Author: रंगभूमी.com

ज्येष्ठ अभिनेते श्री. विक्रम गोखले यांनीही गरजू रंगकर्मींना मदत करण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी नाणे गावातील पौड जवळील स्वमालकीचा एक एकराचा प्लॉट महामंडळाच्या नावाने करून द्यायचा ठरवला आहे. आज त्याची बाजारभावानुसार किंमत ही २.५ कोटी रुपयांपेक्षा कमी नाही. या ठिकाणी महामंडळाने ज्येष्ठ व एकटे राहणाऱ्या कलावंताना आसरा आणि सहारा मिळावा म्हणून ज्येष्ठ कलावंतासाठी मोफत राहण्याची सोय करण्साठी सदर जागा विक्रम गोखले अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाला दान करून महामंडळाच्या नावाने करून देण्याची घोषणा केली आहे.ज्येष्ठ अभिनेते माननीय श्री. चंद्रकांत गोखले म्हणजेच श्री. विक्रम गोखले यांचे वडील स्वत:च्या कमाईतून काही पैसे भारतीय सैन्यदलाला दान करत असत. असाच मौल्यवान दानधर्माचा वारसा पुढे…

Read More

जत्रा भरणार म्हटलं की त्यामध्ये वैविध्यपूर्ण मनोरंजन तर आलंच पण याच जत्रेतून मनोरंजनासोबत गरजू कलाकारांसाठी मदत निधीसुद्धा उभारला जाणार असेल तर सद्य परिस्थितीमध्ये त्याहून चांगले काहीच नाही. अशीच एक जत्रा आजपासून पुढे ३ दिवस भरणार आहे. ‘एम्. डी. नाट्यांगण आणि थिएटर Hotspot’ च्या अंतर्गत तीन दिवसांचा “नाट्य जत्रा” हा कार्यक्रम YouTube च्या माध्यमातून पार पडणार आहे. या कार्यक्रमांतर्गत १० वेगवेगळ्या एकांकिका दाखविण्यात येणार आहेत.२८, २९, ३० मे, २०२० अशा तीन दिवसांमध्ये दाखवल्या जाणाऱ्या या अव्वल दर्जाच्या एकांकिका म्हणजे तमाम रसिक प्रेक्षकांसाठी एक सोहळाच आहे असं म्हणावं लागेल. या सोहळ्यामध्ये तुम्हीदेखील सहभागी होऊ शकता. फक्त प्रेक्षक म्हणून नाही तर रंगभूमीवर आलेले…

Read More

सकाळचं कोवळं ऊन अंगावर घेण्यासाठी अंगणात बसलेल्या गोदाआजीला तिच्या नातवानं, सुजीतनं फोन आणून दिला आणि फोनवरचं बोलणं ऐकून आजीनं ‘ माझा म्हादू..’ म्हणून मोठ्यानं हंबरडाच फोडला.तिच्या आवाजानं तिची मुलगी वनिता आणि सून सुनंदा हातातलं काम टाकून अंगणात पळत आल्या.शेजारीपाजारीपण तिथं जमा झाले.”सासूबाई, काय झालं?” सुनंदानं भांबावून विचारलं.”आता कसं आणि काय सांगू? माझा म्हादू गेला…” गोदाआजीनं सूर लावला.”काय ss ? माझा म्हादू दादा….असा कसा गं गेला?” वनितानं तिच्या सुरत सूर मिसळला.”ते विचारायचं राहून गेलं की बग…माझा भाचा म्हादू ..बॅरिस्टर होता की…असा कसा गेला.” आजीला धीर देण्यासाठी दोन-तीन बायका तिला खाली बसवून तिची पाठ थोपटू लागल्या.”बॅरिस्टर कुठं?म्हादू काका तर शिपाई होता ना?…

Read More

सोलापूरच्या रंगभूमीला सत्तर वर्षाची परंपरा आहे. सोलापूर हे गिरणगाव म्हणून ख्यातकीर्त असले तरी कलेची रुजवण येथे अमाप होती. शंभर वर्षापूर्वी मेकॅनिकी थियेटर व नूतन संगीत थियेटर या नावाची नाटकासाठी बांधलेली दोन सभागृहे येथे होती. नाटकाचा अर्थात संगीत नाटक व गद्य नाटकाचा खास एक प्रेक्षकवर्ग त्या काळी होता. किर्लोस्कर नाटक मंडळी, गंधर्व नाटक मंडळी, आनंद विकास मंडळी, शाहू नगरवासी या व्यावसायिक नाट्य संस्थांचे प्रयोग तेथे होत असत. तसेच आचार्य अत्रे, मामा वरेरकर, मो.ग. रांगणेकर यांचे नाट्य प्रयोगही हौशी रंगभूमीवर होत होते. प्रत्यक्ष रंगमंचावर सोलापूरातील काही कलाकार मंडळी एकत्र येऊन नाटकांचे प्रयोग करत होते.  १९४० च्या दरम्यान नवयुग नाट्य मंडळ, दत्त क्लब,…

Read More

नव्यानेच सुरू झालेल्या २०२० साली कोरोना या जागतिक महामारीची एकच अशी लाट आली की तिने अख्ख्या जगाला हादरवून सोडले. अजूनही कोरोनाचा धोका टळलेला नसताना आजही हा महाराक्षस गरीब जनतेचे बळी घेतच सुटला आहे. काल या जागतिक महामारीला बळी पडलेला बहुगुणी कलाकार म्हणजे ज्येष्ठ मराठी लेखक, दिग्दर्शक, पटकथाकार, अभिनेता, कादंबरीकार श्री. रत्नाकर मतकरी! काल दिनांक १७ मे रोजी रात्री साडे अकराच्या सुमाराला रत्नाकर मतकरी यांचे देहावसान झाले. गेले काही दिवस त्यांना अशक्तपणा जाणवत होता. चार दिवसांपूर्वी गोदरेज इस्पितळात चेक अप साठी ॲडमिट झाले असताना त्यांची कोविड टेस्ट करण्यात आली, जी पाॅझिटीव असल्याचे लक्षात आले. त्यानंतर उपचारांसाठी त्यांना सेवन हिल्स रुग्णालयात हलवण्यात…

Read More

आपला भारत देश अनेक अष्टपैलू रत्नांची खाण आहे असे म्हटले तर मराठी रंगभूमीसुद्धा अशा अनेक नाट्यकलावंतांनी भरलेली नानाविध रत्नांची खाण आहे, म्हटले तर वावगे ठरू नये. दिवसागणिक समृद्ध होत जाणाऱ्या मराठी रंगभूमीला सत्तरच्या दशकात असाच एक चमचमता हिरा सापडला. तो हिरा म्हणजे रीमा लागू!सिद्धहस्त लेख, नाटककार कै. वसंत कानेटकर यांचे नाटक लेकुरे उदंड झाली यात त्यांनी अभिनय करण्यास सुरुवात केली. १९६० च्या दशकातील ते नाटक. त्यावेळी त्या आपलं शालेय शिक्षण नुकतंच पुरं करत होत्या. पुण्यातील हुजूरपागा शाळेतून शिक्षण घेत असतानाच रीमा लागू यांनी अभिनयाचे धडे गिरवण्यास सुरुवात केली होती. १९५८ मध्ये भडभडे कुटुंबात जन्मलेल्या रीमाताईंना अभिनयाचं बाळकडू त्यांच्या आई मंदाकिनी…

Read More

काही दिवसांपूर्वीच आम्ही “साहित्य सहवास” या नवीन सदराशी तुमचा परिचय करून दिला. या सदराला तुम्ही दिलेल्या भरघोस प्रतिसादाबद्दल सर्वप्रथम आम्ही तुमचे खूप आभारी आहोत. साहित्य सहवास या सदारांतर्गत आमच्यापर्यंत पोहोचलेल्या विविध कथा आणि लेख आम्ही तुमच्यापर्यंत वेबसाईटद्वारे तर पोहोचवणार आहोतच. पण आज एका नव्या उपक्रमाशी तुमची भेट करून देताना आम्हाला खूप हर्ष होत आहे. त्यामुळे तुम्हा सर्वांचं रंगभूमी.com Podcast मध्ये स्वागत आहे!Podcast म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर श्रुतिका! आता तुम्ही कुठेही आणि कधीही विविध कथा, लेख, कविता रंगभूमी.com Podcast च्या माध्यमातून ऐकू शकता. तुमच्यातीलच कित्येक वाचकांनी आणि रंगभूमी.com च्या टीममधील सदस्यांनी लिहिलेले वेगवेगळे लेख आणि कथा तुम्ही येथे ऐकू शकणार…

Read More

शनिवारच्या सायंकाळी ज्येष्ठ कलावंतांच्या जोडीने काही विशेष लेख घर बसल्या ऐकायला मिळणं प्रेक्षकांसाठी खुशखबरच! त्यातही महेश एलकुंचवार, चंद्रकांत कुलकर्णी, सचिन खेडेकर अशी दिग्गज नावे असली तर त्याहून अधिक चांगले काही असूच शकत नाही.आज १६ मे, संध्याकाळी ७.३० वाजता, Wide Wings Media च्या Facebook Page वर सादर होणार आहे Wide Wings Media आणि आविष्कार संयोजित अभिवाचन “मौनराग”लेखक – महेश एलकुंचवार दिग्दर्शक – चंद्रकांत कुलकर्णी संकल्पना – पौर्णिमा मनोहरअभिवाचन – सचिन खेडेकर , चंद्रकांत कुलकर्णी आविष्कार संस्थेतर्फे चंद्रकांत कुलकर्णी आणि सचिन खेडेकर गेली १० वर्षे ‘’ मौनराग ‘’ चा प्रयोग करत आहेत. आज ते दोन…

Read More

साहित्याच्या खजिन्यात थोडंसं जरी डोकावून बघितलं तरी ते साधकाला भरभरूनच देतं आणि हे गणित ज्याला गवसलं तो या खजिन्याचा स्वत:ला समृद्ध करण्यासाठी सुयोग्य वापर करून घेतो. असंच काहीसं घडलंय हौशी कलाकार श्री. अनिरुद्ध पाटील यांच्याबरोबर! म्हणूनच की काय त्यांनी कुटुंबिय आणि मित्रांबरोबर हा Online साहित्य मेळावा भरवण्याचे ठरविले आहे. श्री. अनिरुद्ध पाटील यांनी हौशी रंगभूमीवर बऱ्याच नाटकात काम केले आहे. त्यांनी ठरविलेला हा ३ दिवसांचा कार्यक्रम Instagram वर सादर होणार आहे. या कार्यक्रमाची रुपरेषा पुढीलप्रमाणे असणार आहे.१५ मे, २०२० – कथावाचन । “प्रकृती” – मधू तथा एम्. पी. पाटील१६ मे, २०२० – काव्यवाचन । कवी – कुसुमाग्रज, पु. शि. रेगे,…

Read More

त्याला भेटण्याच्या ओढीने मी ठरलेल्या वेळेपेक्षा थोडी आधीच येऊन कॉफी शॉपच्या समोरच्या झाडाखाली थांबले होते. तसाच असेल का तो? शाळेतल्यासारखा? किती वर्षांनी भेटतोय आम्ही आज. शाळेत अल्लडपणे पाहिलेली स्वप्नं आज परत सत्यात रूपांतरित होतील असं वाटतंय. अजूनही मात्र त्याचा भाव खाण्याचा स्वभाव काही बदलला नाही. इतके दिवस ‘भेटूया’ म्हणून मीच त्याच्या मागे लागले होते. शाळेत असताना माझं त्याच्यावर प्रेम होतं… आणि त्याचंही होतंच माझ्यावर. मला जाणवायचं ते, त्याच्या नजरेतून. तेव्हा सगळं बोलायचं राहून गेलं. आता मात्र मी व्यक्त होणार, मी ठरवूनच आले होते. हा सगळा विचार मनात चालू असताना माझ्यासमोर एक कार येऊन थांबलेली मला कळलंच नाही.”हॅलो मीनल!” काच उघडून आतल्या…

Read More

कोरोनारूपी महामारीने संपूर्ण जग त्रस्त असताना या महामारीतून सुटका करण्यासाठी सगळ्यांनी घरी रहाणेच हिताचे आहे हे लक्षात आल्यावर आपले पंतप्रधान माननीय श्री. नरेंद्र मोदीजी यांनाही भारतात Lockdown पुकारावा लागला. काही कर्मचाऱ्यांकडे घरी बसून काम करण्याचा पर्याय उपलब्ध होता. पण, या Lockdown मध्ये खऱ्या अर्थाने होरपळून निघाली ती म्हणजे रंगभूमी आणि तिच्याशी जोडलेले विविध लोक! रंगभूमीचा पडदा काही काळासाठी पडल्यामुळे रंगभूमीशी निगडित लहान मोठे कलाकार, बॅकस्टेजची माणसं, रंगभूषाकार, सफाई कामगार असे सारेच या अचानक आलेल्या संकटात भरडून निघाले आहेत. अशा वेळी या सर्व निराधार लोकांना मदत करण्यासाठी बरेच कलाकार उभे राहिले.अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष आणि भद्रकाली प्रोडक्शन्सचे सर्वेसर्वा श्री. नवनाथ…

Read More

खळखळ आवाज करत निसर्गाच्या सौन्दर्यात भर टाकत वाहणाऱ्या मुळा नदीच्या काठावर हिरव्यागार झाडांनी नटलेलं बारशिंग नावाचं गाव होतं. अगदी नावाप्रमाणेच १२ वाड्यांचे मिळून ते एक गाव बनले होते. नुकताच शासनाचा निधी मंजूर झाल्याकारणाने गावात रस्ते बांधणीच काम सुरु होतं. ते रस्ते साहजिकच शहराच्या रस्त्यांना जोडले जाणार होते. रस्त्यांचं काम जोरदार चालू होतं. गावच्या तिठ्यावर कामाच्या शोधासाठी बसणाऱ्या आदिवासींसाठी ही चांगली संधी होती. बिचाऱ्यांचं हातावर पोट म्हणावं अशीच त्यांची अवस्था. जेव्हा काम करून हातात पैसे येतील तेव्हाच बिचाऱ्यांची भूक भागत असे. आणि रस्ते बांधणीसाठी त्या आदिवासी लोकांना बोलावण्यात आलं. चांगलं १५ दिवसांचं काम असल्याकारणाने तीही लोकं आपला बोरिया बिस्तर घेऊन गावात…

Read More