कोरोनाच्या अचानक उद्भवलेल्या जागतिक संकटामुळे, तब्बल दीड वर्षे, रंगभूमी आणि पर्यायाने रंगकर्मींचे कामकाज स्थगित झाले होते. मात्र आज हळूहळू का होईना पण रंगभूमी पुन्हा मोकळा श्वास घेऊ लागली आहे. व्यावसायिक व प्रायोगिक अशा दोन्ही स्तरांवर रंगकर्मी पुन्हा नव्या जोमाने कामावर रुजू होऊ लागले आहेत. ‘दादा, एक गुड न्यूज आहे’, ‘व्हॅक्युम क्लीनर’, ‘तू म्हणशील तसं’ अशी काही व्यावसायिक नाटकं सुरू झाली आहेत. तर ‘बार्दो’ सारखी झी नाट्य गौरव पुरस्कृत प्रायोगिक नाटकंही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. अशातच, कित्येक वर्षे तमाम रंगकर्मींच्या मनात अग्रस्थानी असलेली राज्य नाट्य स्पर्धाही डिसेंबरपासून सुरू होईल, अशी घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी केली. कोरोनाच्या…
Author: प्रेषित देवरुखकर
देशाच्या जडघडणीत महत्वाची भूमिका निभावणाऱ्या नेत्यांना, देशभक्तांना कालबाह्य व संदर्भहीन ठरवण्याचे सर्वकष प्रयत्न सद्ध्याच्या सत्ताधाऱ्यांकडून होत असताना टिळक, आगरकरांसरख्या उत्तुंग अशा सामाजिक/राजकीय क्षेत्रातील धुरिणांवरचे ‘टिळक आणि आगरकर’ हे नाटक रंगमंचावर आणण्याचे प्रयोजन म्हणजे एकेकाळी देशासाठी झिजलेल्या या धुरिणांची काय उंची होती व आत्ताचे तथाकथित नेते काय योग्यतेचे आहेत याची तुलना सूज्ञांनी मनोमन करावी, हा नाटककर्त्याचा हेतू असावा कदाचित!आधी स्वातंत्र्य की आधी सामाजिक सुधारणा या प्रमुख प्रश्नांवरून टिळक व आगरकर या दोन जिवलग मित्रांमधले मतभेद विकोपाला कसे गेले हे या नाटकात मर्मभेदकपणे मांडले आहे. आधी स्वातंत्र्य मिळवू, परकीय राजसत्तेचे जोखड मानेवरून भिरकावून देऊ, सुधारणा काय नंतरही करता येईल अशी टिळकांची मते…
कोरोनाचे भीषण स्वरूप ओसरून नाट्यसृष्टी पुन्हा नव्या जोमाने सुरू होईल असं चित्र काही दिवसांपूर्वी दिसत होतं. प्रशांत दामले, भरत जाधव अशा काही आघाडीच्या नाट्यकलाकारांनी पुढाकार घेऊन नाटकाचे प्रयोग सुरूही केले होते. परंतु तितक्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मारा झाला आणि हळूवार डोकं वर काढू पाहणारी नाट्यसृष्टी पुन्हा शांत झाली. पण आता दुसऱ्या लाटेचा प्रभाव ओसरू लागला आहे. लसीकरणही सर्वत्र वेगाने सुरू आहे. अशा परिस्थितीत रंगभूमीचा पडदाही हळूहळू उघडावा अशी विनंती महाराष्ट्रभरातील आघाडीच्या रंगकर्मींनी मा. मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विविध कार्यक्षेत्रांवर निर्बंध लागू करण्यात आले. यामध्ये नाट्यसृष्टीचे आणि पर्यायाने नाट्यकर्मींचे सगळ्यात मोठे नुकसान झाले. रंगभूमीचा पडदा बऱ्याच काळासाठी बंद राहिला. तरीही…
मराठी रंगभूमीवरील संगीत नाटकांच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिले जावे असे एक नाव म्हणजे थोर गायक नट नारायण श्रीपाद राजहंस अर्थात बालगंधर्व. आज २६ जून रोजी बालगंधर्व यांची आज १३३ वी जयंती. बालगंधर्व यांनी त्यांच्या उत्कृष्ट अभिनयातून रंगभूमीला अजरामर संगीत नाटकांचा साज चढविला. त्यांच्या इतका चोख स्त्रीभूमिका वठविणारा कलाकार सापडणे कठीणच. अशा या ज्येष्ठ रंगकर्मीच्या जयंतीचे औचित्य साधून ‘अभिजात’ नामक संस्थेने ‘बालगंधर्व स्वराभिनाट्य’ नावाचा एक अनोखा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीस आणला आहे. या कार्यक्रमात बालगंधर्वांच्या जीवनावरील नाटकांचे पदांसहित अभिवाचन होणार आहे.‘बालगंधर्व स्वराभिनाट्य’ हा कार्यक्रम ऑनलाईन माध्यमातून प्रेक्षकांना बघता येणार आहे. सुमारे अडीच तासांचा हा रसभरीत कार्यक्रम प्रेक्षक ३० जूनपर्यंत कधीही तिकीट काढून बघू…
अभिजात कलासंपदा सांस्कृतिक प्रतिष्ठान व एम जे प्रोडक्शन यांनी मराठी अभिवाचन स्पर्धा आयोजित केली आहे. स्पर्धेच्या आयोजकांनी `वाचा आणि अभिव्यक्त व्हा!’ असे आवाहन तमाम रसिक प्रेक्षकांना केले आहे. सध्याचे तणावग्रस्त वातावरण लक्षात घेता मायबाप रसिक प्रेक्षकांना घर बसल्या उत्तम लेखनाचा आस्वाद घेता येणे ही एक सुखद पर्वणीच समजावी लागेल. त्याच सोबत कलाकारांना वाचिक अभिनयाचा होणारा सराव ही या स्पर्धेची जमेची बाजू!या अभिवाचन स्पर्धेचे नियम व अटी पुढे दिलेल्या पोस्टरप्रमाणे असणार आहेत.सर्व नियम व अटी वाचून स्पर्धकांनी १० जून आधी व्हिडिओ अपलोड करावयाचे आहेत. अधिक माहितीसाठी ९६६५४४३७३९/ ७०३९५०२७४० या क्रमांकावर संपर्क साधावा.
ज्येष्ठ नाट्य लेखक विजय तेंडुलकर यांच्या ‘पाहिजे जातीचे‘ या नाटकाचे हिंदी अनुवादित रूपांतर म्हणजेच ‘जात ही पूछो साधू की’ मध्य प्रदेशातील एका नाट्यमहोत्सवात सादर होणार होते. ‘इंडियन पीपल्स थिएटर असोसिएशन‘ म्हणजेच इप्टा या संस्थेतर्फे हा नाट्य महोत्सव आयोजित करण्यात आला होता. परंतु बजरंग दलाकडून या नाटकाच्या प्रयोगांवर बंदी आणण्यात आल्याने संस्थेला हा नाट्यमहोत्सव रद्द करण्याचा निर्णय घ्यावा लागला.लोकसत्ता वृत्तपत्राच्या काही सूत्रांनुसार, नाटकाच्या शीर्षकामध्ये फक्त “साधू” हा शब्द असल्याने या नाटकावर बंदी आल्याचेही लक्षात येत आहे. परंतु, इतकी वर्षे मनाशी जोपासलेल्या या सुंदर कलाकृतीवर निरर्थक कारण देऊन अचानक बंदी आणण्यात आल्याने नाट्यसृष्टीमध्ये असंतोषाचे वातावरण पसरले आहे.महाराष्ट्र टाईम्सच्या प्रतिनिधींशी बोलताना ज्येष्ठ रंगकर्मी…