ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक श्री. लीलाधर कांबळी यांचे २ जुलै, २०२० रोजी रात्री ९ च्या सुमारास त्यांच्या ठाणे येथील निवासस्थानी निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते. गेली २ वर्षे ते कॅन्सरशी लढा देत होते. हसवाफसवी, केला तुका नि मका झाला, वस्त्रहरण या नाटकांमधील त्यांनी साकारलेल्या भूमिका चांगल्याच गाजल्या. त्यांनी मच्छिंद्र कांबळी यांच्याही बरोबर अनेक नाटकांमधून त्यांनी कामे केली. दिलीप प्रभावळकरांच्या बहुरूपी भूमिकांनी अजरामर झालेल्या हसवाफसवी नाटकामध्ये लीलाधर कांबळी यांनी दिलीप सरांना अचूक साथ दिली होती. त्यामुळेच हसवाफसवी नाटकामधील वाघमारे प्रेक्षकांच्या आजही लक्षात आहेत. वस्त्रहरण आणि हसवाफसवी या नाटकांचे त्यांनी परदेश दौरेही गाजवले.‘भाकरी आणि फूल’, ‘गोटय़ा’, ‘बे दुणे तीन’, ‘कथास्तु’, ‘हसवणूक’,…
Author: रंगभूमी.com
स्वरा मोकाशी लिखित आणि चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित “हरवलेल्या पत्त्यांचा बंगला” हे नाटक दीर्घकाळ स्मरणात राहील. मुले कितीही मोठी झाली तरी त्यांच्या पालकांकडून असलेल्या अपेक्षा कमी होत नाहीत, याचीच गोष्ट सांगणारं हे नाटक आहे. तीन स्त्रियांच्या आयुष्यावरील भाष्य त्यामध्ये गुंफण्यात देखील लेखक-दिग्दर्शक द्वयी यशस्वी झालेले दिसले. या मधील ‘इंदिराबाई’ त्यागाला आदर्श मानणाऱ्या पिढीत जन्माला आलेल्यांच प्रतिनिधित्व करताना दिसतात. वंदना गुप्ते यांनी या भूमिकेला योग्य न्याय दिला आहे. त्यांनी साकारलेली आई, तीच्या वागणुकीतून आणि आलेल्या अनुभवातून एका निष्कर्षाप्रत येऊन प्रेक्षकांना मेसेजही देते ही बाब भावणारी आहे. वंदना गुप्ते यांनी दाखवलेली अभिनयातील सह्जता विशेष उल्लेखनीय तर आहेच , शिवाय त्यांनी साकारलेल्या इंदिराबाईने त्यांच्या…
लॉकडाऊनच्या काळात प्रत्येक कलाकार, तंत्रज्ञ आणि प्रेक्षक रंगभूमीवरील नाटक पाहण्यासाठी आसूसलेले आहेत. नाटकाचे प्रयोग कधी सुरू होणार ? ह्याची उत्सुकता प्रत्येक नाट्यरसिकाला आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या विळख्यात असलेल्या मुंबई पुण्यात तरी नाटकांचे प्रयोग इतक्यात सुरू होणे कठीण आहे. अशा संकट काळात प्रेक्षकांना थेट रंगभूमीपर्यंत पोहोचता येत नसल्याने प्रत्यक्ष रंगभूमीच आपल्या घरोघरी अवतरणार आहे.सुनील बर्वे, पौर्णिमा मनोहर आणि वाईड विंग्स मिडीया यांची संकल्पना असलेल्या OMT अर्थात ‘Online माझं Theatre’ ह्या विशेष कार्यक्रमाची नुकतीच OMT च्या अधिकृत फेसबुक पेजवर घोषणा करण्यात आली. त्याविषयी सांगताना टीमतर्फे ह्या कार्यक्रमाची रूपरेषा स्पष्ट करण्यात आली. ह्यात एकूण वीस कलाकारांच्या चार टीम्सने सहभाग घेतला असून प्रत्येक टिमचा…
कुणी मला विचारलं की मालिका, नाटक की चित्रपट ? तर माझं पहिलं उत्तर नेहमीच ‘नाटक’ हे असेल. कारण आजवर मी पाहिलेल्या प्रत्येक नाटकाने मला खूप काही दिलंय. ती कोणतीही आर्थिक मदत नव्हती’ त्यामुळेच बहुतेक ती मदत अनमोल होती असे मला कायम वाटते. दरवेळी नाटक पाहिले, की एखादा तरी सकारात्मक बदल माझ्यात आणि माझ्या विचारांमध्ये होतोच, असे मला आजवरच्या अनुभवावरून वाटते आहे. हे असेच एक नाटक ज्याने माझ्या आयुष्यात मला एक लेखक म्हणून आणि एक माणूस म्हणून घडवले, जे नाटक पाहिल्यावर मी एखाद्या गोष्टीत आकंठ बुडणे म्हणजे काय हा अनुभव घेतला. ते नाटक म्हणजे ‘वाडा चिरेबंदी’. २० डिसेंबर २०१४. दुपारी ०४:३० वाजता…
बुलढाण्याला मित्राचा वाढदिवस होता. मी खामगाव वरून स्कुटीने गेलो होतो. बुलढाणा जायला ज्ञानगंगा अभयारण्यातून बोथा घाट मार्गे जावं लागतं. या अभयारण्यात अस्वल,बिबट सारखे हिंस्त्र प्राणी आहेत तर बरेचसे पक्षी देखील.प्राण्यांच्या
काही दिवसांपूर्वी रंगभूमी.com च्या Social Media वर आम्ही नाट्यरसिक of the month या अनोख्या स्पर्धेबद्दल सांगितले होते. १ जून, २०२० पासून रंगभूमी.com च्या Instagram पेजवर या स्पर्धेची सुरुवात झालेली आहे. आम्ही तमाम नाट्य प्रेमींना आवाहन करतो की त्यांनी या स्पर्धेमध्ये नक्की सहभाग घ्यावा. या स्पर्धेचे स्वरूप अतिशय सोपे आहे. सोमवार ते शुक्रवार आम्ही नाटकाशी संबंधित काही प्रश्न Instagram story मध्ये तुम्हाला विचारणार आहोत. या प्रश्नाचे स्वरुप ध्वनिफीत, जोड्या जुळवणे किंवा एखादी चारोळीही असू शकते. तुम्हाला त्या प्रश्नाचे उत्तर द्यायचे आहे. महिन्याच्या शेवटी जास्तीत जास्त अचूक उत्तरे देणाऱ्या @myrangabhoomi च्या Follower ला नाट्य रसिक of the month घोषित करण्यात येईल आणि…
माझं बालपण आणि आत्तापर्यंतचं सारं आयुष्य लालबागला गेलं. लालबाग म्हणजे गिरणगांव. कोकण, घाट, विदर्भ अशा चहूबाजूंनी आलेल्या हौशी गिरणीकामगारांनी येथील सण, उत्सव मोठ्या हौसेने व अहमहमिकेने सजवले, फुलवले. इथे गणेशोत्सव आणि नवरात्रात नाटके होत असत. ही नाटके बहुतेक काल्पनिक ऐतिहासिक अशा स्वरूपाची असत. “जल्लाद” हे असंच एक लोकप्रिय नाटक सादर करून नावारुपाला आलेली “नवहिंद बाल मित्र मंडळ” ही नाट्यसंस्था. या नाटकांमध्ये ट्रिक सीन्स असत. सुरुवातीची श्रेयनामावली सुद्धा ट्रिक सीन्सद्वारे वेगवेगळ्या पद्धतीने दाखवली जात असे. आम्हा लहान मुलांना त्याचे फारंच आकर्षण वाटत असे. जंगल, राजवाडा, राजमार्ग असे सुंदर रंगीत पडदे वातावरणनिर्मितीत बदल म्हणून अधेमधे टांगले जात असत. अधूनमधून गाण्यांची व तलवार…
रंगभूमी.com ने मला आठवणीत राहिलेले नाटक या सदरा अंतर्गत मला लेख लिहिण्यास सांगितले आणि क्षणार्धात माझ्यासमोर एक नाव आले वैशालीची खोली.१९८९ सालची महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धा. मला आठवतंय, पूवी सर्व वर्तमानपत्रात मुंबईतील विविध नाट्यगृहात सादर होणाऱ्या महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेत सादर होणाऱ्या नाटकांची यादी येत असे. त्यात नाटक सादर होण्याची तारीख-वेळ, संस्थेचे नाव, नाटकाचे नाव आणि लेखकाचे नाव इत्यादी तपशील असे. मग मी त्याची कात्रणे करून जी नाटके आवर्जून बघायची आहेत त्यावर टिक (√) करून ठेवायच्या.या वर्षी एका नाटकाने माझे कुतूहल वाढवले. दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह, विलेपार्ले येथे सादर होणारे निनाद संस्थेचे सुरेश जयराम लिखित आणि मंगेश कदम दिग्दर्शित वैशालीची खोली.…
काही दिवसांपूर्वी आम्ही रंगभूमी.com च्या social media वर “माझ्या आठवणीतील नाटक” या नवीन सदराबद्दल माहिती दिली होती. या नवीन सदराला मिळालेल्या उदंड प्रतिसादाबद्दल आम्ही सर्व वाचकांचे आभारी आहोत. प्रत्येक गुरुवारी आपण एक नवीन अनुभव रंगभूमी.com वर वाचू शकता.आपण कितीतरी नाटकं पाहतो. काही नाटकं आपल्या मनात कायमचं घर करून जातात. आपल्याला आयुष्यभरासाठी एक छानशी आठवण देऊन जातात. ही आठवण चांगली असो वा वाईट मनोरंजक नक्कीच असेल. अशा अनेक गोड कडू आठवणी वाचकांपर्यंत पोहोचवायच्या दृष्टिकोनातून आम्ही या सदराची सुरुवात केलेली आहोत. या संकल्पनेचा रंजक भाग असा आहे की ही आठवण एका प्रेक्षकाची असू शकते किंवा नाटकात काम करत असलेल्या कलाकाराची सुद्धा! रंगमंचावर नाटक सुरू…
सूचना: अनिल कासकर यांचा अभिनेता ते रंगभूषाकारापर्यंतचा प्रवास हा लेख तुम्ही वाचला नसेल तर नक्की वाचा!अभिनय करताना आलेला वाईट आणि चांगला अनुभव…प्राथमिक शिक्षण पूर्ण करून विद्यालयात प्रवेश घेतला आणि तिथेच अभिनयाची खरी सुरुवात झाली….!!जेष्ठ आणि श्रेष्ठ लेखक बाळ कोल्हटकर यांच्या “सिमेवरुन परत जा” या नाटकाचा स्नेहसंमेलन साठी विद्यालयात प्रयोग करण्यात येणार होता, संपूर्ण पात्रनिवड झाल्यानंतर मला कळले म्हणून मी आमचे कला शिक्षक ह्यांना भेटलो आणि विनंती केली की मला काम करायचे आहे. अगोदर नाही म्हणाले पण मुख्याध्यापकांना भेटून त्या कला शिक्षकांवर आणि कलाकारांवर दबाव आणून नाटकात प्रवेश घेतला. परंतु पात्रनिवड झाली असल्यामुळे अभिनयास वाव मिळेल अशी भूमिका मला मिळाली नाही.…
रा. वसंत कानेटकर लिखित आणि राजेश देशपांडे दिग्दर्शित ‘हिमालयाची सावली’ हे नाटक पाहिले. मराठी रंगभूमीवरील एक अजरामर अभिजात कलाकृती म्हणून ‘हिमालयाची सावली’ हे नाटक कायम स्मरणात राहील. १९७२ नंतर सत्तेचाळीस वर्षांनी ह्या अभिजात कलाकृतीचे शिवधनुष्य समर्थपणे पेलून राजेश देशपांडेनी तर कमालच केली आहे. हिमालयाची सावलीचे कथानक साधारण १९२० सालातील, रंगमंचावर तो कालावधी प्रभावीपणे साकारण्यात दिग्दर्शक, नेपथ्यकार यांच्या बरोबरच कलाकारही यशस्वी झाले आहेत. आयुष्यभर समाजसेवेचे कार्य करणारे ‘नानासाहेब’ आणि त्यांचा संसार निगुतीने जपणारी ‘बयो’ यांची गोष्ट सांगाणारे हे नाटक आहे. समाजसेवेच कार्य आणि समाजाचा संसार कोणी समजूत घेत नाही यांची खंत नानासाहेबांना कायम असते. आपल्या कुटुंबीयांना आपण बाहेर काय करत आहोत हे कळत…
कोरोनारूपी संकटातून आपणा सर्वांना बाहेर पडण्यास अजून किमान ३ ते ४ महिन्यांचा कालावधी निश्चितच जाईल. तसंच, परिस्थिती पूर्णतः स्थिरस्थावर होऊन प्रेक्षकवर्ग पुन्हा नाट्यगृहामध्ये प्रवेश करण्यास कमीत कमी ५ ते ६ महिने लागतील. पण तोपर्यंत, रंगभूमीच्या जोरावर रोजगारी मिळवून दैनंदिन व्यवहार चालवणाऱ्या गरजू कलाकारांना होणाऱ्या त्रासाची जाणीव ठेवून प्रशांत दामले, विक्रम गोखले, प्रसाद कांबळी हे आणि असे बरेच ज्येष्ठ रंगकर्मी पुढे सरसावले. आता या यादीमध्ये अजून एक नाव जोडले गेले आहे, ते म्हणजे ज्येष्ठ अभिनेत्री अश्विनी भावे यांचे!अश्विनी भावे यांनी WhatsApp वरील एका उपक्रमांतर्गत गरजू रंगकर्मींना ५ लाख रुपयांची मदत केली आहे आणि त्या पुढील तीन महिने ५ लाख रुपये मदत…