‘स्वरा’ ही एक सुशिक्षित, स्वतःवर पूर्णपणे विश्वास असलेली, आत्मनिर्भर आणि छानश्या कुटुंबात पण वडिलांच्या छत्रछायेशिवाय वाढलेली मुलगी, मात्र प्रेमाच्या बाबतीत कायम अपयशीच. तिची आई मंजुषा पतीच्या निधनानंतर आयुष्याकडे नव्याने बघण्याचा प्रयत्न करतेय. अनपेक्षितपणे तिची कॉलेजचा मित्र यशवंत पाटील बरोबर झालेली भेट. स्वराच्या आयुष्यात नव्याने आलेला तिच्या ऑफिसमधला सहकारी मित्र कपिल. या चौघांच्या आयुष्यात एकत्रितपणे घडणार्या गोष्टी अगदी अलगदपणे उलगडून आणि हसत खेळत मांडणी करणाऱ्या या नाटकात सहजीवनाचा खरा अर्थ उलगडलेला पहायला मिळतो. लेखक आदित्य मोडक आणि दिग्दर्शक नितीश पाटणकर यांच हे पहिलच व्यावसायिक नाटक, त्यांनी दोन पिढ्यांच्या नातेसंबंधाचा आणि समाजाकडे बघण्याचा दृष्टीकोन मांडण्याचा केलेला प्रयत्न प्रचंड यशस्वी झालेला आहे. कपिलच्या…
Author: प्रेषित देवरुखकर
संपूर्ण महाराष्ट्रात सध्या कडाक्याचा उन्हाळा जाणवतोय. अशातच लहान मुलांना सुट्ट्या पडल्यामुळे नाटकांना जाणाऱ्या प्रेक्षकांची संख्या वाढताना दिसतेय. याच कारणामुळे, बऱ्याच नाटकांच्या प्रयोगांच्या संख्येतही वाढ झालेली दिसतेय. काही नाटकांचे महाराष्ट्रभर दौरेही सुरू आहेत. परंतु, या दौऱ्यांमध्ये कलाकारांना बऱ्याच संकटांना तोंड द्यावं लागत आहे, असं दिसतंय. वैभव मांगले या हरहुन्नरी कलाकाराने एका पोस्टद्वारे फेसबुकवर अतिशय परखड शब्दात या सर्व प्रकारावर टीका केली आहे. ‘संज्या छाया’ नाटकाचा दौरा सुरू होता. या दौऱ्यादरम्यान नाटकाच्या संपूर्ण टीमला खूपच वाईट अनुभव आला. वैभव मांगलेंनी या संपूर्ण प्रकाराबद्दल नाराजी व्यक्त करत फेसबुकवर एक पोस्ट लिहिली आहे. मुंबईबाहेरील बऱ्याच नाट्यगृहात AC व्यवस्थित सुरू नसल्याने प्रयोगादरम्यान कलाकारांचं आणि प्रेक्षकांचं…
‘तू तेव्हा तशी’ या मालिकेमधून ‘नील’च्या भूमिकेत दिसणारा स्वानंद केतकर आता घराघरात पोहोचला आहे. राधाची काळजी घेणारा, तिच्यावर जिवापाड प्रेम करणारा नील कमी वेळात अगदी सहजपणे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. याच तुमच्या लाडक्या कलाकाराची ‘मुशाफिरी’ ही एकदम हटके नाट्यमैफिल सद्ध्या रंगभूमीवर प्रेक्षकांची भरपूर वाहवा मिळवतेय. येत्या २२ मार्च रोजी म्हणजेच गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर वेध प्रोडक्शन आणि कलाश्रय संयुक्त विद्यमाने सादर करीत आहेत ‘मुशाफिरी’ चा प्रयोग रवींद्र नाट्य मंदिर येथे दुपारी ४ वाजता! या नाट्यकृतीची तिकिटे आपल्याच वेबसाईटवर पुढील लिंकवर उपलब्ध आहेत. Book Mushafiri Tickets Here मुशाफिरी महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व अर्थात पु. ल. देशपांडे स्वर्गातून पळून पृथ्वीवर येतात. पृथ्वीवर भ्रमण करताना त्यांना…
रोम रोम रंगमंच आणि ऑर्फियस स्टुडिओ यांची निर्मिती असलेलं ‘पाच फुटाचा बच्चन’ या नव्याकोऱ्या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग यशवंतराव चव्हाण नाटयसभागृहात ५ फेब्रुवारी रोजी सादर झाला. या नाटकाचे लेखन कौस्तुभ रमेश देशपांडे याने केले असून दिग्दर्शन आणि सादरीकरण श्रुती मधुदीपने केले आहे. ‘पाच फुटाचा बच्चन’ हे नाटक अत्यंत समकालीन आहे आणि म्हणूनच वर्तमानातील पेच अगदी मनोरंजक पद्धतीने आपल्यासमोर मांडणारं आहे. ही गोष्ट आहे एका गावातून आलेल्या तरुण मुलीची, जी अध्यात्मिक क्षेत्रात सुपरस्टार आहे. आपण सगळेचजण कुठे ना कुठेतरी पोचायचं, पुढे जायचं स्वप्न बघत असतो, त्या दृष्टीने कष्ट घेत असतो मात्र पुढे जाताना आपल्या आत नेमकं काय काय होतं. आपल्या मूल्यांसोबत आपण…
मराठी रंगभूमी दिनानिमित्त ५ नोव्हेंबर रोजी थिएटर ऑफ रेलेवन्स शुभचिंतक आणि प्रयोगकर्ता प्रस्तुत करत आहेत रंगचिंतक मंजुल भारद्वाज लिखित आणि दिग्दर्शित नाटक गोधडी. हे नाटक पनवेल येथील वासुदेव बळवंत फड़के नाट्यगृह येथे सकाळी ११:३० वाजता सादर होणार आहे. या नाटकाबद्दल आपण लेखक-दिग्दर्शक मंजुल भारद्वाज यांच्याकडूनच जाणून घेऊया. रंगचिंतक मंजुल भारद्वाज रचित “गोधडी” हे नाटक गोधडी संस्कृतीचा आत्मशोध आहे. संस्कृती, काळ, माती आणि निसर्गासोबत विविध समाजातील सण, प्रथा, चालीरीती, परंपरा यांचा शोध घेऊन मानवी विवेकाचा नवा धागा विणते.” “गोधडी” भारताचा आत्मा आहे. भारताची विविधता हे नाटक स्पंदीत करते आणि आपल्यातील विवेकशीलतेला जागवते. या गोधडीत सामावले आहे आपले सारे जग. मनुष्याचे पाखंड…
‘Arogyam Dhanasampada Foundation’ या संस्थेतर्फे मालाडमध्ये एक प्रायोगिक रंगमंच उभारण्यात येणार आहे असे वृत्त काही दिवसांपूर्वी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचविले होते. ही माहिती देणारा लेख तुम्ही अद्याप वाचला नसेल तर या लिंकवर क्लिक करुन नक्की वाचा. ‘आरोग्यम धनसंपदा प्रायोगिक कलामंच’ असे या प्रायोगिक रंगमंचाचे उद्घाटन प्रख्यात अभिनेते मकरंद देशपांडे यांच्या हस्ते १६ ऑक्टोबर, २०२२ रोजी करण्यात आले. ज्यांनी पुढाकार घेऊन हा कलामंच उभारणे शक्य केले त्या अनघा म्हात्रे आणि प्रकाश म्हात्रे यांचीही सोहळ्याला उपस्थिती होती. तसेच डॉ. अनिल बांदिवडेकर व संभाजी सावंतही व्यासपीठावर उपस्थित होते. मालाडमध्ये प्रायोगिक कलामंच सुरू होणे ही सर्व रंगकर्मींसाठी आणि प्रेक्षकवर्गासाठी अत्यंत जमेची बाजू ठरणार आहे. हे…
तमाम कलाकारांसाठी एक खुशखबर आहे. मालाडमध्ये लवकरच खुला होत आहे एक रंगमंच! मालाड पश्चिम मधील ‘आरोग्यम धनसंपदा’ या संस्थेच्या अध्यक्षा अनघा म्हात्रे यांनी पुढाकार घेऊन ‘आरोग्यम धनसंपदा प्रायोगिक कलामंच’ उभारला आहे. आरोग्य, खेळ, गायन आणि नृत्य अशा विविध कलागुणांना जोपासणाऱ्या या संस्थेने नाट्यकलेला साद घालत कलाक्षेत्रात एक नवा टप्पा गाठला आहे. या नव्या रंगमंचाच्या शुभारंभाप्रीत्यर्थ सात दिवसीय नाट्यमहोत्सवाची घोषणाही करण्यात आली आहे. या प्रायोगिक नाट्यमहोत्सवाचे उदघाटन अभिनेता-दिग्दर्शक मकरंद देशपांडे यांच्या हस्ते होणार आहे. उदघाटन सोहोळयाचे सूत्र संचालन कवी अरुण म्हात्रे करणार आहेत महोत्सवाच्या देणगी प्रवेशिका www.rangabhoomi.com/tickets येथे उपलब्ध आहेत. लेखाच्या शेवटी दिलेले पर्याय वापरूनही तुम्ही या प्रवेशिका बुक करू शकता.…
तमाम नाट्यकर्मींसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे! आपल्या सगळ्यांच्याच लाडक्या गिरणगावात, रंगकर्मींसाठी हक्काचं असं एक नवं कोरं व्यासपीठ लवकरच उदयास येणार आहे. गिरगाव येथील बिर्ला क्रीडा केंद्राच्या सुमारे ३ लाख ५० हजार चौरस फूट क्षेत्रावर, मराठी रंगमंच कला दालनासाठी भव्य स्वरूपात पुनर्विकास करून तिथे ‘मराठी नाट्य विश्व’ या नावाने नाट्यगृह व मराठी रंगभूमी संग्रहालयाची इमारत दोन टप्प्यांमध्ये साकारली जाणार आहे. या इमारतीची झलक दाखवणारा हा व्हिडीओ नक्की बघा. Marathi Natya Vishwa, Mumbai — Info & Building Preview • मराठी नाट्य विश्व (Sangrahalay + Theatre) https://www.youtube.com/watch?v=BmA1y4YRcPQ मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते वर्षा येथे आज २७ मे रोजी, मुंबईत उभ्या राहणाऱ्या…
५ नोव्हेंबर, २०२१ रोजी पाडवा व मराठी रंगभूमी दिनाचे औचित्य साधून जिगिषा अष्टविनायक निर्मित ‘संज्या छाया’ या नाटकाची घोषणा करण्यात आली होती. घोषणा करताना या नाटकाचे लेखक प्रशांत दळवी असून दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी असल्याचे जाहीर करण्यात आले होते. प्रशांत दळवी यांचे लेखन आणि चंद्रकांत कुलकर्णी यांचे दिग्दर्शन म्हणजे दर्जेदार नाटकाची १००% हमी! लॉकडाऊननंतर या नाटकाची घोषणा झाल्यावर नाटकातील कलाकारांची नावे मात्र गुलदस्त्यात ठेवण्यात आली होती. आजच, या नाटकातील कलाकारांची नावे अनोख्या अंदाजात जाहीर करण्यात आली आहेत. विनोदी अभिनयाचं ‘वैभव’ जपणारा वैभव मांगले आणि विनोद ‘निर्मिती’ च्या कक्षा रुंदावणारी निर्मिती सावंत यांची ‘भन्नाट’ जोडी साकारणार… ‘संज्या छाया’ या घोषणेवरून आपण असा…
१ जानेवारी, २०२२ पासून सुरू होणाऱ्या राज्य नाट्य स्पर्धा २०२२ आता १५ दिवस पुढे ढकलण्यात आल्या आहेत. मागच्या आठवड्यात घोषित झालेल्या स्पर्धेत प्रवेशिका दाखल करण्याची शेवटची तारीख ३० नोव्हेंबर अशी जाहीर करण्यात आली होती व स्पर्धा १ जानेवारी पासून सुरू होणार होती. परंतु, अनेक रंगकर्मींनी आणि संस्थांनी प्रवेशिका दाखल करण्याची व सादरीकरणाची तारीख पुढे ढकलण्याची मागणी केली होती. या मागणीचा विचार करून सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी राज्य नाट्य व बालनाट्य स्पर्धा १५ जानेवारीपासून सुरू होतील असे जाहीर केले आहे. ह्याच बरोबर प्रवेशिका भरण्याची मुदत सुद्धा ३० नोव्हेंबर ऐवजी १५ डिसेंबर करण्यात आली आहे, जेणेकरून जास्तीत जास्त संस्थांना ह्या स्पर्धेत…
[Update: १६ ऑगस्ट, २०२२] ६१ वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा २०२२-२०२३ – संपूर्ण माहिती, नियमावली व प्रवेश अर्ज मिळवण्यासाठी येथे क्लिक करा. [Update: ३० मे, २०२२] राज्य नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीचा निकाल जाहीर झालेला आहे. निकाल जाणून घेण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा. ६० व्या महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीचा निकाल जाहीर! [Update: २३ एप्रिल, २०२२] राज्य नाट्य स्पर्धेची अंतिम फेरी कोल्हापुरात घेतली जाईल. अधिक माहितीसाठी पुढील लिंकवर क्लिक करा. कोल्हापूरात रंगणार हीरक महोत्सवी राज्य नाट्य स्पर्धेची अंतिम फेरी! हीरक महोत्सवी वर्षात पदार्पण केलेल्या राज्य नाट्य स्पर्धेची घोषणा झाल्यावर तमाम रंगकर्मींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. सर्वच नाट्यसंघ…
चिन्मय मांडलेकर लिखित-दिग्दर्शित व अष्टविनायक निर्मित ‘व्हॅक्यूम क्लिनर’ हे सुपरहीट धमाल नाटक पुन्हा रंगभूमीवर आले आहे. या नाटकाचे प्रयोग यापूर्वीही हाऊसफुल होत होते आणि आजही त्याच ताकदीने हे नाटक प्रेक्षकांचे हाऊसफुल प्रेम संपादित करण्यात यशस्वी होताना दिसत आहे. म्हणूनच, कलाकारांचा उत्साह वाढवण्यासाठी १४ नोव्हेंबर, २०२१ रोजी मास्टर दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह, विले-पार्ले येथे सादर झालेल्या प्रयोगा दरम्यान रंगभूमी.com च्या टीमने ‘व्हॅक्यूम क्लिनर’ च्या सर्व कलाकारांची भेट घेतली. नाटकाबद्दल आणि कलाकारांच्या व्यक्तिरेखांबद्दल जाणून घेण्यासाठी प्रस्तुत विडिओ नक्की बघा. सगळ्यात महत्वाचं म्हणजे सर्वच कलाकारांनी प्रेक्षकांसाठी एक छान संदेश दिलेला आहे. तोही ऐका! ‘व्हॅक्यूम क्लिनर’ नाटकाचे समीक्षण जर अद्याप तुम्ही वाचले नसेल तर पुढील…