोडींचा बुद्धिनिष्ठ पद्धतीने केला जाणारा अभ्यास म्हणजे विज्ञान. मुंबईमधील मराठी विज्ञान परिषद प्रामुख्याने विज्ञानाचा मराठी भाषेतून प्रसार करण्यासाठी, विज्ञानाचे जीवनात महत्व वाढविण्यासाठी आणि वैज्ञानिकदृष्ट्या प्रगती करण्याच्या उद्देशाने वेगवेगळे उपक्रम राबवत असतात. कार्यशाळा घेणे, अभ्यासक्रम घेणे, शिष्यवृत्ती योजना देणे, अनेक स्पर्धा आणि कार्यक्रमांचे आयोजन करणे, त्यामार्फत अनेक पुरस्कार आणि पारितोषिके देणे असे अनेक उपक्रम राबविले जातात. २०१५ पासून मराठी विज्ञान परिषद राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा आयोजित करत आहेत. यंदाच्या वर्षीसुद्धा ही स्पर्धा ‘शैक्षणिक’ म्हणजेच इयत्ता आठवी ते बारावी आणि ‘खुल्या’ अशा दोन गटांत होणार आहे. स्पर्धेच्या अटी कथेमध्ये वैज्ञानिकाने केलेले संशोधन, त्यामध्ये आलेल्या अडचणी यांवर विशेष भर…

Read More

नवरा आणि बायकोचे नाते म्हंटले की प्रेम, आपुलकी, राग, रुसवा, विश्वास अशा अनेक भावनांचा ताळमेळ असतो. असेच एक रंगभूमीवर गाजलेले जोडपे गौरव कुलकर्णी आणि आदिती कुलकर्णी. ‘तू म्हणशील तसं’ नाटकातील मिस्टर आणि मिसेस कुलकर्णी यांच्या नात्याची चर्चा प्रेक्षकांमध्ये दिसते. या नाटकात, दिलखुलास जगणारा गौरव आणि नेमकेपणाने जगणारी आदिती यांचे प्रोफेशनल आणि वैयक्तिक आयुष्यात उडणारे खटके आणि त्यानंतर होणारा गोड शेवट आनंददायी पद्धतीने मांडले आहे. आधुनिक युगातील जोडप्यांवर आणि त्यांच्या नात्यातील चढ-उतारांवर भाष्य करणारी अनेक नाटकं आहेत, परंतु, या नाटकाने स्वत:चे वेगळेपण जपत प्रयोगांची यशस्वी घोडदौड सुरू ठेवली आहे. खुशखबर अशी की, गौरी प्रशांत दामले निर्मित, पुणे टॉकीज प्रस्तुत, संकर्षण कऱ्हाडे लिखित…

Read More

‘दिल दोस्ती दुनियादारी’ मालिकेतून घराघरात पोहचल्यानंतर ‘शी’ वेबसिरीजमध्ये काम केले आणि आता ‘अनन्या’ चित्रपटात दिसणारा लाडका अभिनेता सुव्रत जोशी. या अभिनेत्याने तरुण नाट्य कलावंतांसाठी आणि अभिनय क्षेत्रात रस असलेल्या मुलांसाठी ‘अभिनयासाठी आजीवन साधन’ अशी कार्यशाळा म्हणजेच वर्कशॉप सुरु केले आहे. या कार्यशाळेत २९ जून ते ४ जुलैपर्यंत नवीन कलाकार घडविण्यात येणार आहेत. या ६ दिवसांत कार्यशाळेची वेळ सकाळी ८ ते दुपारी १२ वाजेपर्यंत ठेवण्यात आली आहे आणि या कार्यशाळेची फी ६०००/- रुपये आकारण्यात आली आहे. या कार्यशाळेत आवाज, वाणी, शरीर यांचा उत्तम वापर आणि त्यावरील नियंत्रणाबद्दल शिकवण्यात येणार आहे. भावनांवर आणि श्वासावर प्रभुत्व मिळवणे आणि अभिनेता बनण्याच्या प्रवासात उपयोगी ठरणारी…

Read More