Author: साक्षी जाधव

मी साक्षी जाधव. मी पत्रकारतेच्या पदवीचे शिक्षण घेत आहे. रंगभूमीसाठी काम करणे माझी आवड आहे. नाटकांना प्रकाशयोजना करणे आणि नवनवीन गोष्टी शोधून काढण्यात खूप उत्साह वाटतो.

एकांकिका स्पर्धांना मिळणारा प्रतिसाद हळूहळू वाढत चालला आहे. अशीच एक मोठा प्रतिसाद मिळवणारी स्पर्धा म्हणजे कमल वसंत जाधव करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा. यंदाच्या वर्षी या स्पर्धेचे आयोजन छात्रशक्ती आणि तांडव थिएटरमधील तरुण मुलांनी नव्या ऊर्जेने केले आहे. हे या स्पर्धेचे ४ थे वर्ष असून दरवर्षी जवळपास १०० संघ स्पर्धक असणारी ही नाट्यस्पर्धा. या स्पर्धेची सुरुवात डॉ. जितेंद्र वसंत जाधव यांनी त्यांच्या आई कमल वसंत जाधव यांच्या नावाने केली. “मी एक रंगकर्मी आहे. अनेक वर्ष अभिनेते, दिग्दर्शक म्हणून रंगभूमीची सेवा केली. वैद्यकीय जीवनात रुळत असताना मला पुन्हा रंगभूमीची ओढ निर्माण झाली आणि म्हणून नव्या रंगकर्मींसाठी एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्याचे ठरवले. रंगभूमीकडून…

Read More

“लख लख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया, झळाळती कोटी ज्योती या हां हां हां…” या गाण्यातील या ओळीप्रमाणे महाराष्ट्रातील नाटय संस्कृती तेजोमय आहे. त्यातील अनेक कलाकार तारे ही नाटकाची दुनिया उजाळतात. प्रत्येक कलाकाराची नाटकाची आवड जपण्यासाठी अनेक संस्था पुढाकार घेत कलाकारांमध्ये ज्योत प्रज्वलित करून नाट्य संस्कृतीचा वारसा चालवतात. पण हा वारसा चालू राहण्यासाठी तो नवीन पिढ्यांमध्ये रुजवणे देखील महत्वाचे असते. यासाठी अनेक बाल-कलाकारांची कला क्षेत्रात जडणघडण होते. अशाच बाल कलाकारांसाठी सातत्याने उपक्रम राबविणारी नागपूरमधील बालरंगभूमी परिषद. दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षी या परिषदेने स्वर्गीय पुरुषोत्तम दारव्हेकर स्मृती प्रित्यर्थ बालनाट्य लेखन स्पर्धा आयोजित केली आहे. बालनाट्य लेखन स्पर्धा बालरंगभूमी परिषद २०१८ पासून नाट्य लेखन…

Read More

मराठी नाट्य सृष्टीला पु. ल. देशपांडे, प्रा. लक्ष्मण देशपांडे, मधुकर टिल्लू, सदानंद चांदेकर, सुमन धर्माधिकारी, सुषमा देशपांडे असे दिग्गज कलावंत लाभले, ज्यांनी एकपात्री नाट्यकलेला उंची मिळवून दिली. ताकदीचा कलाकार ही दाद मिळवण्यासाठी अनेक वर्ष प्रामाणिक अभिनयाची आवड जपावी लागते, कष्ट घ्यावे लागतात आणि सध्याच्या युवा कलाकारांचा अभिनय क्षेत्रात रस निर्माण होत आहे. अशा कलाकारांसाठी बालगंधर्व कला अकादमी परिवार आयोजित करत आहे राज्यस्तरीय एकपात्री अभिनय स्पर्धा. बालगंधर्व कला अकादमी अनेक वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या बालगंधर्व कला अकादमीने अनेक कलाकार घडवले. या अकादमीमार्फत थिएटर, दूरदर्शन याबद्दल शिक्षण दिले जाते. तसेच, अभिनय, नृत्य अशा अनेक कलागुणांना जपले जाते. कलाकारांसाठी अनेक कार्यशाळा घेण्यात येतात. यावर्षी…

Read More

रंगभूमीने आजवर कोणताही मतभेद न करता प्रामाणिक काम करणाऱ्यांना उंची गाठण्यास मदत केली आहे. अशाच एका संस्थेने सातत्याने रंगमंचाची सेवा करत पुन्हा एका नव्या नाटकाची निर्मिती केली. १७ आणि १८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७.०० वाजता आसक्त कलामंच, पुणे प्रस्तूत करत आहे दिनकर दाभाडे यांच्या कादंबरीवर आधारित ‘व्हाया सावरगाव खुर्द’. व्हाया सावरगाव खुर्द (Via Savargaon Khurd) नाटकाला ग्रामपंचयातीच्या निवडणूकीची पार्श्वभूमी आहे. दोन राजकीय गटातील सत्ता संघर्ष नाटकाचा केंद्रबिंदू आहे. ग्रामपंचयातीच्या निवडणूका या एका विषयावर सगळी पात्र एकमेकांशी बांधली गेली आहेत. ‘व्हाया सावरगाव खुर्द’ ह्या कादंबरीतील १९ स्वगतांचा हा एक कोलाज आहे. पात्रांच्या मनसोक्त आणि बेधडक बोलण्यातून नाटकाचं कथानक पुढे पुढे सरकत…

Read More

नाटक हे कधीच कार्यक्रम म्हणून न पाहता एक प्रयोग म्हणून पाहिले जाते कारण कार्यक्रम एकदाच होतात. त्यात काही फारसे बदल होत नाही पण प्रयोग हे अनेक होतात आणि त्यात सातत्याने बदल होत असतात. असेच ७ वर्षांपासून ‘नाट्य प्रयोग’ आपल्यासाठी एकपात्री आणि द्विपात्री अभिनय स्पर्धा भरवते तर यंदाच्या वर्षी सह आयोजन आमची वसई यांनी केले आहे. एकपात्री अभिनय स्पर्धेची फिरता चषक पद्धत असून यंदाच्या वर्षी या स्पर्धेची प्रवेश करण्याची अंतिम तारीख २५ सप्टेंबर आहे. रंगमंचावर अभिनयाचा कस, सर्वांना खेळवून ठेवण्याची वृत्ती या स्पर्धेत महत्वाची ठरेल. स्पर्धेसाठी आजपर्यंत प्रमोद शेलार, संकेत तांडेल, मनीष सोपारकर, दिनेश शिंदे, विनोद देहरे रमाकांत वाकचौरे असे उत्तम…

Read More

मराठी रंगभूमीच्या कित्येक वर्षांच्या परंपरेत एकांकिका आणि नाट्यवाचनाचे महत्व आपण जाणून आहोत. प्रत्येक कलाकार रंगभूमीच्या संस्कारात वाढत असतो. नवनवीन गोष्टी शिकत असतो. काही कलाकारांनी नाट्यवाचन आणि एकांकिकेचा प्रयोग करण्याचे योजिले आहे. अनाम प्रस्तुत करत आहे २ नाट्यवाचन आणि १ एकांकिकेची मेजवानी. ११ सप्टेंबर २०२२ रोजी सायंकाळी ६.०० वाजता सुदर्शन रंगमंच, शनिवार पेठ, पुणे येथे सोहळा पार पडणार आहे. अनाम संस्था अक्षय व्यवहारे आणि कौस्तुभ सहस्त्रबुद्धे हे संस्थेचे प्रमुख असून संस्थेची सुरुवात २०१९ साली झाली. अनाम ची सुरुवात यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून झाली आणि आता रंगभूमीच्या सेवेत तत्पर आहेत. अनाम लघुपट क्षेत्रात काम करत असून अनाममधून ‘पाहुणचार’ या एकांकिकेची निर्मिती करण्यात आली.…

Read More

मराठी संगीत नाटक ही मराठी रंगभूमीने जागतिक रंगभूमीला दिलेली देणगी आहे, असे मानले जाते. विष्णूदास भावे यांनी मराठी रंगभूमीचा श्रीगणेशा केला तर संगीत नाटकाचा लौकिक अर्थाने प्रारंभ अण्णासाहेब किर्लोस्कर यांच्या संगीत शाकुंतल (१८८०) या नाटकाने झाला. गायनाचार्य भास्करबुवा बखले, गोविंदराव टेंबे, मास्टर कृष्णराव, पं. राम मराठे, पं. जितेंद्र अभिषेकी, छोटा गंधर्व, केशवराव भोळे असे दिग्गज संगीतरचनाकार (संगीतकार) लाभल्याने मराठी नाट्यसंगीत समृद्ध झाले. अशा आपल्या संस्कृतीचा वारसा पुढे वृद्धिंगत करण्यासाठी बालगंधर्व कला अकादमी परिवार आयोजित करत आहे राज्यस्तरीय संगीत एकांकिका स्पर्धा. हे या स्पर्धेचे पहिलेच वर्ष. ‘रंगभूमीवरील नवे पर्व, लवकरच संगीत बालगंधर्व’ ही संकल्पना माननीय श्री. किशोर कुमार यांनी संपूर्ण महाराष्ट्रासाठी…

Read More

कोरोना महामारीनंतर पुन्हा आंतरमहाविद्यालयीन नाट्य स्पर्धेला सुरुवात झाली आहे. हिंदी आणि उर्दू भाषेची नाटकं सादर करण्यासाठी मानाची मानली जाणारी मोठी स्पर्धा म्हणजे इप्टा (Indian People’s Theatre Association) संस्थेतर्फे आयोजित आंतरमहाविद्यालयीन नाट्य स्पर्धा (Inter Collegiate Drama Competition – ICDC). यावर्षी या स्पर्धेचे ४९ वे वर्ष आहे व ते जोमाने सादर करण्याची विद्यार्थ्यांमध्ये तयारी दिसत आहे. ICDC 2022 ची प्राथमिक फेरी १२, १३ आणि १४ सप्टेंबर रोजी होणार असून अंतिम फेरी २० सप्टेंबरला होईल. प्रवेश करण्याची अंतिम तारीख ५ सप्टेंबर आहे. IPTA Mumbai इंडियन पीपल्स थिएटर असोसिशनची स्थापना मुंबईमध्ये २५ मे १९४३ रोजी मारवारी शाळेत झाली. स्वातंत्र्य पूर्वीच्या काळात रंगभूमीसाठी काम करणारी…

Read More

Update: ६२ वी महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धा — हौशी मराठी नाट्य स्पर्धा २०२३-२०२४ महाराष्ट्र सरकार १९६१ पासून राज्यातील सर्व कलांचे जतन, संवर्धन व त्यांमध्ये संशोधन करण्यासाठी नाट्य, साहित्य, नृत्य, संगीत, लोककला व चित्रपट या कलांना समृद्ध आणि सक्षम करण्याचे व कलावंतांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर व्यासपीठ निर्माण करून सन्मान देण्याचे कार्य करीत आहे. यंदाच्या वर्षी महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेचे ६१ वे वर्ष आहे. नवीन वर्ष निमित्ताने नवीन नियमावली स्पर्धेसाठी तयार करण्यात आली आहे. राज्य नाट्य स्पर्धा – नियमावली व प्रवेश अर्ज ६१ वी राज्य नाट्य स्पर्धा २०२३ – माहिती व नियमावली (Rajya Natya Spardha Details) दरवर्षी अनेक नाट्य संस्था राज्य…

Read More

सध्या रंगभूमीवर बरीच नाटकं धुमाकूळ घालत आहेत. काही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत तर काहींना प्रेक्षकांच्या टीकांचे वार सहन करावे लागत आहेत. प्रेक्षकांसाठी खुशखबर म्हणजे या यादीत लवकरच अजून काही नाटकं सामील होणार आहेत. व्यावसायिक रंगभूमीवर सातत्याने नवनवीन लेखन दिग्दर्शन पहायला मिळते. यंदाच्या वर्षीही काही नवीन तर काही गाजलेली जुनी नाटकं पुन्हा नव्याने व्यावसायिक रंगभूमीवर सादर होणार आहेत. इब्लिस, चारचौघी, करायचं प्रेम तर मनापासून, संभ्रम ही नाटकं लवकरच रंगभूमीवर दिसणार आहेत. इब्लिस अद्वैत थिएटरला यावर्षी १६ वर्ष पूर्ण झाली आणि लवकरच इब्लिस या नाटकाचे नव्याने प्रयोग होणार आहेत. या नाटकाचे लेखन दिग्दर्शन मिलिंद शिंत्रे यांनी केले असून निर्माते राहुल भंडारे आहेत.…

Read More

गूढकथांचे दर्जेदार लेखन करणारे लेखक आणि नाटककार रत्नाकर मतकरी. नाटक, एकांकिका, बालनाट्य, कथा, गूढकथा, कादंबरी, ललित लेख, वैचारिक साहित्य प्रकारात लेखन करणारे साहित्यिक, रंगकर्मी, दिग्दर्शक, निर्माता आणि चित्रकार म्हणजे रत्नाकर मतकरी. रत्नाकर मतकरींनी बालनाट्य प्रकाराची निर्मिती केली तसेच झोपडपट्टीतील बालकलाकारांना घडवले. अनेक एकांकिका, बावीस नाटकं, २३ कथासंग्रह, तीन कादंबऱ्या, १२ लेखसंग्रह असा साहित्यांचा मोठा वारसा देऊ करणारे रत्नाकर मतकरी. Ratnakar Karandak 2022 Competition रत्नाकर मतकरी यांच्या गूढकथा वाचकांना अनेक रहस्यांचा प्रवास घडवतात. अशाच रहस्यमय गूढकथेवर आधारित एकांकिका स्पर्धा आयोजित करण्यात आली. ओम आर्ट्स आयोजित रत्नाकर करंडक २०२२ वर्ष पहिले. या स्पर्धेची मूळ संकल्पना भूषण देसाई यांची आहे. १७ जून ते…

Read More

मराठी नाट्यसृष्टीतील प्रत्येक नाटकाने प्रेक्षकांचे मनोरंजन केले, सामाजिक परिस्थितीची जाणीव करून दिली. असेच एक प्रसिद्ध नाटक ‘अधांतर’ पुन्हा रंगभूमीवर दिसणार आहे. यंदाच्या वर्षी या नाटकाला २५ वर्ष पूर्ण होत आहेत म्हणून या निमित्ताने अधांतरचे २५ प्रयोग होणार आहेत. या रौप्य महोत्सवाची निर्मिती प्रयोगशाळा करत असून नाटकमंडळी याचे सादरीकरण करणार आहेत. जयंत पवार लिखित आणि मंगेश कदम यांनी दिग्दर्शन केलेल्या नाटकातील जुने कलाकार पुन्हा पात्र साकारताना दिसणार? की नवीन कलाकार सहभागी होणार? हे लवकरच स्पष्ट होणार आहे. जयंत पवार जयंत पवार हे एक पत्रकार, मराठी नाटककार आणि नाट्यसमीक्षक होते. २९ ऑगस्ट, २०२१ रोजी दीर्घकालीन आजारामुळे त्यांचे दु:खद निधन झाले. पण त्यांनी…

Read More