महाविद्यालयाचे नवीन वर्ष सुरू होताच नवीन एकांकिकांच्या तालमीला सुरुवात होते. नव्या वर्षाचा नवा जल्लोष आणि जिंकण्याच्या उमेदीने स्पर्धेत भाग घेतला जातो. एकांकिका विश्व हे छोट्या मंचावरील मोठ्या स्वप्नांचे प्रतीक आहे. अवघ्या महाराष्ट्रात विविध भागात मानाच्या आणि उच्च पातळीवर राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा होत असतात. अशीच एक मुंबईतील दादरकरांची अमर हिंद मंडळ तर्फे आयोजित कै. आबा पडते राज्यस्तरीय मराठी एकांकिका स्पर्धा! अमर हिंद मंडळ (दादर) या साहित्य, कला, क्रीडा क्षेत्रात अग्रणी असलेल्या समाजसेवी संस्थेतर्फे रंगकर्मीना प्रोत्साहन देण्यासाठी ही एकांकिका स्पर्धा आयोजित केली जाते. यावर्षी ‘कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा २०२४’ ची प्राथमिक फेरी तालीम स्वरुपात शुक्रवार दि. १८ ते रविवार दि.…
Author: साक्षी जाधव
मराठी सिनेसृष्टीत ‘लेखक दिग्दर्शक अभिनेता आणि निर्माता’ अशी हरहुन्नरी ओळख असणारे कलाकार पुरुषोत्तम बेर्डे. प्रयोगशील, सर्वसामान्यांना तरीही रुचणारा आशय व सादरीकरण हे बेर्डे यांचे वैशिष्ट्य! ‘शेम टू शेम’, ‘हमाल दे धमाल’, ‘घायल’ असे अनेक लोकप्रिय चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणणारे पुरुषोत्तम बेर्डे यांची लेखणी पुस्तकरुपात त्यांच्या चाहत्यांसाठी उपलब्ध होणार आहे. अनघा प्रकाशन, ठाणे प्रस्तुत पुरुषोत्तम बेर्डे लिखित ६ नाटकांच्या पुस्तकांचे प्रकाशन होणार आहे. बुधवार दि. ४ सप्टेंबर २०२४ रोजी सायंकाळी ५ ते ८ दरम्यान जयंतराव साळगांवकर प्रायोगिक रंगमंच, यशवंत नाट्यगृह, माटुंगा येथे प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. १९८३ मध्ये त्यांनी लेखन-दिग्दर्शन केलेले ‘टूरटूर’ नाटक, ‘गांधी विरुद्ध सावरकर — एक चौकशी,…
मराठी नाटकांना उभारी देणारं एक सहज आणि सशक्त असं महत्त्वाचं माध्यम म्हणजे एकांकिका स्पर्धांचं विश्व! कॉलेजमधील कल्ला करणाऱ्या कलाकारांना रंगमंच उपलब्ध करून देणाऱ्या एकांकिका स्पर्धा… एक तासात अवकाशमय रंगमंचावरील उत्कृष्ट अनुभव देणारी एकांकिका. या एकांकिका विश्वात अनेक दिग्गज कलाकार घडले. अशीच एक मानाची एकांकिका स्पर्धा ‘इंडियन नॅशनल थिएटर’ आयएनटी आदित्य बिर्ला सेंटर फॉर परीमिंग आर्टस् (आयएनटी एबीसीपीए) आंतर महाविद्यालयीन एकांकिकाका स्पर्धा मुंबई शहरात होते. यंदा या स्पर्धेचे ४९ वे वर्ष आहे. स्पर्धेची प्राथमिक फेरी २४ ते २८ सप्टेंबेर दरम्यान होणार असून अंतिम फेरी १ ऑक्टोबर २०२४ रोजी होणार आहे. दरवर्षी मुंबईमधील अनेक महाविद्यालय या स्पर्धेतील सहभागातून नवनवीन नाट्यकृती घडवतात तसेच…
४,४४४ वा प्रयोग, ४ भूमिका आणि कलाकार मात्र एक…ही नाइंसाफी नाही तर, सहीची जादू आहे. १५ ऑगस्ट २०२४ रोजी बोरिवली येथील प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात भरत जाधव एंटरटेनमेंट निर्मित आणि केदार शिंदे लिखित व दिग्दर्शित ‘पुन्हा सही रे सही’ नाटकाचा ४,४४४ वा प्रयोग रंगणार आहे. या ऐतिहासिक दिवशी प्रेक्षकांच्या साक्षीने सही रे सही नाटक २२ वर्ष पूर्ण करत २३ व्या वर्षात पदार्पण करणार आहे. ‘सही रे सही’ची कारकीर्द १५ ऑगस्ट २००२ रोजी रंगमंचावर धुमाकूळ घालून इतिहास घडविणाऱ्या आणि आजच्या तारखेपर्यंत जगभरातील प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या ‘सही रे सही’ नाटकाचे रंगभूमीवर पदार्पण झाले. सलग १६ ते १७ वर्षे सही रे सहीच्या प्रयोगादिवशी नाट्यगृहाबाहेर…
जागतिक पातळीवर क्रीडा, कला क्षेत्रातील निरनिराळ्या आणि अविस्मरणीय प्रसंगांची नोंद होत असते. एखादी व्यक्ती किंवा संस्था विश्वविक्रम रचते आणि त्यापुढील पिढी ते विश्वविक्रम मोडून नवीन विश्वविक्रम रचतात. मराठी नाट्य सृष्टीतही १५ ऑगस्ट २०२४ रोजी ‘अलबत्या गलबत्या’ हे नाटक नवीन विश्वविक्रम रचणार आहे. Albatya Galbatya’s World Record: 6 Shows in a Single Day १२ मे २०१८ रोजी ‘अलबत्या गलबत्या’ हे नाटक रंगभूमीवर दाखल झालं आणि अमाप लोकप्रियता कमवत सहा वर्षे धूमधडाक्यात गाजलं. झी मराठी प्रस्तुत आणि अद्वैत थिएटर निर्मित या यशस्वी बालनाट्याने १५ ऑगस्ट २०१८ रोजी दादर येथील श्री शिवाजी मंदिर नाट्यगृहात एकाच दिवशी सलग ५ प्रयोग सादर करून विश्वविक्रम रचला…
भारताला नाट्यपरंपरेचा समृद्ध असा वारसा लाभलेला आहे. हा वारसा जोपासत, पुढील पिढीकडे सशक्तपणे संक्रमित करणे हे आपले कर्तव्य आहे. भविष्यातील पिढ्यांना उत्कृष्ट दर्जाचे नाट्य शिक्षण मिळावे यासाठी अनेक शिक्षणसंस्था कार्यरत आहेत. देशभरातील कानाकोपऱ्यात नवनवीन कलाकार उमलत असतात. परंतु, संधींची कमतरता आणि वाढती स्पर्धा या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी अभिनयाचे शास्त्रोक्त शिक्षण घेणे महत्त्वाचे आहे. देशभरातून, प्रसिद्धी व पैसा कमवण्याचे स्वप्न घेउन मुंबईत येणाऱ्या कलाकारांना असे प्रगल्भ शिक्षण मुंबई शहरातही मिळाले तर? होय, कारण क्रेसेंट थिएटर घेऊन आलंय ‘मुंबई स्कूल ऑफ ड्रामा’! Crescent Theatre’s Mumbai School of Drama नाटकांसाठी आणि रंगकर्मींसाठी व्यासपीठ उपलब्ध करुन देणे, या उद्देशाने क्रेसेंट थिएटर २०२१ सालापासून रंगभूमीसाठी…
मनोरंजन क्षेत्रात कलाकारांची फळी येते आणि जाते. वर्षानुवर्षे चुकत-शिकत कलाकारांच्या फळ्या तयार होतात. एक कलाकार म्हणून अस्तित्व निर्माण करताना वेगवेगळ्या भागांचा अभ्यास करणारी शैली कलाकाराच्या वैयक्तिक जीवनातही अंगवळणी पडते. अशीच एक नाट्यसृष्टी, सिनेसृष्टी, मालिका आणि वेब सिरीजमधून उभारी घेणारी तरुणी चंद्रलेखा जोशी. हल्लीच पहिला भाग पूर्णत्वास आलेली ‘तुमची मुलगी काय करते’ या मालिकेत पी.एस.आय. जमदाडेची भूमिका साकारणारी तसेच मल्हार आणि दिशा निर्मित ‘काळी राणी’ या व्यावसायिक नाटकात महत्वाचे पात्र साकारणारी चंद्रलेखा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. चंद्रलेखा मूळची डोंबिवली विभागातील आहे. बाबा (विवेक जोशी) नाट्य क्षेत्रात असल्यामुळे नाटकाची ओढ होती. तसेच लहान वयात अनेक नाटकांमध्ये महत्वाच्या भूमिका बजावत अभिनय क्षेत्रात पदार्पण…
|| जीवेची जीवलगे माझे कृष्णाई कान्हाई सांवळे डोळसे करुणा येऊ दे कांही || अशा अनेक अभंगातून जीवनाचे सार मांडणाऱ्या वारकरी संप्रदायातील महत्वाच्या संत कान्होपात्रा. कान्होपात्रेप्रमाणे वारीतील प्रत्येक वारकऱ्यांचा प्रवास एखाद्या जीवन प्रवासाप्रमाणे असतो. जीवनात समाधान प्राप्तीच्या ओढीने ही वारी सुरू होते. या वारीत कोणाची साथ महत्वाची याचे भान हवे तसेच समाधान आणि कर्माचे समतोल राखणे गरजेचे आहे. असाच मानवाच्या जीवनशैलीवर आधारित स्वेवन स्टुडिओज निर्मित जन्मवारी या दोन अंकी नाटकाने जय जय राम कृष्ण हरी म्हणत रंगभूमीवर पदार्पण केले आहे. जन्माच्या प्रवासात स्वतःचे समाधानी अस्तित्व शोधण्याची वारी दर्शविणाऱ्या ‘जन्मवारी’ या नाटकात दोन काळ दर्शवले आहे. नाटक १५ वे शतक आणि वर्ष…
मनोरंजन क्षेत्रात प्रतिभावान कलाकार म्हणून ओळख मिळवण्यासाठी अनेक पैलूंचा अभ्यास करणे गरजेचे असते. अशाच एका अभिनेत्री श्रद्धा हांडेने अलबत्या गलबत्या या नाटकामध्ये कन्याराजेची मुख्य भूमिका साकारत असताना थँक्स डियर नाटकाची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला. श्रध्दाला बालपणापासूनच अभिनयाची आवड होती टीव्हीवरील कलाकारांना पाहून अभिनय क्षेत्रात जाण्याची इच्छा निर्माण झाली. परंतु सुरुवातीला श्रद्धाने शिक्षणाला प्राधान्य दिले. उत्तमगुणांनी बारावी पास होऊन बिर्ला कॉलेजमध्ये मॅनेजमेंट क्षेत्रात पदवीधर झाली. श्रद्धा शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर असल्यामुळे अनेक नोकरीच्या संधी चालून येत होत्या परंतु अभिनय क्षेत्रातील आवड कायम ठेवत मंथन नाट्यशाळेतून प्रशिक्षण घेत अभिनयाचा प्रवास सुरू केला. सुरुवातीच्या काळात कल्याणला राहत असताना कॉलेज आणि नाटकाच्या प्रशिक्षणात तीन वर्ष…
मराठी रंगभूमीचे विस्तृत साम्राज्य जोपासणे ही सर्व रंगकर्मींची जबाबदारी आहे. या साम्राज्यात व्यवसायिक आणि प्रायोगिक नाटकांना प्राधान्य दिले असले तरी एकांकिका विश्व ही प्रथम पायरी असते. या विश्वात नाट्यकर्मींना संधी देण्यासाठी नवनवीन एकांकिका स्पर्धा आयोजित केल्या जातात. गेले २ वर्ष अशीच एक स्पर्धा लोकप्रिय होत आहे. चिंतामणी कलामंच आयोजित राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा ‘खासदार करंडक २०२३’ तसेच ‘नवरस राज्यस्तरीय एकपात्री अभिनय स्पर्धा २०२३’. यंदाचे वर्ष खासदार करंडक चे तिसरे तर ‘नवरस’ चे दुसरे वर्ष आहे. यावर्षी स्पर्धेची प्राथमिक फेरी होणार नसून लाईट-शो म्हणजेच अंतिम फेरी रंगीत प्रयोग होणार आहे. चिंतामणी कलामंच २०१८ साली ‘प्रथमेश पिंगळे’ यांनी सूरू केले. प्रथमेश पिंगळे हे…
मुंबईतील प्रसिद्ध एकांकिका स्पर्धांपैकी या ही स्पर्धेचे नाव आदराने घेतले जाते. पाण्याच्या समस्या दूर करून ‘पाणीवाली बाई’ अशी ओळख निर्माण करणाऱ्या एक समाजसेविका आणि गोरेगावच्या माजी आमदार माननीय मृणालताई गोरे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ गेली ४ वर्षे, मृणालताई नाट्यकरंडक ही खुली राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा आयोजित केली जाते. यंदाचे स्पर्धेचे ५ वे वर्ष असून या स्पर्धेचे आयोजन सोहम थिएटर्स अंतर्गत होणार आहे. सुदेश सावंत हे स्पर्धेचे आयोजन करत असून संतोष वाडेकर आणि गिरीश सावंत हे समन्वयक आहेत. प्रसिद्ध अभिनेते सुनील बर्वे हे या स्पर्धेचे मार्गदर्शन करणार असून प्रमोद शेलार आणि युवराज मोहिते हे सल्लागार आहेत. अनेक वर्षांपासून या स्पर्धेला जोरदार प्रतिसाद मिळत आहे.…
नाटकांमार्फत रंगभूमीवर अनेक समाज प्रबोधनात्मक विषयांची मांडणी केली जाते. राजकीय, सामाजिक आणि वैयक्तिक विषयांवर भाष्य केले जाते. दोन नेत्यांमधील वाद असो किंवा दोन घरातील वाद, तो सामाजिक विषयच समजला जात. पण, दोन लहान मुलांमध्ये झालेले वाद समाजिक विषयांचे कशाप्रकारे दार ठोठावते हे मांडण्यासाठी राखाडी स्टुडिओ व अमेय गोसावी निर्मित उच्छाद हे नाटक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. नाटकाचे शुभारंभाचे प्रयोग १२ व १३ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ७.३० वाजता द बेस, एरंडवणे, पुणे येथे होणार आहेत. ‘उच्छाद’ हे नाटक यास्मिना रेझा यांच्या ‘गॉड ऑफ कार्नेज’ या प्रसिद्ध फ्रेंच नाटकाचा निरंजन पेडणेकर यांनी केलेला मराठी अनुवाद आहे. मुलांच्या खेळीच्या वातावरणात एका मुलाकडून…