कोविडच्या पार्श्वभूमीवर रंगभूमी दोन वर्षांच्या प्रदीर्घ काळासाठी स्थगित झाली आणि कट्टर नाट्यरसिक नवनवीन नाट्यानुभव अनुभवण्यासाठी आसुसले. पण आज चित्र वेगळं आहे. आज रंगभूमी पुन्हा एकदा नवा श्वास घेऊ लागली आहे आणि महत्वाचं म्हणजे प्रेक्षकांच्या प्रतीक्षेस न्याय देतील अशा सुखद आणि दर्जेदार नाट्यकलाकृतीही जन्मास येत आहेत. रंगभूमी.com ची संपूर्ण टीमदेखील सर्व नाटकांची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी तत्पर आहेच! तुम्ही आमच्या या प्रयत्नांना कमालीची साथ देताय हेही तितकंच खरं! पण, हे समीकरण तेव्हाच पूर्ण होईल जेव्हा नाटक प्रेक्षकांपर्यंत पोहोचून त्या नाटकाबद्दलची प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पुन्हा पोहोचेल आणि आज तेच घडलेलं आहे. ‘सारखं काहीतरी होतंय!’ या ताज्यातवान्या नाटकाबद्दल आपले प्रिय वाचक श्री. विजयकुमार अणावकर यांनी…
Author: गायत्री देवरुखकर
आम्ही काही दिवसांपूर्वी कणकवली येथे सादर होणाऱ्या परिवर्तन कला महोत्सवाबद्दल तुम्हाला इत्यंभूत माहिती दिली होती. कणकवलीत रंगणार तीन दिवसीय परिवर्तन कला महोत्सव! या तीन दिवसीय महोत्सवाला मिळालेल्या प्रेक्षकांच्या प्रचंड प्रतिसादामुळे आजपासून पुन्हा एकदा कोल्हापूरात हा महोत्सव आयोजित करण्यात येत आहे. भालजी पेंढारकर सांस्कृतिक केंद्र व अमृता इंडस्ट्रीज कोल्हापूर आयोजित या तीन दिवसीय महोत्सवामहोत्सवाबद्दल संपूर्ण माहिती पुढीलप्रमाणे: स्थळ: शाहू स्मारक, कोल्हापूर वेळ: सायंकाळी ६:३० वाजता प्रवेश सर्वांसाठी खुला! परिवर्तन कला महोत्सव वेळापत्रक दि. १ एप्रिल, २०२२ रोजी शंभु पाटील लिखित व मंजुषा भिडे दिग्दर्शित अमृता साहिर इमरोज हे नाटक सादर होणार आहे व या नाटकाचे सादरीकरण परिवर्तनचे कलावंत पार पाडणार आहेत. दि.…
आरंभ प्रोडक्शन हाऊस निर्मित, दोन अंकी मराठी विनोदी नाटक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नाटकाचं नाव आहे ‘बापटला आठवलंय भारी!’ या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग मुंबई मराठी साहित्य संघ, चर्नी रोड येथे पार पडणार आहे. भ्रष्टाचार, महागाई सर्व काही डोळ्यासमोर होत असूनसुद्धा त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या सामान्य माणसाला जागरूक करून गांभीर्याने विचार करायला लावणारं असं हे नाटक आहे. बापट हा एक सच्चा पत्रकार, इमानदार, जागरूक आणि स्पष्टवक्ता सामान्य माणूस असतो. एका अपघातामुळे तब्बल १८ वर्ष तो कोमात असतो. आता २०२२ साली त्याला शुद्ध आली आहे. शुद्धीवर आल्यावर त्याला बऱ्याच गोष्टी बदलल्या आहेत हे जाणवलं, देश किती प्रगत झाला आहे, टेक्नॉलॉजि किती प्रगल्भ…
संहिता निर्मित आणि प्रयोगशाळा आयोजित ‘बे एके बे’ हा एक अनोखा कार्यक्रम शनिवार दिनांक २६ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता, रवींद्र नाट्य मंदिर (मिनी थिएटर) येथे सादर होणार आहे. गीत, काव्य आणि संगीताची एक अनोखी मैफल जी आपल्याला आयुष्याचा पाढा शिकवते आणि मग आपणही म्हणू लागतो.. बे एके बे…! या प्रयोगाची खासियत म्हणजे नवोदित कवींच्या कविता, कवितेची झालेली गाणी आणि शब्दसुरांनी भावविवश करणारी अशी ही मैफल असणार आहे. सादर होणाऱ्या या कविता प्रेक्षकांचे बालपणीचे भावविश्व उलगडतात, तरुण वयातलं प्रेम जागवतात आणि जगरहाटीच्या खेळात येणाऱ्या अनेक अनुभवांची अनुभूती देतात. इथले सूर मंत्रमुग्ध करतात, डोलायला लावतात आणि नाचावतातही! त्यामुळे, आजच्या धावपळीच्या जीवनात…
काही दिवसांपूर्वी आम्ही ‘सम्यक कलांश प्रतिष्ठान आयोजित नाट्यगंध महोत्सव २०२२’ बद्दल इत्यंभूत माहिती देणारा लेख तुमच्या भेटीसाठी आणला होता. हा लेख तुम्ही पुढील लिंकवर क्लिक करून वाचू शकता. नाट्यगंध महोत्सव — स्पर्धेत नजरे आड राहिलेल्या एकांकिकांच्या महोत्सवाचे ४थे वर्ष! आज आपण या महोत्सवात सादर होणाऱ्या एकांकिकांबद्दल माहिती मिळवणार आहोत. यावर्षी नाट्यगंध महोत्सवातील सत्कार मूर्ती आहेत ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शक अजित भगत आणि म्युझिक ऑपरेटर शशिकांत (दादा) परसनाईक! तसंच, यंदा सोहळ्याला लाभलेले प्रमुख अतिथी आहेत ज्येष्ठ लोकनृत्य दिग्दर्शक सदानंद राणे, नाट्य निर्मिती सूत्रधार प्रभाकर (गोट्या) सावंत, रंगभूषाकार वामन गमरे आणि नेपथ्यकार चंद्रशेखर मेस्त्री. दिनांक : २९ मार्च २०२२ स्थळ : गडकरी रंगायतन,…
‘जागतिक रंगभूमी दिवस’ साजरा करायचं म्हटलं तर या दिवशी गुणी कलाकारांचा सत्कार करणे आणि कलावंतांना सादरीकरणासाठी व्यासपीठ मिळवून देणे यापेक्षा उत्तम ते काय? असा सोहळा म्हणजे थेट रंगभूमीलाच मानवंदना होय! या संकल्पनेस समर्पक असा एक सोहळा ‘अवतरण अकादमी’तर्फे गेली बरीच वर्षे साजरा करण्यात येत आहे. जागतिक रंगभूमी दिवस ‘अवतरण अकादमी’ गेली तेवीस वर्षे सांस्कृतिक अभिरुचीच्या परिपोषासाठी आणि परितोषासाठी कलाविषयक विविध उपक्रम राज्यस्तरावर आयोजित करीत आहे. ‘इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिटयूट’ (आयटीआय) ह्या १९४८ मध्ये युनेस्को व जागतिक कीर्तीच्या काही रंगकर्मींनी स्थापन केलेल्या, जगातील अत्यंत महत्वाच्या अशासकीय संस्थेने २७ मार्च, १९६२ पासून जागतिक रंगभूमी दिवस साजरा करण्याची सुरुवात केली. प्रयोगजीवी कलांबाबतचे ज्ञान व परंपरांची आंतरराष्ट्रीय…
आजच्या पिढीला उत्तमोत्तम शिक्षण मिळावं यासाठी त्यांच्या पालकांची धडपड सुरू असते. मुलांना करिअरच्या संधीही तितक्याच ताकदीच्या उपलब्ध होऊ लागल्यामुळे तरुण पिढीही स्वच्छंद मनाने स्वतःचे मार्ग निवडून विश्वभर उडाण घेण्यासाठी सज्ज झालीय. इंटरनेटमुळे जग छोटं वाटू लागलंय. आंतरराष्ट्रीय पातळीवर सहजरीत्या विचारांची देवघेव होऊ लागलीय. अशा पिढीच्या मनात परदेशी विचारांचं बीज रुजणं स्वाभाविक आहे. अशा परिस्थितीत आपली मूळ संस्कृती विरळ होत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि अशी पिढी मूळ संस्कृती, नातीगोती विसरून आत्मकेंद्री होण्याची शक्यता नाकारता येत नाही. परिणामी नात्यांचा ओलावा कमी होऊन पडणारा भावनांचा दुष्काळ हे आणि मेकॅनिकल जगणं हे ओघानं आलंच! त्यातूनच निर्माण झालेल्या एकलकोंडेपणाला कंटाळून आयुष्यात स्वतःला खुश ठेवण्यासाठी आनंदमयी मार्ग निवडणंही…
‘38, कृष्ण व्हिला’ हे बहुचर्चित नाटक १९ मार्च पासून प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज होतंय हे तर आपण जाणून आहोतच! गिरीश ओक आणि श्वेता पेंडसे अभिनीत ‘38, कृष्ण व्हिला’ या नाटकात गिरीश ओक आणि श्वेता पेंडसे हे कलाकार असून नाटकाचे दिग्दर्शन विजय केंकरे यांनी केले आहे. तसेच, श्वेता पेंडसे या स्वतः या नाटकाच्या लेखिका आहेत. https://www.youtube.com/watch?v=2A_DdKEVlfU व्यावसायिक रंगभूमीवरचं गिरीश ओक यांचं हे ३८ वं वर्ष आहे आणि नाटकाच्या नावातही ३८ हा आकडा आहे ही खरं म्हणजे एक गंमतच आहे. पण या नाटकाची अजून एक खासियत अशी की हे गिरीश ओक यांच्या आयुष्यातील ५० वे नाटक असणार आहे. एखाद्या नाटकाचे ५० प्रयोग होतात तेव्हा…
आपण बऱ्याच कलाकारांना ज्या भूमिकेत बघतो त्याच भूमिकेप्रमाणे त्यांचं व्यक्तिमत्त्व असेल असं गृहीत धरतो. अर्थात, बरेचदा आपल्याला त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फारशी माहितीदेखील नसते. खलनायकाच्या भूमिकेत दिसणाऱ्या कलाकारांना वैयक्तिक जीवनातही प्रेक्षकांकडून परखड प्रतिक्रिया मिळाल्याचे किस्से कमी नाहीत. पण, प्रत्येक खलनायक साकारणारा कलाकार खऱ्या आयुष्यातही तसाच वाईट असेलच असं नाही. अगदी त्याचप्रमाणे, प्रेक्षकांना पोट धरून हसवणारा एखादा कलाकार खऱ्या आयुष्यातही तसाच मिश्किल आणि सुस्वभावी असेलच असं नाही. जागतिक पातळीवरील विनोदाचा सम्राट चार्ली चॅप्लिन याच्या आयुष्यावर बेतलेलं अशाच काहीशा विषयाचं एक नाटक ‘मिलाप थिएटर’ तर्फे आपल्या भेटीस येत आहे. चार्लीच्या स्वभावातील ग्रे शेड आपल्याला या नाटकात बघायला मिळणार आहे. नाटकाचं नाव आहे ‘द…
एखाद्या नव्या शहरात जायचं म्हटलं तरी आपण पूर्ण तयारी करून जातो. पण काळाच्या विचित्र खेळात आपण अचानक एके दिवशी एखाद्या नव्या जगातच जाऊन पोहोचलो तर? असं जग जे आपल्यासमोर एक अनाकलनीय चित्र उभं करेल. ही कल्पनाच किती भन्नाट आहे! याच कल्पनेवर आधारित असं ललित कला केंद्र, सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठ आयोजित ‘हत्तमालाच्या पल्याड’ हे नाटक प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज झालेलं आहे. या नाटकाचे लेखक बादल सरकार असून दिग्दर्शक महेश खंदारे आहेत. ‘हत्तमालाच्या पल्याड’ ह्या नाटकात दोन अट्टल चोर, चिक्कूराम आणि विक्कुराम, पकडले जाण्याच्या भीतीने एका नदीत उडी मारतात आणि ती नदी त्यांना एका अशा दुनियेत घेऊन जाते जी त्यांनी कधीही पाहिलेली…
प्रपंच म्हटलं की त्यात नवरा-बायकोची एकमेकांना साथ, वेळप्रसंगी तडजोड, काळाशी अनुरूप वागणं असं सगळंच आलं आणि हे सगळं जुळून येण्यासाठी गरजेच असतो तो ‘समतोल’! संसाराचा जीवनगाडा नीट चालवायचा तर पती आणि पत्नी ही त्याची दोन चाकं व्यवस्थित, लयीत चालली पाहिजेत. त्यांची वेळो वेळी देखभाल करायला हवी, त्यांना तेलपाणी-वंगण द्यावं लागतं. एक चाक जरी कुरकूरू लागलं की संसाराचं संगीत बेसूर होतं. गाडा नीट चालत नाही. हा प्रश्न सुखी, समाधानी जीवनासाठी सर्वात महत्वाचा आणि मोठा! हाच समतोल मांडणारं एक नाटक प्रख्यात दिग्दर्शक व अभिनेते अभिजीत झुंजारराव आपल्या भेटीस घेऊन आले आहेत. नाटकाचं नाव आहे ‘ए, आपण चहा घ्यायचा?’! सध्या या नाटकाचा कोकण…
नाटक यशस्वी होतं तेव्हा त्या यशासाठी नाटकाच्या टीममधील प्रत्येक सदस्य आणि त्यांचे अविरत प्रामाणिक प्रयत्न कारणीभूत असतात. अशी नाटकं पुन्हा पुन्हा बघूनही कंटाळा येत नाही. ती प्रत्येक वेळी तितकीच रंजक वाटतात. असंच एक सुंदर नाटक म्हणजे ‘अनन्या’! रसिक प्रेक्षकांसाठी आनंदाची बातमी म्हणजे हे नाटक पुन्हा तुमच्या भेटीस येत आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे या नाटकाचा ३०० वा प्रयोगही लवकरच सादर होणार आहे. दिग्दर्शक प्रताप फड यांनी अनन्याच्या व्यक्तिरेखेवर, तिच्या आयुष्यातील चढ उतारांवर केलेला खोल अभ्यास या नाटकाला अधिकाधिक परिपूर्णतेकडे घेऊन जातो. ऋतुजा बागवे या गुणी अभिनेत्रीने त्यांना अचूक साथ देत तिच्या चोख अभिनयातून अतिशय जिवंतपणे अनन्या आपल्यासमोर उभी केली आहे. …