गेला माधव कुणीकडे, प्रियतमा, भ्रमाचा भोपळा अशा गाजलेल्या मराठी नाटकांतील अभिनेत्री सौ. माधवी गोगटे यांचे वयाच्या ५८ व्या वर्षी निधन झाले आहे. मुंबईतील सेव्हन हिल्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कोरोनाच्या संसर्गामुळे त्यांचे निधन झाले असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या बातमीमुळे संपूर्ण नाट्य, चित्रपट व मालिकांच्या विश्वात शोककळा पसरली आहे. अभिनेते प्रशांत दामले यांच्यासह ‘गेला माधव कुणीकडे’ तसेच ‘अंदाज आपला आपला’, ‘भ्रमाचा भोपळा’ ही त्यांची काही गाजलेली नाटकं. प्रशांत दामले यांनी फेसबूकवर त्यांच्या या लाडक्या सह-अभिनेत्रीला श्रद्धांजली देत म्हटले आहे की, “सौ माधवी गोगटे… माझी आवडती सहकलाकार. गेला माधव कुणीकडे, प्रियतमा, बे दुणे पाच, लेकुरे उदंड जाली… जवळ…
Author: गायत्री देवरुखकर
नाट्यगृहे सुरू झाल्यानंतर व्यावसायिक रंगभूमीसोबतच प्रायोगिक रंगभूमीवरील प्रयोगांनाही नव्या जोमाने सुरुवात झाली आहे. पद्मविजय प्रोडक्शन, करनाटकू व राधा क्रीएशन्स (आदित्य संजयराव आणि हृषिकेश गिरीश कुलकर्णी) निर्मित ‘नवरा आला वेशीपाशी’ या प्रायोगिक दीर्घांकाचेही रंगभूमीवर लवकरच पदार्पण होणार आहे. यश नवले आणि राजरत्न भोजने लिखित-दिग्दर्शित ‘नवरा आला वेशीपाशी’ या दीर्घांकाचा शुभारंभाचा प्रयोग येत्या २८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ८ वाजता आचार्य अत्रे रंगमंदिर, कल्याण येथे सादर होणार आहे. यश नवले यांनी रंगभूमी.com च्या टीमशी या दीर्घांकाबद्दल बोलताना सांगितले की, “आपलं दुःख कुणालाच कळणार नाही, कुणी ते समजूनच घेऊच शकत नाही, असं प्रत्येकाला आपल्या कुठल्यातरी दुःखाबद्दल वाटत असतंच ना…? तेव्हा ते दुःख ऐकून, समजून…
लॉकडाऊनच्या विळख्यातून नुकतीच बाहेर पडलेली रंगभूमी हळूहळू उजळू लागलेली आहे. सर्वच रंगकर्मी नव्या उमेदीने, नव्या उत्साहाने आपल्या मनोरंजनासाठी कंबर कसून तयार होताना दिसतायत. अशातच प्रेक्षकांच्या भेटीस आतुर अशा बऱ्याच नाटकांचे प्रयोग लवकरच सुरू होणार आहेत. असंच एक तग धरून बसलेलं नाटक म्हणजे झी नाट्य गौरव पुरस्कृत ‘बार्दो’! शंतनू चंदात्रे लिखित आणि अनुप माने दिग्दर्शित बार्दो या नाटकाला झी नाट्य गौरव २०२० मध्ये सर्वाधिक ५ पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. सर्वोत्कृष्ट लेखन – शंतनू चंदात्रे सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन – अनुप माने सर्वोत्कृष्ट प्रकाशयोजना – यश नवले सर्वोत्कृष्ट नेपथ्य – अमेय भालेराव आणि सर्वोत्कृष्ट लक्षवेधी नाटक बार्दो या नाटकाचा पहिला प्रयोग शनिवार दि.…
सर्वकाही पूर्वपदावर येत असल्याचे चित्र सद्ध्या दिसून येत आहे. लसीकरण प्रक्रियेनेही वेग धरला आहे. अशातच रंगभूमीदेखील पुन्हा नव्याने जोमात सुरू होईल अशी आशा प्रत्येकाला वाटत आहे. आम्ही हीच आशा व्यक्त करत नाट्यप्रेमी व नाट्यकर्मींसाठी एक छोटासा उपक्रम घेऊन येत आहोत, ज्याचं नाव आहे ‘नाट्यReel’!आपल्या सर्वांना माहीतच आहे की इंस्टाग्राम ऍपवरील reel सद्ध्या खूपच चर्चेत आहे. पण नाटकातील संवाद घेऊन कोणी फारसे reel बनवलेले दिसत नाहीत. Reel म्हणजे १५ ते ३० सेकंदाचे छोटे व्हिडिओज. तुम्ही पुढील सूचनांचा वापर करून आमच्या या उपक्रमात सहभागी होऊ शकता.आमच्या इंस्टाग्राम अकाउंटला पुढील लिंकवर follow करा. https://instagram.com/myrangabhoomiतुमच्या आवडीच्या एखाद्या नाटक अथवा एकांकिकेतील कोणत्याही सीनचा १५ ते…
हिंद-मराठी संस्थेने सर्व कवींसाठी स्वरचित कविता सादर करून पारितोषिक जिंकण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. सगळ्यांना माहीत आहे की प्रत्येकाच्या मनात एक कवी लपलेला असतो. त्याच कवीला आवाहन करून लवकरात लवकर या स्पर्धेत सहभागी व्हा!काव्यगंध स्पर्धेत मराठी आणि हिंदी भाषेतील कविता स्वीकारल्या जाणार आहेत. या स्पर्धेचे नियम व अटी पुढीलप्रमाणे असणार आहेत.स्पर्धेची प्रवेश फी २५/- असून विजेत्यांना पुढीलप्रमाणे पारितोषिके देण्यात येणार आहेत.प्रवेशाची अंतिम तारीख १८ जुलै असून काहीही शंका अथवा अडचण असल्यास पुढील क्रमांकावर संपर्क साधावा.व्हिडिओ कसे पाठवाल?व्हिडिओ पाठवण्यासाठी तुम्ही पुढे दिलेल्या बटनवर क्लिक करून फॉर्म भरू शकता किंवा [email protected] या इमेल आयडीवर सादरीकरणाचे व्हिडिओ पाठवू शकता.
नाट्य, मालिका व सिनेसृष्टीतील तब्बल चाळीस वर्षांच्या यशस्वी कारकिर्दीमध्ये अभिनेता, नाट्य निर्माता आणि दिग्दर्शक अशा विविध भूमिकांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा बहुगुणी कलाकार म्हणजे विनय आपटे. ७ डिसेंबर, २०१३ रोजी हा गुणी कलाकाराचे दुःखद निधन झाले. १७ जून रोजी विनय आपटे यांची जयंती आहे. हेच औचित्य साधून १७ जून, २०२१ रोजी ‘विनय आपटे प्रतिष्ठान’तर्फे एक ऑनलाईन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. विजय केंकरे, संजय जाधव, सतीश राजवाडे, सुलेखा तळवलकर, नितीन वैद्य, भरत दाभोळकर अशा दिग्गज कलाकार मंडळींचा या परिसंवादात सहभाग असणार आहे. तसेच, अजित भुरे या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणार आहेत. प्रेक्षकांना ‘विनय आपटे प्रतिष्ठान’ च्या फेसबूक पेजवर १७ जून, २०२१ रोजी…
सत्कर्व मुंबई अयोजित ऑनलाईन नाट्यशिबिर पुन्हा एकदा सुरू होणार आहे. १५ मे, २०२१ रोजी ह्याचे पहिले नाट्यशिबिर झाले. त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला म्हणूनच पुन्हा एकदा शिबीर राबवण्याचा निर्णय संस्थेने घेतला आहे.पहिल्या शिबिराला सचिन गोताड (नेपथ्य व कलादिग्दर्शक),राजेश कोळंबकर (लेखक), सुनील परब (सिनेदिग्दर्शक), राजू वेंगुर्लेकर (नाट्यदिग्दर्शक), भूषण देसाई (प्रकाशयोजना), स्मिता कोळी (वेशभूषा), श्रीनाथ म्हात्रे (संगीत) तसेच सुनील गोडबोले उर्फ अप्पा (अभिनय) ह्यांनी मार्गदर्शन करून सर्व नवोदित कलाकारांना ऊर्जा व प्रेरणा दिली.२० जून ते २८ जून २०२१ यादिवशी संध्याकाळी ७ ते ९ वाजेपर्यंत पुन्हा एकदा ह्या ऑनलाईन नाट्यशिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. संपूर्ण शिबिराची फी रु. १५००/- असणार आहे. फी भरण्याची अंतिम…
लॉकडाऊनमुळे प्रेक्षकांना नाट्यगृहात जाऊन कलाकारांची भेट घेता येत नसल्याने विजय कदम, गिरीश ओक असे बरेच प्रख्यात रंगकर्मी ऑनलाईन माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस आले. या यादीमध्ये आता अजून एका ज्येष्ठ रंगकर्मीचे नाव सामील होणार आहे. ते नाव म्हणजे पुरुषोत्तम बेर्डे!पुरुषोत्तम बेर्डे त्यांच्या नाटक आणि चित्रपट सृष्टीतील इतक्या वर्षांच्या अनुभव व आठवणींनी समृध्द अशी एक वाद्यसंगीतमय मैफल म्हणजेच ‘पुरुक्रमा’ घेऊन १३ जून, २०२१ रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. पुरुक्रमाचे यापूर्वी नाट्यगृहातही बरेच प्रयोग झाले आहेत. आता घर बसल्या प्रेक्षकांना या कार्यक्रमाचा आस्वाद घेता येणार आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ‘पुरुक्रमा’मधून पुरुषोत्तम बेर्डे यांना मिळालेली सगळी रक्कम ते नाट्य समूहाच्या निधीला देणार आहेत. पुरुषोत्तम…
श्री विघ्नहर्ता प्रतिष्ठानतर्फे एकांकिका लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा ऑनलाईन माध्यमातून घेतली जाणार आहे.एकांकिका पाठवण्याची अंतिम तारीख ३० जून आहे. १५ जुलै, २०२१ रोजी स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे.स्पर्धेच्या नियम व अटी पुढीलप्रमाणे असणार आहेत.नाट्यमंचावरील पडदा सद्ध्या पडलेला असला तरी ही स्पर्धा म्हणजे रंगभूमीच्या भविष्यासाठीची तरतूद समजता येईल. या स्पर्धेतून रंगभूमीला अधिकाधिक सशक्त आणि मनोरंजक एकांकिका मिळतील अशी आशा आपण व्यक्त करू शकतो. त्यामुळे त्वरा करा! तुमच्या लेखणीला धार येऊ द्या. लवकरात लवकर तुमचे लेखन आयोजकांपर्यंत पोहोचवा.
ठाण्यातील अजेय संस्था दरवर्षी ‘झपूर्झा’ नावाचा कार्यक्रम करत असते. गेल्यावर्षी लॉकडाऊन असून सुद्धा सर्वात पहिल्यांदा झपूर्झा ‘वसुधैव कुटुंबकम’ या थीम अंतर्गत १५ ऑगस्ट, २०२० रोजी ऑनलाईन सादर झाला. या वर्षी अजेय संस्था Mix Media Theater अंतर्गत झपूर्झा ‘हसले मनी चांदणे’ या थीमनुसार रविवार, २७ जून, २०२१ रोजी झपूर्झा होणार आहे. याची संकल्पना, लेखन व दिग्दर्शन डॉ. क्षितिज कुलकर्णी यांचे असून निर्माता गौरव संभुस आहेत.झपूर्झाचे हे ९वे गौरवशाली वर्ष. दर वर्षी झपुर्झा नव्या कलाकारांनी, व्यवस्थापनाने, तंत्रज्ञांनी, कल्पनांनी, संहितांनी रीलोड होतो. कल्पना ही माणसाला मिळालेली सुपर पॉवर. ही कल्पना आपल्या प्रत्येकाच्या ओठावर, गालावर हलकं हसू आणतेच आणते. सध्याच्या निराशेच्या वातावरणात हीच सुपर…
सेजल एन्टरटेन्मेंट्स फिल्म्स संस्थेने ‘हास्य जल्लोष’ ही ऑनलाईन एकपात्री विनोदी अभिनय स्पर्धा आयोजित केली आहे. लॉकडाऊनच्या काळात कौटुंबिक, व्यावसाईक ताण तणाव दूर करण्याच्या हेतूने या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे.https://youtu.be/t5hpQy9Sn5sप्रवेश विनामूल्यविजेत्यांना पुढीप्रमाणे पारितोषिके देण्यात येणार आहेत.प्रथम : १०००/- आणि E- Certificateद्वितीय : ७००/- आणि E- Certificateतृतीय : ५०० /- आणि E- Certificateप्रेक्षक पसंती ( you tube views ) : ५००/- आणि E- Certificateप्रवेशाची अंतिम तारीख : १५ जून २०२१स्पर्धेच्या नियम व अटी पुढीलप्रमाणे आहेत.स्पर्धेसाठी वयाची मर्यादा नाही.व्हिडीओ जास्तीत जास्त ५ मिनिटांचा असावा.व्हिडीओचा आवाज स्पष्ट असावा.व्हिडीओ मराठी किंवा हिंदी भाषेत असावा.व्हिडीओ कोणत्याही प्रकारे Edit केलेला नसावा.तुम्ही पाठवलेला व्हिडीओ हा कोणत्याही you…
रंगगंध कलासक्त न्यास, चाळीसगाव या संस्थेद्वारे गेले काही दिवस एक अभिनव उपक्रम ऑनलाईन माध्यमातून राबविला जात आहे. या उपक्रमाचे नाव ‘गीत मेरे मनके‘ असे आहे. नावावरून तुमच्या लक्षात आलंच असेल की या कार्यक्रमात संगीताची एक सुरेल मैफिलच रंगणार आहे. पण या उपक्रमात तुम्हाला निव्वळ गाणेच नाही तर त्या गाण्याचे रसग्रहणही ऐकावयास मिळणार आहे. रसग्रहण म्हणजे थोडक्यात सांगायचे झाले तर गाणे संपूर्णपणे समजून घेणे. गीतकराला गाण्यातून काय सांगायचे आहे म्हणजेच तिची मध्यवर्ती कल्पना, भावना, विचार, नादमाधूर्य, चाल, अलंकार, गाण्याचा प्रकार, सूचकता, विडंबन या साऱ्याचा अभ्यास म्हणजेच रसग्रहण. ही आगळवेगळी संकल्पना महेश सोनवणे यांची आहे.रविवार दिनांक १४ मार्च रोजी या अभिव्यक्ती सभेत एक…