बदलत्या काळाबरोबर काही बदललं नसेल तर ती म्हणजे स्त्रियांची परिस्थिती! ह्याचे जिवंत दाखले रंगभूमीने प्रत्येक काळात नाट्यरूपाने आपल्या समोर आणले आहेत. अगदी पौराणिक काळातील द्रौपदीपासून आजच्या आधुनिक स्त्री पर्यंत स्त्रियांना फक्त आणि फक्त सोसावंच लागलं आहे हे दर्शवणारी कितीतरी नाटकं होऊन गेली आणि त्यांनी प्रेक्षकवर्गाला समाजातील भयाण परिस्थितीवर विचार करायला भाग पाडलं. आजही ती नाटकं बघितली की काळ बदलला असला तरी स्त्रियांची वेळ अजून बदललेली नाही हे ठळकपणे लक्षात येतं. स्त्रियांच्या मूलभूत हक्कांवर आणि त्यांच्यावर झालेल्या अत्याचारांना वाचा फोडणारी अशीच काही सुप्रसिद्ध नाटकं तुमच्या भेटीला आणत आहोत! सखाराम बाईंडर शांतता! कोर्ट चालू आहेकुसुम मनोहर लेले अखेरचा सवालकाचेचा चंद्रखरं सांगायचं तर…श्यामची…
Author: गायत्री देवरुखकर
घर बसल्या चहाचा कप हातात घेऊन मनोरंजक आणि खुमासदार विनोदी नाटकं एकापाठोपाठ बघायला मिळाली तर अजून काय हवंय! तुमचा एखादा रविवार आम्ही अशीच काही धमाल मराठी विनोदी नाटकं दाखवून pre-book करायचं ठरवलंय. म्हणूनच, पुढे दिलेली नाटकांची यादी नक्की पहा. काही नाटकं तुम्ही पहिलीदेखील असतील आणि पुन्हा बघायची ईच्छाही झाली असेल. तुम्ही पहा आणि इतरांबरोबरही शेअर करा.एक डाव भटाचाशांतेचं कार्ट चालू आहेसौजन्याची ऐशी तैशी हसवा फसवी मोरुची मावशीतरुण तुर्क म्हातारे अर्क
समृद्ध आणि सशक्त अशा मराठी रंगभूमीने अनेक उत्तमोत्तम नाटके आतापर्यंत रसिक प्रेक्षकांसमोर सादर केली आहेत. आजच्या घडीला “अमर फोटो स्टुडिओ ” हे नाटक असंच सद्या रसिक प्रेक्षकांच्या पसंतीला उतरलेले दिसतं मनस्विनी लता रविंद्रची संहिता असलेलं, निपुण धर्माधिकारी यांचं दिग्दर्शन लाभलेलं हे रंजक नाटक, प्रदिप मुळ्येचं कल्पक नेपथ्य, शीतल तळपदेची सुयोग्य प्रकाशयोजना यामुळे एक वेगळीच उंची गांठते. सुव्रत जोशी, अमेय वाघ, पर्ण पेठे, पूजा ठोंबरे व सिद्धेश पूरकर यांचा भूमिकांना यथोचित न्याय देणारा पूरक अभिनय बऱ्यापैकी लक्षात रहातो.टाइम मशीन किंवा कालयंत्र या चमत्कृतीपूर्ण विषयावरील एच जी वेल्सची “टाइम मशीन” कादंबरी, जे. बी. प्रिस्टलेचे शोज, फॉक्स चॅनेलवर सद्या सुरु असलेली “लॉस्ट” टीव्ही…
मराठी रंगभूमीला लाभलेल्या चतुरस्त्र व्यक्तिमत्वांमध्ये अग्रस्थानी कोणतं नाव येत असेल तर ते म्हणजे “दिलीप प्रभावळकर”! मग ते त्यांचं लिखाण असो, अभिनय असो वा त्यांनी साकारलेल्या स्त्री व्यक्तिरेखा असोत ! वेगवेगळ्या रूपांमध्ये येऊन प्रत्येक भूमिकेला १००% न्याय देणारा हा अभिनेता आपल्याला लाभला हे आपले अहोभाग्यच समजावे लागेल. महत्वाचं म्हणजे स्त्री व्यक्तिरेखा साकारताना त्यांनी आजवर एकदाही मर्यादा ओलांडलेली नाही. कोणत्याही टप्प्यावर नारीशक्तीचा अपमान होऊ दिलेला नाही. रंगमंचावर उभी केलेली प्रत्येक भूमिका वठवली ती संपूर्ण अभ्यास करूनंच! तिथून पुढे या बहुगुणी अभिनेत्याने सिनेमाकडे झेप घेतली ती सुद्धा स्वतःच्या अनोख्या शैलीत! कधी महात्मा गांधीजी बनून खुद्द मुन्नाभाईला शिकवण दिली, तर कधी राजस्थानी गावकरी बनून…
रंगभूमीने आपल्याला काही किमयागार नाटकं दिली आणि कलाकारही दिले. अशा कलाकारांची यादी बनवायची झालीच तर एक नाव अगदी ठळकपणे समोर येईल. हास्यरसाने परिपूर्ण नाटकांचा खजिना! लाखो प्रेक्षकांच्या मनावर तब्बल ३७ वर्ष गारुढ करून राहिलेला विनोदवीर! आणि लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये एक नाही दोन नाही तर तब्बल पाच रेकॉर्डस् केलेला नाट्यवीर म्हणजेच… प्रशांत दामले!विकिपीडिया सांगतं की, लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये प्रशांत दामले यांच्या नावावर तब्बल पाच रेकॉर्ड्स नोंदली गेली आहेत. त्यांमध्ये २४ डिसेंबर, इ.स. १९९५ रोजी एकाच दिवशी तीन वेगवेगळ्या नाटकांचे चार प्रयोग, इ.स. १९९५ साली ३६५ दिवसांत ४५२ प्रयोग, इ.स. १९९६ साली ३६५ दिवसात ४६९ प्रयोग व १८…
मराठी रंगभूमीने प्रेक्षकांना आणि कलाकारांना नेहमीच भरभरून दिलं आहे. कधी भरभरून हसवलंय तर कधी धीरगंभीर विचारांनी अंतर्मुख होण्यास भाग पाडलं आहे. एवढंच नाही तर विषय सामाजिक असो वा कौटुंबिक, विनोदी असो अथवा राजनैतिक, ते नाटक जिवंतपणे तुमच्या समोर उभं करून तुम्हाला त्याचाच एक भाग असल्याची जाणीव करून दिली आहे. मात्र, रंगभूमीशी जोडलेली ही प्रेक्षकाची नाळ आता कुठेतरी तुटत चालल्याचा भास होत आहे आणि म्हणूनच, आज रंगभूमीला आपली गरज आहे!कलाकारांच्या अभिनयाने सजलेल्या आणि प्रेक्षकांच्या टाळ्यांनी बहरलेल्या जिवंत रंगमाचाची जागा आता ऑनलाईन streaming ने घेतलेली दिसून येत आहे. Netflix, Prime च्या भाऊगर्दीत नाटकाचा प्रेक्षक कुठेतरी हरवून गेला आहे. म्हणूनच की काय, तुमच्याच…
माननीय श्री. दिलीप सर,प्रयोग मालाड संस्थेद्वारे आयोजित “लेखक एक नाट्यछटा अनेक” या उपक्रमाअंतर्गत मला तुमची मुलाखत घेण्याची संधी मिळाली आणि माझे कितीतरी वर्षांचे तुम्हाला भेटण्याचे स्वप्न पूर्ण झाले. लहानपणी मी तुमचं हसवा फसवी हे नाटक पहिलं आणि मी तुमची “फॅन” नाही म्हणता येणार पण शिष्य किंवा भक्तच झाले. मला नाटक, रंगमंच याबद्दलची ओढ आणि आवड निर्माण होण्यामागे तुम्ही एक मोठं कारण आहात असं मी समजते. तुम्हाला भेटण्या अगोदर तुमच्या बद्दल मनात जी छबी रेखाटली होती ती अगदी तंतोतंत खरी ठरली. तुम्ही स्वतःमध्येच अभिनयाची, सकारात्मक व्यक्तिमत्वाची एक चालती-फिरती कार्यशाळा आहात असं मला नेहमीच वाटत आलं आहे आणि तुम्हाला भेटल्यावर त्याचा एक…