द बेस आयोजित दोन लघुनाटिका एकाच तिकिटात बघता येण्याची सुवर्णसंधी प्रेक्षकांसाठी चालून आली आहे. दोन वेगळ्या धाटणीचे विषय घेऊन कलाकार तुमच्या भेटीसाठी सज्ज झाले आहेत. ‘द रेप’ व ‘अंडासेल’ अशी दोन नाटकं ११ जून रोजी सायंकाळी ६ वाजता द बेस, एरंडवणे – पुणे येथे सादर होणार आहेत. प्रयोगाचे तिकीट शुल्क मात्र १५०/- आकारण्यात आले आहे. अंडासेल लेखक व दिग्दर्शक – शिवम पंचभाई कलाकार – मंथन काळपांडे, दर्शन कुलकर्णी, कौशिक कुलकर्णी, स्वराली पेंडसे, अतुल कूडळे, किशोर क्षीरसागर, लकी वाघमारे प्रकाशयोजना – लीना जोशी संगीत संयोजन – चैतन्य बीडकर अंडासेल ही जेल मधली एक शिक्षा आहे. अंडासेल मध्ये अडकलेल्या दोन कैद्यांची ही गोष्ट…
Author: गायत्री देवरुखकर
कोरोनारुपी राक्षसाने हळूहळू अख्ख्या जगाला स्वतःच्या विळख्यात ओढून घेतले आणि त्यामुळे अखंड जीवसृष्टी हादरून गेली, हे आपण जाणून आहोतच! साधारण दोन अडीच वर्षांपूर्वी, या भयंकर महामारीची उत्पत्ती चीनमधील व्यूहान शहरात झाल्याची छोटीशी बातमी वर्तमानपत्राच्या एका कोपऱ्यात आली होती. पण ही बातमी भविष्यात असे काही भीषण रूप धारण करील याबद्दल कोणी विचारही केला नव्हता. सर्वसामान्य जनता जेव्हा या महामारीशी दोन हात करत होती आणि आपल्या जवळच्या माणसांना गमावत होती, तेव्हा या रोगावर Vaccine शोधू पाहणाऱ्या फार्मा रिसर्च कंपन्यांमध्ये जी काही चढाओढ झाली त्याचं खळबळजनक चित्रण करणारं एक वैचारिक नाटक आपल्या भेटीस येत आहे. ६० व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत सादर…
भारतीय शास्त्रीय संगीत, नृत्य तसेच पारंपारिक व समकालीन नाटक महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यातून तसेच सर्वदूर पोहोचवण्याच्या हेतूने ललित कला केंद्र विस्तार कार्यक्रम अर्थात रेपर्टरी सुरू करण्यात आली आहे. या अंतर्गत ‘अपवाद आणि नियम’ आणि ‘वाघाची गोष्ट’ या दोन नाटकानंतर आता ललित कला केंद्र गुरुकुल विभागातर्फे आपल्यासाठी घेऊन येत आहे एक नाटक ‘संगीत: कमली की सत्वपरीक्षा अर्थात ह्यो रिश्ता क्या कहलाता है…?’ साधारणपणे लोककला प्रकाराच्या अंगाने उभ्या केलेल्या या नाट्यात नौटंकी आणि दशावताराचा मिलाफ आहे. विवाहसंस्थेला धरून पुर्वापार चालत आलेले सामाजिक संकेत आणि सर्वमान्य चौकटी माणूस जनरीत म्हणून स्वीकारतो. तथाकथित सुसंस्कृत बनून राहण्यासाठी नातं टिकवून ठेवण्याच्या हट्टात स्वतःशीच चाललेल्या झगड्याला आणि त्यातून होणाऱ्या दमनाला…
‘नाटकात रमलेला माणूस रंगभूमीपासून फार काळ दूर राहू शकत नाही’, असं म्हणतात आणि हे ब्रीदवाक्य बऱ्याच कलाकारांनी आजवर सिद्धही केलेलं आहे. याच कलाकारांच्या यादीतील दोन महत्वाची नावं म्हणजे अमृता सुभाष आणि संदेश कुलकर्णी! या जोडप्याचं ‘फिर से हनिमून’ हे हिंदी नाटक सध्या रंगभूमीवर प्रेक्षकांची वाहवा मिळवत आहेच! पण, आता हेच नाटक ‘पुन:श्च हनिमून’ या नावाने मराठी भाषेतही प्रेक्षकांच्या भेटीसाठी रंगभूमीवर सज्ज झाले आहे. https://www.youtube.com/watch?v=kh6qyBaanAM नाटकाबद्दल थोडंसं… आपल्या नात्यात आलेलं साचलेपण घालवण्यासाठी एक जोडपं पुन्हा हनिमूनला जातं. सगळं पाहिल्यासारखं व्हावं असा त्यांचा प्रयत्न असतो. हॉटेल ड्रीमलँडला ते पोहोचतात तेव्हा ते हॉटेल घरासारखं दिसायला लागतं. भूतकाळातल्या घटना वर्तमानात मिसळायला लागतात. कधी हसवणाऱ्या…
प्रशांत दामले फॅन फाऊंडेशन व गौरी थिएटर्स निर्मित आणि सरगम प्रकाशित ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ या नाटकाच्या ५०० व्या प्रयोगानिमित्त सत्कार सोहळ्याचे आयोजन केल्याचे वृत्त आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचविले होते. पुढील लिंकवर क्लिक करून तुम्ही हे वृत्त वाचू शकता. ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ नाटकाचा ५०० वा प्रयोग! — मान्यवरांच्या उपस्थितीत विशेष कार्यक्रमाचे आयोजन ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ या नाटकाचा ५०० वा प्रयोग रविवार दिनांक २९ मे रोजी विलेपार्ले येथील दीनानाथ नाट्यगृहात हाऊसफुल्ल गर्दीत पार पडला. नाटकाने ५०० चा यशस्वी टप्पा गाठल्याबद्दल नाटकातील कलाकारांचा सत्कार सोहळा आयोजिण्यात आला होता. प्रशांत दामले, कविता मेढेकर, अतुल तोडणकर, मृणाल चेंबूरकर, प्रतीक्षा शिवणकर, राजसिंह देशमुख व…
कुर्ल्यातील नेहरू नगर येथील प्रबोधन प्रयोगघर! या छोट्याशा आणि टुमदार नाट्यगृहाची सध्या रंगकर्मींमध्ये खूपच चर्चेत आहे. प्रबोधन प्रयोगघर हे प्रायोगिक तसेच व्यावसायिक रंगभूमीसाठी उचलण्यात आलेलं एक अत्यंत महत्वाचं पाऊल आहे. प्रायोगिक संस्थांना शक्य होईल अशा कमी दरात येथे प्रयोग सादर केले जाऊ शकतात. एका मैदानाच्या कडेला असलेली ही बहुरंगी वास्तू बऱ्याच रंगकर्मींसाठी एक महत्वाचं व्यासपीठ ठरताना दिसत आहे. या वास्तूबद्दल इत्यंभूत माहिती मिळविण्यासाठी रंगभूमी.com च्या टीमने ही वास्तू उभारण्यात मोलाचा वाटा असलेल्या ज्येष्ठ लेखक आणि दिग्दर्शक श्रीनिवास नार्वेकर यांची भेट घेतली. या भेटीचा संक्षिप्त आढावा घेणारा हा व्हिडिओ नक्की बघा. https://youtu.be/PFsSRFp1lww तसेच, रंगकर्मींसाठी अजून एक खुशखबर आहे!!! प्रयोग घरात तब्बल…
जागतिक रंगकर्मी दिवस २०२१ च्या सोहळ्यांतर्गत प्रख्यात रंगकर्मी प्रदीप कबरे यांच्या ‘दिल धक धक करे’ नावाच्या स्वलिखित पुस्तकाचे उत्सवमूर्ती अशोक सराफ यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले होते. याच पुस्तकावर आधारित नाटकाचा २४ मे रोजी प्रबोधनकार ठाकरे, बोरिवली येथे शुभारंभ झाला. हे नाटक तमाम प्रेक्षकवर्गाच्या पसंतीस उतरत आहे. ‘दिल धक धक करे’ हे एक कौटुंबिक विनोदी नाटक आहे. त्यामुळे, या सहकुटुंब सहपरिवार हे नाटक तुम्ही एन्जॉय करू शकता! अमर आणि अंजली या आनंदी विवाहित जोडप्याची ही कथा आहे. अमरला नेहमी त्याच्या तब्येतीबद्दल शंका असते ज्यामुळे अंजलीच्या मनात एक वेगळाच गैरसमज निर्माण होतो. त्यांचे कौटुंबिक डॉक्टर घोरपडेदेखील बरेच गोंधळ निर्माण करतात. अमरचा…
लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर हळूहळू सर्व नाट्यगृहं १००% आरक्षणावर सुरू झाली. मात्र तमाम रसिक प्रेक्षक आणि रंगकर्मींसाठी सोईस्कर आणि मध्यवर्ती असलेलं माटुंगा येथील यशवंत नाट्यमंदिर अद्याप सुरू झालेलं नाही. बऱ्याच रंगकर्मींनी त्याबद्दल खंतही व्यक्त केली आहे. कित्येक महिने प्रेक्षक व रंगकर्मी हे नाट्यगृह सुरू होण्याची वाट बघत आहेत. पण आज यामागचे कारण उघडकीस आले आहे. दोन वर्षांनंतर रंगभूमी उभी होत असताना हे नाट्यगृह बंद असणं म्हणजे आपलं दुर्दैवच आहे, असे मनोगत अभिनय कल्याण संस्थेचे संस्थापक आणि दिग्दर्शक अभिजीत झुंजारराव यांनी व्यक्त केले आहे. तसेच, लेखक-दिग्दर्शक यश नवले यांनीही आपण या नाट्यगृहाला यशवंत नाट्य ‘मंदिर’ असे संबोधतो असे म्हणत, तेथील काम लवकर…
२०१७ साली कोल्हापुरातील प्रत्यय हौशी नाट्य संस्थेने कॉ. संतराम पाटील श्रमिक चॅरिटेबल ट्रस्टच्या सहयोगाने नाट्य महोत्सवाच्या आयोजनास सुरूवात केली. प्रत्ययची निर्मिती असणारे नाट्याविष्कार आणि महाराष्ट्र व भारतभरात सुरू असणाऱ्या प्रायोगिक नाटकांना कोल्हापुरात रंगमंचित करण्याची यामागे भूमिका होती. २०१७, २०१८ आणि २०१९ अशी तीन वर्षे सलग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. कोल्हापुरातील जाणकार रसिक आणि समीक्षकांनी या महोत्सवाला उत्तम दाद दिली आणि महोत्सव यशस्वी केले. २०२० आणि २०२१ साली लॉकडाऊनच्या काळातही प्रत्ययतर्फे बरेच ऑनलाईन उपक्रम राबविले गेले. यंदा प्रत्यय नाट्य महोत्सव २०२२ चे हे चौथे वर्ष आहे. हा नाट्यमहोत्सव रा. शाहू स्मारक भवन, दसरा चौक, कोल्हापूर येथे पार पडणार आहे. यावर्षी महोत्सवात…
प्रसिद्ध नाटककार, गूढकथाकार, दिग्दर्शक रत्नाकर मतकरी ह्यांचा १७ मे २०२२ हा दुसरा स्मृतिदिन आहे. या ज्येष्ठ रंगकर्मीस आदरांजली म्हणून दिग्दर्शक संतोष वेरुळकर रत्नाकर मतकरी लिखित ‘पोलीस — पोलीस’ हा नवा दीर्घांक १४ मे २०२२ पासून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. या ९० मिनिटांच्या दीर्घांकात समाजातील विसंगतीवर भाष्य केलं गेलं आहे. ‘पोलीस पोलीस’ या दीर्घांकाचं महत्वाचं वैशिष्टय असं की केवळ तीन कलाकार, पाच तंत्रज्ञ आणि सुटसुटीत तसेच वाहतुकीस अत्यंत सोपी अशी नेपथ्यरचना यामुळे हा प्रयोग अत्यंत किफायतशीर खर्चात कुठेही सादर करता येतो. नाट्यगृहातील बंदिस्त प्रयोगदेखील तितकाच रंगतदार व्हावा आणि मोजक्या प्रेक्षकांत व उपलब्ध रिसोर्सेसमध्येही प्रयोग उठावदार करता यावा अशी नाटकाची बांधणी आहे.…
तुम्हाला कोणी विचारलं की ‘प्रेम म्हणजे काय?’ तर तुमचं उत्तर काय असेल? बरं! हाच प्रश्न तुम्हाला वयाच्या १० व्या किंवा १५ व्या वर्षी विचारला असता तर? किंवा अजून १०-१५ वर्षानंतर विचारला असता तर? तुमचं उत्तर नक्कीच बदललं असतं ना? माणसाच्या आयुष्यात वेळोवेळी घडणाऱ्या घटनांचा, आजूबाजूच्या परिस्थितीचा आणि सभोवतालच्या माणसांचा त्याच्या विचारांवर परिणाम होत असतो. जर्मन लेखक क्रिस्टो शागोर लिखित, मृण्मयी शिवापूरकर अनुवादित आणि सपन सरन दिग्दर्शित ‘तमाशा थिएटर’च्या ‘लव्ह यू’ या नाटकातील ज्युलियनच्या बाबतीतही असंच होतं. त्याच्या पालकांचा घटस्फोट होतो. त्यामुळे त्याचा प्रेमाकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून जातो. प्रौढावस्थेत एका व्यक्तीचं प्रेम समोरच्या व्यक्तीसाठी असं क्षणार्धात आटून जाऊ शकतं? असा प्रश्न त्याला पडतो.…
आम्ही काही दिवसांपूर्वी कणकवली आणि कोल्हापूर येथे सादर होणाऱ्या परिवर्तन कला महोत्सवाबद्दल तुम्हाला इत्यंभूत माहिती दिली होती. कणकवलीत रंगणार तीन दिवसीय परिवर्तन कला महोत्सव! कणकवलीनंतर आता कोल्हापूरात रंगणार तीन दिवसीय परिवर्तन कला महोत्सव! या तीन दिवसीय महोत्सवाला मिळालेल्या प्रेक्षकांच्या प्रचंड प्रतिसादामुळे पुन्हा एकदा आता मुंबईतही हा महोत्सव आयोजित करण्यात येत आहे. स्थळ: पु. ल. देशपांडे सभागृह — पु. ल. देशपांडे कला अकादमी, प्रभादेवी, दादर प्रवेश सर्वांसाठी खुला! परिवर्तन कला महोत्सव वेळापत्रक दि. १३ मे रोजी, रात्रौ ८ वाजता महोत्सवाची सुरुवात बहिणाईंच्या कविता व गाण्यांवर आधारित अरे संसार संसार या सुरेल मैफिलीने होणार आहे. या कार्यक्रमाची संकल्पना विजय जैन यांची असून दिग्दर्शन नारायण बाविस्कर…