महाराष्ट्रातील अलिबाग येथील PNP नाट्यगृहाला भीषण आग लागली आहे. अग्निशमन दल वाहनं वेळेत घटनास्थळी पोहोचली आहेत. आग लागण्याचं नेमकं अद्याप समोर आलेलं नाही. तरीही नाट्यगृहात वेल्डिंगचे काम सुरू होते व त्यामुळे ही घटना घडली असावी, असे सांगितले जात आहे. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही असे आमच्या प्रतिनिधीला कळले आहे. आजूबाजूच्या परिसरातील रहिवाशीही आग विझविण्याचा प्रयत्न करीत आहेत. https://www.instagram.com/p/Ce2jv5CpOrP/ https://twitter.com/myrangabhoomi/status/1537101504082894849
Author: रंगभूमी.com
सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे दरवर्षी घेण्यात येणाऱ्या राज्य नाट्य हौशी स्पर्धा कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर २०२१ साली घेता आल्या नव्हत्या. यंदा मात्र स्पर्धेच्या हीरक महोत्सवी वर्षी ‘आजादी का अमृत महोत्सव’ या उपक्रमाच्या पार्श्वभूमीवर ही स्पर्धा दणक्यात पार पडली. मराठी, हिंदी, संस्कृत तसेच बालनाट्य, संगीतनाट्य व दिव्यांग बालनाट्य अशा सहा वेगळ्या प्रकारांमधून राज्यातील ३४ केंद्रांवर या स्पर्धा घेण्यात आल्या. हिंदी व मराठी भाषेतील नाट्य स्पर्धांचा निकाल जाहीर झालेला आहे व तो पुढीलप्रमाणे आहे. महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धा २०२२ — मराठी नाटकांचे निकाल श्री विघ्नहर्ता प्रतिष्ठान (मुंबई) या संस्थेच्या ‘इन द सेल ऑफ सर्व्हायव्हल’ या नाटकाला प्रथम पारितोषिक जाहीर झाले आहे. साईकला कला क्रीडा…
‘मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं!’, असं म्हणत आपल्याला खऱ्या अर्थाने जगणं शिकवणारा सर्वांचा लाडका अभिनेता प्रशांत दामले आणि त्याचं प्रेक्षकांचं तितकंच लाडकं असलेलं नाटक ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’! आज या नाटकाचे ५०० प्रयोग पूर्ण होणार आहेत. तमाम रसिक प्रेक्षकांचे प्रेम संपादित करून रंगभूमीचा बादशाह ठरलेल्या प्रशांत दामले या चतुरस्त्र अभिनेत्याच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. अर्थात, या महत्वाच्या टप्प्याचं संपूर्ण श्रेय नाटकाच्या संपूर्ण टीमला जातं. प्रशांत दामले, कविता मेढेकर, अतुल तोडणकर, मृणाल चेंबूरकर, प्रतीक्षा शिवणकर, राजसिंह देशमुख व पराग डांगे अभिनीत आणि प्रशांत दामले फॅन फाऊंडेशन व गौरी थिएटर्स निर्मित आणि सरगम प्रकाशित ‘एका लग्नाची…
तुम्हालाही एखाद्या नाट्यानुभवाबद्दल तुमची प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पाठवायची असेल तर ती [email protected] या ई-मेल आयडीवर पाठवू शकता. नवनवीन नाटकांची इत्यंभूत माहिती देणाऱ्या आमच्या YouTube चॅनेलला नक्की भेट द्या! श्री. विजयकुमार अणावकर यांनी पाठवलेली प्रतिक्रिया ‘कुर्रर्रर्रर्र’कुरीत विनोदी नाटक अलीकडच्या काळात रंगभूमीवर विनोदी नाटकांची लाट नव्याने उभारी घेत असतानाच प्रसाद खांडेकर लिखित आणि दिग्दर्शित ‘कुर्रर्रर्रर्र’ या नाटकाने गंभीर विषयाला हलक्याफुलक्या विनोदाची झालर लावून प्रेक्षकाना आश्चर्याचा सुखद धक्का दिला आहे. बाळंतपण आणि मातृत्व यामधील सुंदर क्षण या नाटकात हळुवार विनोदाने साकारले आहेत. अक्षर आणि पूजा यांच्या लग्नाला पाच वर्षे झालेली असून देखील त्यांना बाळ होत नाही. पूजाला लागलेली बाळाची हुरहूर आणि बाळासाठी तिच्यामागे लागलेला आईचा…
नुकताच २७ मार्च रोजी पार पडलेला जागतिक रंगभूमी दिन यंदा सर्व रंगकर्मींनी जोशात साजरा केला. कोविडच्या संकटामुळे काही काळ स्थगित झालेली नाट्यसृष्टी नव्याने उजळू लागल्यामुळे रंगकर्मींमध्ये दिसणारा हा उत्साह स्वाभाविकही होता. अशा या दिवशी पीटर सेलर्स या पिटस्बर्ग, पेनसिल्वानिया, यूएसए येथील संगीतिका, नाटक आणि महोत्सव दिग्दर्शक यांनी सर्व नाट्यदर्दींना जागतिक रंगभूमी दिनाच्या शुभेच्छा देत एक महत्वाचा संदेशही दिला आहे. ज्येष्ठ लेखक, नाट्य प्रशिक्षक व दिग्दर्शक संभाजी सावंत यांनी हा संदेश अनुवादित करून आपल्यापर्यंत पोहोचवला आहे. हा संदेश तमाम नाट्यप्रेमींसाठी अतिशय महत्वाचा आहे. प्रस्तुत संदेश नक्की वाचा! मूळ लेखक: पीटर सेलर्स अनुवाद: संभाजी सावंत मित्रहो, काळ विलक्षण उद्भवला आहे! आज अवघं…
नाटकाच्या शेवटी कथानकाला ट्विस्ट देत गूढ उकलणारी रहस्यमय नाटकं पसंत करणारा एक खास प्रेक्षकवर्ग आहे. अशा प्रेक्षकवर्गासाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. श्वेता पेंडसे लिखित आणि विजय केंकरे दिग्दर्शित ’38, कृष्ण व्हिला’ ही एक रोमांचक नाट्यकृती लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. १९ मार्च रोजी या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग सादर होणार आहे. या नाटकात गिरीश ओक आणि श्वेता पेंडसे हे कलाकार असणार आहेत. इतर कलाकारांबद्दल अद्याप उलगडा करण्यात आलेला नाही. जाणून घ्या काय आहे डॉ. गिरीश ओक यांचे बहारदार चिवित्रांगण! कथानकाबद्दल थोडंसं… ’38 कृष्ण व्हिला’ नाटकामध्ये गिरीश ओक ‘देवदत्त कामत’ या भूमिकेत आपल्यासमोर येणार आहेत. देवदत्त कामत यांच्यावर नंदिनी चित्रे ही…
गौरी थिएटर निर्मित आणि प्रशांत दामले फॅन फाऊंडेशन प्रकाशित ‘सारखं काहीतरी होतंय!’ या आगामी नाटकाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. नाटकाची चर्चा होण्यामागे बरीच कारणं आहेत. सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे हास्यसम्राट प्रशांत दामले या नाटकातून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीसाठी येणार आहेत. दुसरं कारण म्हणजे या नाटकाचा लेखक-दिग्दर्शक असणार आहे आपल्या सगळ्यांचाच लाडका संकर्षण कऱ्हाडे! तिसरं आणि सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे या नाटकाच्या निमित्ताने आपली अत्यतं प्रिय अशी प्रशांत दामले आणि वर्षा उसगांवकर ही जोडी आपल्या भेटीस येणार आहे. आता याहून आनंदाची बातमी! ‘सारखं काहीतरी होतंय!’ या नाटकाच्या शुभारंभाची तारीख जाहीर झालेली आहे. शुक्रवारी, २५ मार्च रोजी या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग…
सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे दरवर्षी घेण्यात येणाऱ्या राज्य नाट्य हौशी स्पर्धा कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर २०२१ साली घेता आल्या नव्हत्या. यंदाचे या स्पर्धेचे हीरक महोत्सवी वर्ष असणार आहे. आजादी का अमृत महोत्सव या उपक्रमाच्या पार्श्वभूमीवर ही स्पर्धा यंदा होत असल्याने त्यास विशेष महत्त्व असल्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी सांगितले. मराठी, हिंदी, संस्कृत तसेच बालनाट्य, संगीतनाट्य व दिव्यांग बालनाट्य अशा सहा वेगळ्या प्रकारांमधून राज्यातील ३४ केंद्रांवर या स्पर्धा घेण्यात येणार आहेत. महाराष्ट्र शासनाच्या या हीरक महोत्सवी राज्य नाट्य स्पर्धेचा राज्यस्तरीय उद्घाटन सोहळा सोमवारी २१ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता ऑनलाईन पद्धतीने होणार असल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी दिली.…
अस्तित्व आयोजित ‘कल्पना एक आविष्कार अनेक’ या आपल्या सगळ्यांच्या लाडक्या स्पर्धेचे २०२१ हे ३५ वे वर्ष होते. पण त्याहून आनंदाची गोष्ट म्हणजे अस्तित्व या संस्थेलाही २७ डिसेंबर, २०२१ रोजी २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. नाट्यदर्पण संस्थेने सुरू केलेली ‘कल्पना एक आविष्कार अनेक’ ही स्पर्धा अस्तित्व संस्थेने पुनर्जिवीत केली याबद्दल या संस्थेच्या सर्व सहकाऱ्यांचे मानावे तितके आभार कमीच आहेत. १८ डिसेंबर, २०२१ रोजी पार पडलेल्या एकदिवसीय अंतिम फेरीचा आढावा घेणारा हा व्हिडिओ बघायला विसरु नका. कल्पना एक आविष्कार अनेक २०२१ व्हिडिओ https://www.youtube.com/watch?v=90MiVC-ZhyE आजच्या या २५ व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने अस्तित्व संस्थेतर्फे येणाऱ्या २०२२ वर्षातील स्पर्धेसाठी पुढील शब्दात स्पर्धकांना जास्तीत जास्त प्रमाणात स्पर्धेत…
मंडळी, आपण वेगवेगळ्या नाट्यगृहांमध्ये भव्य दिव्य स्वरुपात सुमारे ३ दिवस ते अगदी महिनाभर सुरू राहणारे नाट्यमहोत्सव बघत आलो आहोत. परंतु, एखाद्या गावामध्ये, जिथे एकही नाट्यगृह नाही अशा ठिकाणी एक माणूस नाट्यमहोत्सव आयोजित करण्याचे धाडस करतो हे ऐकूनच किती भारावून जायला होतं. अशीच एक कल्पना चंदगड तालुक्यातील हलकर्णी येथील प्रा. परसू गावडे यांच्या डोक्यात आली आणि त्यातून चंदगडी नाट्य महोत्सवाचा आरंभ झाला. कोरोनाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर चंदगडी नाट्यमहोत्सवाची तिसरी घंटा ९ जानेवारीपासून वाजणार आहे. चंदगड तालुक्यातील हलकर्णी येथे यंदा चौथा चंदगडी नाट्यमहोत्सव होत आहे. ग्रामीण भागातील नाट्यरसिकांना महाराष्ट्र्भरातील नाट्यपरंपरा बघता यावी यासाठी या नाट्यमहोत्सवाची सुरूवात केल्याचे प्रा. परसू गावडे सांगतात. तालुक्यात एकही खुले…
[Please check the updated news at bottom of this article] राज्यात कोरोनाचा धोका अजूनही टळलेला नाही. तसेच, ओमायक्रोनचे नवीन संकट डोक्यावर येऊन उभे राहिले आहे. ओमायक्रोनचे बाधित रुग्णांच्या आकड्यातही वाढ होताना दिसत आहे. त्यामुळेच या सगळ्या गोष्टींचा विचार करुन राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी राज्य नाट्य स्पर्धा पुन्हा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारच्या सांस्कृतिक संचालनालयाच्या वतीने घेतल्या जाणाऱ्या राज्य नाट्य स्पर्धा काही दिवसांपूर्वी पुढे ढकलण्यात आल्या होत्या. त्याबद्दलचा संपूर्ण तपशील तुम्हाला पुढील लिंकवर वाचता येईल. राज्य नाट्य स्पर्धेच्या प्रवेशिका दाखल करण्यासाठी व सादरीकरणासाठी १५ दिवसांची मुदतवाढ कोरोना आणि ओमायक्रोनचे रुग्ण वाढताना दिसत असल्याने ही स्पर्धा मे आणि…
२५ नोव्हेंबर, २०२१ रोजी प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहामध्ये एक दिमाखदार सोहळा पार पडला, ज्याचे नाव होते ‘रंगबरसे’ आणि निमित्त होते ८ वा जागतिक रंगकर्मी दिवस! हा सोहळा मराठी नाट्य कलाकार संघ व आरती आर्ट अकादमी च्या सहयोगाने आयोजित करण्यात आला होता. मराठी नाट्य कलाकार संघाचे अध्यक्ष माननीय प्रदीप कबरे यांच्या मार्गदर्शनाखाली, संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ अभिनेते कै. भालचंद्र पेंढारकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांच्या उपस्थितीत २५ नोव्हेंबरला २०१४ साली यशवंत नाटय़मंदिरात मराठी कलाकार संघाच्या वतीने पहिला जागतिक रंगकर्मी दिन साजरा झाला होता. कोरोनाचे संकट उद्भवल्यामुळे गतवर्षी रंगकर्मी दिन साजरा झाला नाही. मात्र या वर्षी प्रचंड उत्साहात हा सोहळा पार पडला. गेल्या सात वर्षांत…