न्यूज चॅनेल बघून किंवा वर्तमानपत्रातील ताज्या बातम्या बघून आपण ‘चाय पे चर्चा’ करत कित्येकदा अगदी सहजपणे म्हणून जातो, “तिसरं महायुद्ध अटळ आहे.” पण खरंच जर महायुद्ध झालं तर त्या युद्धाचं स्वरूप, त्याची भीषणता कुठल्या थराची असेल याची अद्याप आपल्याला किंचीतही जाणीव नाही. हाच पहिला विचार आलेला माझ्या डोक्यात जेव्हा मी ‘देवमाणूस’ नाटक बघून नाट्यगृहातून बाहेर पडले. ताजे चेहरे घेऊन अतिशय वेगळ्या आणि महत्वपूर्ण अशा ज्वलंत विषयाचे नाटक घेऊन आल्याबद्दल सर्वप्रथम भद्रकाली प्रोडक्शनचे आणि प्रामुख्याने प्रसाद कांबळी यांचे अभिनंदन आणि खूप खूप कौतुक! आणि इतकी सुंदर नाट्यकृती स्वतःच्या लेखणीतून अस्तित्वात आणल्याबद्दल शंतनू चंद्रात्रे यांचे हार्दिक अभिनंदन, आणि खूप आभार. भद्रकालीतर्फे याआधीही…
Author: रंगभूमी.com
हटके विषय निवडून रंगभूमीवर बराच काळ अधिराज्य गाजवणारी नाटकं तशी क्वचितच! त्यातही ‘fantasy’ वर आधारित नाटकं त्याहूनही कमी. असंच एक नाटक १३ ऑगस्ट, २०१६ रोजी, यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड येथे पहिल्यांदा रंगभूमीवर अवतरलं. हे नाटक म्हणजे सुबक निर्मित, मनस्विनी लता रवींद्र लिखित व निपुण धर्माधिकारी दिग्दर्शित, ‘अमर फोटो स्टुडिओ’! गुणी कलाकारांची खुमासदार पंगत असलेलं आणि प्रेक्षकांच्या मनात आजवर स्थान करुन राहिलेल्या या नाटकाने लॉकडाऊनच्या आधी २५० पेक्षा जास्त प्रयोगांचा टप्पा पार केला. लॉकडाऊनमुळे पडद्याआड गेलेलं हे नाटक येत्या ७ जानेवारी २०२३ पासून रंगभूमीवर पुनरागमन करत आहे. हे या नाटकाचे शेवटचे आणि मोजके प्रयोग असल्याचे नाटकातील कलाकारंद्वारे सांगण्यात येत आहे. या…
लग्न कि लिव्ह-इन हा वाद जुनी पिढी व सद्याची तरुणाई यांचेमध्ये कायमचं रंगताना दिसतो. या बहुचर्चित विषयाच्या वादाला एका निष्कर्षाप्रत आणणारे आणि कधी भावनिक तर कधी विनोदी पध्दतीने भाष्य करणारे नाटक म्हणजे “आमने सामने“. लग्नसंस्था, लिव्ह-इन रिलेशनशीप आणि जनरेशन गॅप हा विषय प्रेक्षकांपुढे नव्याने मांडण्याची लेखक आणि दिग्दर्शक निरज शिरवईकर यांची पध्दत खूपच वेगळी, आश्चर्यकारक आणि मनाला भावणारी आहे. विशेष म्हणजे हे नाटक फक्त रंगमंचावरील कलाकारांचेच न राहता त्यामध्ये प्रेक्षकांना सुध्दा सामावून घेण्यात लेखक- दिग्दर्शक आणि कलाकार प्रचंड यशस्वी झालेले आहेत. अनेक वर्षे संसार केलेल्या जुन्या पिढीतील जोडप्याला एकमेकांबद्दल माहित असलेल्या गोष्टी आणि नुकतेच रिलेशनशिप मध्ये आलेले व लिव्ह-इन मध्ये…
मराठी नाट्यसृष्टीसाठी २०२२ हे महत्वाचं वर्ष ठरलं. कोरोना महामारीनंतर नव्याने उभ्या राहिलेल्या या विश्वात सर्व दिग्दर्शक आणि निर्मात्यांनी ताज्यातवान्या कथांसह बहारदार नाटकांची मेजवानी आणली. जमेची बाजू म्हणजे वर्षाच्या शेवटापर्यंत ही मेजवानी सुरुच आहे. अजूनही नवनवी नाटकं प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत आणि याच यादीतील प्रेक्षकांच्या भेटीस येणारं एक नवकोरं नाटक म्हणजे थँक्स डियर. निखिल रत्नपारखी आणि हेमांगी कवी अभिनीत या नाटकाचे शुभारंभाचे प्रयोग २५ डिसेंबर रोजी चिंचवडमधील वा. प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षगृह आणि पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे अनुक्रमे दुपारी १२.३० आणि सायंकाळी ५.३० वाजता सादर होणार आहेत. शहर असो वा ग्रामीण भाग, कलोपासक असोत वा बुध्दीजीवी प्रत्येक क्षेत्रात शर्यत ही असतेच.…
वीर-झारा, रोमिओ-ज्युलिएट, राज-सिमरन या आणि अशा काही खास ऑन-स्क्रीन जोड्या कित्येक वर्षे प्रेक्षकांच्या मनावर गारूढ करुन आहेत. जानेवारी, २०२२ मध्ये या यादीत अजून एका सुपरहीट जोडीचं नाव जोडलं गेलं. ते म्हणजे, ‘संज्या छाया’! इतर जोडयांप्रमाणे गुडीगुडी किंवा भडक लव्ह स्टोरी नाही तर त्यांच्या आयुष्यातील साधेपणा हीच या जोडप्याची खासियत आहे आणि याच साधेपणाच्या जोरावर २७ नोव्हेंबर रोजी ‘संज्या छाया’ दमदार सेंच्युरी पूर्ण करणार आहेत. प्रशांत दळवी लिखित आणि चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित ‘संज्या छाया’ हे नाटक सहज सोप्या आयुष्याची व्याख्या करुन देतं. सहज सोपं आयुष्य कसं जगावं यासाठी मार्गही सुचवतं. प्रशांत दळवी यांचं दर्जेदार लेखन, वैभव मांगले व निर्मिती सावंत या…
महाराष्ट्रात विद्यापीठातील युवा महोत्सवांना खूप महत्व दिले जाते. अशाच एका युवा महोत्सवात नाटक सुरू असताना ते बंद करण्यात आल्याचे दृश्य समोर आले आहे. औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात १६ ते १९ ऑक्टोबर दरम्यान युवक महोत्सव आयोजित करण्यात आला होता. या युवक महोत्सवात १६०० हून अधिक विद्यार्थी सहभागी होते. पण या युवा महोत्सवातील एका नाटकाच्या सादरीकरणादरम्यान प्रेक्षकांच्या भावना दुखावल्या गेल्या आणि सुरू असणारे नाटक बंद करण्यात आले, असे एका व्हायरल व्हिडीओमध्ये दिसण्यात येते. १७ ऑक्टोबर, २०२२ रोजी युवक महोत्सव कार्यक्रमादरम्यान विद्यापीठाच्या स्टेज क्रमांक ३ वर नाट्यरंग सुरु होते. राम, सीता आणि लक्ष्मण यांच्या भूमिकेत विद्यार्थ्यांचे सादरीकरण सुरू असताना त्यात…
महाराष्ट्र राज्यात प्रत्येक कलेला महत्व दिले जाते आणि नाट्यसंस्कृती प्रामुख्याने जपली जाते. महाराष्ट्र राज्यात जवळपास प्रत्येक जिल्ह्यात नाट्यगृह उभारण्यात आली आहेत. त्यात मुंबई आणि पुणे शहरात सर्वात जास्त नाट्यगृहं आहेत. या प्रमुख शहरांसह अनेक नगरपालिका कार्यरत आहेत, आणि असेच एक महानगर ओळखले जाणारे शहर म्हणजे मिरा-भाईंदर. जेव्हा महाराष्ट्रात कला जपली गेली तेव्हा त्या सार्थ प्रयत्नांना योग्य व सर्वोत्कृष्ट नाव दिले गेले आणि असेच काहीसे मिरा भाईंदर शहरातही घडले आहे. येथील स्थायिक प्रेक्षकांसाठी एक अवाढव्य नाट्यगृह बांधण्यात आले. बांधकाम तयार असूनही बऱ्याच कालावधीसाठी काही सामाजिक व राजकीय कारणांमुळे या नाट्यगृहाचे उद्घाटन लांबणीवर गेले. पण आता ही प्रतीक्षा संपली आहे. आमदार निधीतून…
रंगभूमीवर प्रचंड गाजलेले ‘चारचौघी’ हे नाटक ३१ वर्षांनी पुन्हा एकदा नव्या संचात रंगभूमीवर येत आहे. ‘जिगीषा’ या नाट्यसंस्थेतर्फे हे नाटक नव्याने सादर होत आहे. या नाटकाचा शुभारंभ शनिवार, १७ सप्टेंबर रोजी मुंबईच्या दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात होणार आहे. https://www.youtube.com/watch?v=CJvMt2qDBZs ‘चारचौघी’ या नाटकाच्या नव्या संचात रोहिणी हट्टंगडी, कादंबरी कदम, पर्ण पेठे, श्रेयस राजे, निनाद लिमये, पार्थ केतकर आणि मुक्ता बर्वे या कलाकारांच्या भूमिका आहेत. या नाटकाचे निर्माते श्रीपाद पद्माकर असून, सूत्रधार प्रणित बोडके आहेत. या नाटकाचे लेखन प्रशांत दळवी यांनी केले असून, दिग्दर्शन चंद्रकांत कुलकर्णी यांनी केले आहे. अशोक पत्की यांचे संगीत, संदेश बेंद्रे यांचे नेपथ्य, रवी-रसिक यांची प्रकाशयोजना या नाटकाला लाभली आहे.…
झपूर्झा तेजस्वी दशक महोत्सव २०२२, १६ सप्टेंबर दुपारी ४:३० पासून गडकरी रंगायतन, ठाणे येथे साजरा होणार आहे. झपूर्झाचा पहिल्या टप्प्यात काव्ययोग कार्यक्रम पार पडला आहे. हा कार्यक्रम कवितेवर होता. झपूर्झा दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात १२ नाट्यविष्कार असणार आहेत. तसेच व्यास क्रीएशन प्रकाशित ‘शब्दझपूर्झा’ नावाचा अंक दरवर्षीप्रमाणे सादर करणार आहे. झपूर्झाची तयारी जोरात सुरू झाली आहे. १० वं वर्ष असल्याकारणाने सर्व गोष्टीचा समावेश झपूर्झा मध्ये करण्यात आला आहे. गेले कित्येक दिवस आम्ही रंगभूमी.com च्या माध्यमातून तुम्हाला झपूर्झा तेजस्वी दशक महोत्सवाबद्दल अपडेट्स देत आहोत. १२ वेगवेगळे नाट्याविष्कार प्रेक्षकांना या महोत्सवात पाहायला मिळणार आहेत. एकाच दिवशी एकाच तिकिटात प्रेक्षकांना या सोहळ्याचा आस्वाद घेता…
नाशिककरांसाठी एक खास मेजवानी आहे. एक मनोरंजक नाटक नाशिककरांच्या भेटीस येत आहे. ‘प्रेम करावं पण जपून’ या नाटकाचा एक खास प्रयोग २८ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता महाकवी कालिदास कलामंदिर, नाशिक येथे सादर होणार आहे. आनंदाची बातमी म्हणजे या नाटकाची तिकिटं तुम्हाला रंगभूमी.com वेबसाईटवर बुक करता येणार आहेत. Book Tickets — ‘प्रेम करावं पण जपून’ नाशिक प्रयोग पुढील लिंकवर क्लिक करा आणि आजच या नाटकाची तिकिटे बुक करा. ‘प्रेम करावं पण जपून’ नाटक सारांश आजपर्यंत प्रेमाची कथा सांगणारी किंवा प्रेमावर भाष्य करणारी बरीच नाटकं येऊन गेली आहेत. पण प्रेमाकडे एका वेगळ्या नजरेने बघणारं आणि आजकालच्या जगातल्या प्रेमसंबंधांबद्दल आपले डोळे उघडणारं एक नवीन…
रविवार दिनांक २१ ऑगस्ट, २०२२ रोजी सकाळी ११ वाजता डोंबिवली येथील सावित्रीबाई फुले नाट्यगृहात प्रेक्षकांना एकाच तिकिटात दोन लघुनाटिका बघता येणार आहेत. या प्रयोगाची तिकिटे आपल्याच वेबसाईटवर उपलब्ध आहेत. पुढील लिंकवर क्लिक करून तुम्ही प्रयोगाची तिकिटे बुक करू शकता. नाट्यदिंडी (भगदाड + नवरा आला वेशीपाशी) याचे तिकीट बुकिंग नवरा आला वेशीपाशी आपलं दुःख कुणालाच कळणार नाही, कुणी ते समजूनच घेऊच शकत नाही, असं प्रत्येकाला आपल्या कुठल्यातरी दुःखाबद्दल वाटत असतंच ना…? तेव्हा ते दुःख ऐकून, समजून घेऊन त्यावर फुंकर घालणारं कुणीतरी भेटायची आपल्याला गरज असते आणि त्यात ज्याला आपण दुःख म्हणतोय ते मुळात दुःखच नाही असं काहीतरी सांगणारं समजावणारं कुणीतरी आपल्याला…
श्री. विजयकुमार अणावकर यांनी पाठवलेली प्रतिक्रिया मराठी रंगभूमी, सिनेमा आणि टीव्ही मालिका या तिहेरी प्लॅटफॉर्मवर सराईतपणे वावरणारा नामवंत ज्येष्ठ विनोदी कलाकार प्रदीप पटवर्धन याच्या अचानक जाण्याने कलाजगतात मोठी पोकळी निर्माण झालेली आहे. त्यांच्या अभिनयाच्या उत्स्फूर्त शैलीमुळे रंगमंचावर ऊर्जा सळसळत असलेली पहायला मिळे. ‘मोरूची मावशी’ या लोकप्रिय नाटकाने एकेकाळी रंगमंचावर धुमाकूळ घातला होता, त्यामध्ये प्रदीप पटवर्धन यांनी साकारलेला ‘भैया’ देखील तोडीसतोड भाव खाऊन लोकप्रिय झाला होता. टूरटूर, दिली सुपारी बायकोची, चल काहीतरीच काय! सारख्या अनेक नाटकातील त्यांच्या विनोदी भूमिका गाजल्या होत्या. तसेच जमलं हो जमलं, एक फुल चार हाफ, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय आणि नवरा माझा नवसाचा इत्यादी मराठी चित्रपटात देखील त्यांनी अभिनयाची…