तरुण मुलगा आणि सूनेने मिळून म्हाताऱ्या सासू सासऱ्यांचा छळ केला आणि त्यांना घराबाहेर काढलं, नाही हो! असं या नाटकात काहीही नाही. नवरा बायकोच्या आयुष्यात भूतकाळात घडलेल्या घटनांमुळे ते म्हातारपणी एकमेकांवर सूड उगवतात. छे! छे! असंही या नाटकात काहीही नाही. मुलाने बाहेरचा रस्ता दाखवल्यावर, एक वयस्कर जोडपं वृद्धाश्रमात आपला वृद्धापकाळ एकमेकांच्या सहवासात व्यतीत करतं… अजिबात नाही! या नाटकात तसंही काहीच नाही. सगळ्यात महत्वाचं म्हणजे पोस्टर बघून हे नाटक ‘judge‘ करण्याची चूक तर मुळीच करू नका. सहकुटुंब सहपरिवार बघण्यासारखं हे नाटक वृध्द व्यक्तींना तरुणासारखं जगण्याचा मंत्र देणारं आहे आणि तरुण मंडळींसाठी येणारा काळासाठी ‘FD‘ म्हणजेच ‘Fixed Deposit‘ ठरणार आहे. प्रशांत दळवी लिखित…
Author: गायत्री देवरुखकर
नवीन मराठी नाटकाची घोषणा म्हणजे नाट्यरसिकांमध्ये नवचैतन्याची लाट! त्यातही विनोदी नाटक म्हणजे रसिक प्रेक्षकांसाठी हास्यरसपूर्ण मेजवानीच! हसवत हसवत राजकीय घडामोडींवर सडेतोड भाष्य करणारे सुप्रसिद्ध दिग्दर्शक संतोष पवार नाट्यरसिकांसाठी ‘हीच तर फॅमिलीची गंमत आहे’ हे एक नवीन नाटक घेऊन येत आहेत. https://youtu.be/UEMH-Lrfmmg वेद प्रॉडक्शन हाऊस प्रस्तुत ‘हीच तर फॅमिलीची गंमत आहे’ या नव्या कोऱ्या नाटकाच्या निमित्ताने शलाका पवार, सागर कारंडे यांच्यासोबत सायली देशमुख, सिद्धीरूपा करमरकर, अजिंक्य दाते, अमोघ चंदन, रमेश वाणी हे गुणी कलाकारही आपल्या भेटीस येणार आहेत. समोरासमोर राहणाऱ्या दोन कुटुंबामधील प्रत्येक सदस्यामध्ये काही ना काही शारिरीक व्यंग (defect) असतात. अशातच, त्या कुटुंबांमध्ये कशाप्रकारे सोयरिक जुळून येते आणि ती जुळून येताना काय…
एकांकिका स्पर्धेत मानाचे स्थान संपादित केलेल्या ‘अस्तित्व’ आयोजित ‘कल्पना एक आविष्कार अनेक २०२१’ स्पर्धेचा निकाल जाहीर झालेला आहे. या स्पर्धेची अंतिम फेरी आचार्य अत्रे नाट्यगृह, कल्याण येथे १८ डिसेंबर रोजी पार पडली. मान्यवरांकडून देण्यात आलेल्या एका कल्पनेवर आधारित एकांकिका लिहून ती सादर करावी असे या स्पर्धेचे सर्वसाधारण स्वरूप असते. नाट्यदर्पणने सुरू केलेली कल्पना एक आविष्कार अनेक ही स्पर्धा रवी मिश्रा यांनी पूर्ण ताकदीने ‘अस्तित्व’ तर्फे इतकी वर्षे सुरू ठेवली आहे याबद्दल त्यांचे करावे तितके कौतुक कमीच आहे. तसेच, गेली चार वर्षे ‘चार मित्र, कल्याण’ या संस्थेकडूनही या स्पर्धेला मिळालेले सहकार्य मोलाचे आहे. स्पर्धेचे यंदा ३५ वे वर्ष होते. अंतिम फेरीसाठी…
एकाच तिकिटात दोन दीर्घांक — एकाच ठिकाणी दोन कलाकृती बघायला मिळण्याची सुवर्णसंधी एकाच तिकिटात, एकाच दिवशी, एका पाठोपाठ एक, दोन वेगवेगळ्या धाटणीच्या कलाकृती पाहायला मिळाल्या तर काय बहार येईल नई? नाशिक येथील महाकवी कालिदास कलामंदिरमध्येही याच पद्धतीचा एक नाट्यप्रयोग प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. रविवार दिनांक १९ डिसेंबर, २०२१ रोजी महाकवी कालिदास कलामंदिरामध्ये करनाटकू निर्मित ‘नवरा आला वेशीपाशी’ आणि चक्री संस्थेची निर्मिती असलेले ‘यात्रा’ असे दीड तासांचे दोन दीर्घांक सायंकाळी ५ वाजल्यापासून दाखवले जाणार आहेत. या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य असे की या दोन्ही दीर्घांकाचा विषय एकमेकांपेक्षा पूर्णपणे वेगळा आहे. करनाटकू निर्मित ‘नवरा आला वेशीपाशी’ या दीर्घांकाबद्दल आम्ही याआधीच समीक्षण लिहिले आहे. जर…
मराठी सिने-नाट्यसृष्टी आणि हिंदी सिनेसृष्टीमध्ये स्वत:चे एक अढळ स्थान प्रस्थापित केलेले आपल्या सर्वांचे लाडके अभिनेते म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे! आज १६ डिसेंबर, २०२१ रोजी त्यांच्या १७ व्या स्मृतिदिनी त्यांच्या पत्नी व अभिनेत्री प्रिया बेर्डे यांच्या हस्ते ‘लक्ष्य कला मंच’ची स्थापना करण्यात आली आहे. बोरिवली येथील प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहातील एका सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाला पुरुषोत्तम बेर्डे, रवींद्र बेर्डे तसेच, लक्ष्मीकांत बेर्डे यांची कन्या स्वानंदी बेर्डे व सुपुत्र अभिनय बेर्डेही उपस्थित होते. लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या दुःखद निधनानंतर, त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ‘लक्ष्य कला मंच’ उभारण्याचे स्वप्न गेले कित्येक वर्षे आम्ही उराशी बाळगून होतो, असे मनोगत या सर्वच कुटुंबीयांनी व्यक्त केले. लक्ष्य कला मंच…
दरवर्षी अजेय संस्थेतर्फे फेब्रूवारी-मार्च दरम्यान ‘शब्दसेल्फी’ या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. लॉकडाऊनमुळे मध्यंतरीच्या काळात हा कार्यक्रम पार पडू शकला नाही. पण या वर्षी हा कार्यक्रम पुन्हा सादर होणार आहे. २२ डिसेंबर, २०२१ रोजी रात्री ८ वाजता ठाण्यातील राम गणेश गडकरी रंगायतन येथे हा कार्यक्रम प्रेक्षकांना बघता येणार आहे. ‘शब्दसेल्फी’ची संकल्पना एकदम वेगळी आहे. हा कवितांवर आधारित कार्यक्रम आहे. पण, इतर कार्यक्रमाप्रमाणे फक्त काव्यवाचन नाही. या कार्यक्रमांतर्गत काव्यनाट्य, काव्यश्रुंखला, काव्यचित्रपट, काव्यांकिका, काव्यमेडली अशा विविध प्रकारांचा वापर करून कवितेमधील आशय घेऊन कविता सादर केल्या जातात. या कार्यक्रमाची संकल्पना लेखक, दिग्दर्शक डॉ. क्षितिज कुलकर्णी यांची आहे. अनेक महिने या विषयावर अभ्यास करून, निरनिराळी…
आपल्या वाचनात बऱ्याच कथा, एकांकिका येत असतात. कधी आपल्याला त्या आवडतात तर कधी नाही आवडत. वाचताना जेवढी मजा आली तेवढी त्या कथेचं सादरीकरण बघताना येईलच असं नाही. ‘नवरा आला वेशीपाशी’ दीर्घांकाचे यश नवले आणि राजरत्न भोजने यांनी केलेले लेखन लॉकडाउनच्या काळात माझ्या वाचनात आले होते. लेखन वाचून मला ते मनापासून आवडलेही होते आणि हल्लीच मला यश नवले आणि राजरत्न भोजने लिखित-दिग्दर्शित ‘नवरा आला वेशीपाशी’ हा दीर्घांक नाट्यगृहात पाहण्याची संधी मिळाली. मला सांगावयास अत्यंत आनंद होत आहे की दीर्घांकाचे लेखन जितके सुंदर आहे तितक्याच सुंदरपणे ते नाट्यरूपात सादरही करण्यात आले आहे. त्याबद्दल, या नाटकाचे लेखक-दिग्दर्शक यश नवले आणि राजरत्न भोजने यांचे मन:पूर्वक…
आजच्या काळात अभिनयाचे तांत्रिक शिक्षण घेऊनच सिने-नाट्यसृष्टीत पदार्पण करण्याचा मानस बरेच तरुण व्यक्त करताना दिसतात. अशा तरुण पिढीच्या अभिनयकौशल्याला वाव मिळावा म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ललित कला केंद्र गुरूकुल आणि अभिनय, कल्याण या संस्था एकत्रितपणे आपल्यासाठी घेऊन येत आहेत ‘अभिनय प्रमाणपत्र अभ्यासक्रम’! Abhinay Pramanpatra Abhyaskram अभिनय, कल्याण गेली २२ वर्षे मराठी रंगभूमीवर सातत्याने नव-नवीन प्रयोग सादर करीत आली आहे. नाट्यविषयक उपक्रम राबवत आली आहे. भारतभर संस्थेने स्वत:चा प्रेक्षक वर्ग निर्माण केला आहे. संस्थेच्या वाटचालीत आता नवा टप्पा सुरू होतोय. अभिनय, कल्याण संस्थेचे अध्यक्ष अभिजीत झुंजारराव यांनी आमच्या टीमशी बोलताना सांगितले की, “सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ललित कला केंद्र गुरूकुल…
कुर्रर्रर्रर्र — निखळ मनोरंजनाची हमखास डिलिव्हरी! लोकहो! नुकत्याच प्रदर्शित झालेल्या एका नव्या कोऱ्या नाटकाने मुंबईमधील नाट्यगृहांमध्ये हाऊसफुल्ल धुमशान घातलं आहे. या तुफान नाटकाचं नाव आहे कुर्रर्रर्रर्र! व्ही. आर. प्रोडकशन आणि प्रग्यास क्रिएशन्स निर्मित ‘कुर्रर्रर्रर्र’ हे नाटक म्हणजे प्रेक्षकांसाठी, सहकुटुंब आनंद घ्यावा, अशी मनोरंजनाची हमखास डिलिव्हरी आहे. आपल्या सर्वांचेच लाडके कलाकार विशाखा सुभेदार, नम्रता संभेराव, प्रसाद खांडेकर आणि पॅडी कांबळे या धुरंधर विनोदवीरांनी नाटकाच्या विषयाचे गांभीर्य राखत प्रेक्षकांना मनमुराद हसवले आहे. या नाटकात प्रेक्षकांसाठी बरीच ‘surprises’ आहेत. ती मी इथे न उलगडलेलीच बरी! नाटक बघताना या मध्ये मध्ये येणाऱ्या ‘twist’ ची बातच काही और आहे. Kurrrr Marathi Natak Synopsis अक्षर (प्रसाद…
शासनाच्या आदेशानुसार आता ५०% प्रेक्षक उपस्थितीत नाटकं बघता येत आहेत. तब्बल दीड वर्षानंतर रंगभूमी पुनर्जिवित झाली आहे. रंगकर्मींना आज प्रेक्षकांच्या सहकार्याची जेवढी गरज आहे तेवढीच प्रेक्षकांनाही नाटकातून होणाऱ्या निखळ मनोरंजनाची गरज आहे. म्हणूनच, प्रेक्षक आणि रंगकर्मींमधील दुवा बनत आम्ही तुम्हाला एक सुवर्णसंधी देत आहोत. एक अनोखी स्पर्धा आयोजित करत आहोत. या स्पर्धेमध्ये या महिन्यात सहभागी होणार आहेत ४ नाट्यगृहे, ४ प्रयोग, १ दर्जेदार नाटक आणि लाखो प्रेक्षक! आम्ही दर महिन्यात एका नाटकाची दोन तिकिटे जिंकण्याची तुम्हाला संधी देणार आहोत. या महिन्यातील नाटक आहे कल्याणी पाठारे लिखित आणि अद्वैत दादरकर दिग्दर्शित दोन अंकी नाटक ‘दादा, एक गुड न्यूज आहे’. या नाटकाचे…
प्रग्यास क्रिएशन्स आणि व्ही. आर. प्रोडकशन्स या नाट्यसंस्थांची नवीन निर्मिती म्हणजेच ‘कुर्रर्रर्रर्र’ हे नाटक ४ डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या नाटकाचे लेखक-दिग्दर्शक प्रसाद खांडेकर आहेत. तर पूनम जाधव आणि विशाखा सुभेदार या नाटकाच्या निर्मात्या आहेत. या नाटकाच्या निमित्ताने विशाखा सुभेदार प्रथमच निर्मातीच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. प्रसाद खांडेकर, नम्रता संभेराव, विशाखा सुभेदार आणि पंढरीनाथ (पॅडी) कांबळे हे अभिनेते या नाटकात आपल्याला दिसणार आहेत. नेपथ्य संदेश बेंद्रे यांनी केलेले असून संगीत अमीर हडकर यांचं आहे. नाटकाचे सूत्रधार अनेक नाटकांचे व्यवस्थापक गोट्या सावंत हे आहेत. रंगभूमी.com च्या संपूर्ण टीमने ‘कुर्रर्रर्रर्र’ च्या सर्व कलाकारांशी नाटकाची तालीम सुरु असताना भेट घेतली. नाटकाचे…
हौस माझी पुरवा — सहकुटुंब अनुभवावा असा हास्यरसाचा बूस्टर डोस लॉकडाऊनमध्ये घरी बसून कंटाळलेल्या प्रेक्षकांना ज्या ‘booster dose’ ची गरज होती तो बूस्टर डोस म्हणजे ‘हौस माझी पुरवा’ हे नाटक! तुम्ही जर लॉकडाऊनला वैतागलाय आणि आता संपूर्ण कुटुंबासोबत तुम्हाला काहीतरी ‘refreshing’ बघावंसं वाटतंय तर तुमच्यासाठी संतोष पवार लिखित-दिग्दर्शित ‘हौस माझी पुरवा’ हे नाटक उत्तम पर्याय आहे. सध्याच्या राजकीय व सामाजिक ज्वलंत विषयांवर विनोदाच्या अंगाने पण, सडेतोड भाष्य करणारं हे नाटक प्रेक्षकांना ३ तास खिळवून ठेवतं. लोकशाहीचं आजच्या काळात काय महत्व आहे हे हास्याच्या कोषातून लोकांना समजावयाचा संतोष पवार यांचा हा प्रयत्न वाखाणण्याजोगा आहे. https://www.youtube.com/watch?v=S6QTjHvnRXQ Haus Mazi Purva Marathi Natak Review नाटकाची…