रंगभूमी.com नाट्यक्षेत्रात गेली तीन वर्षे सातत्याने कार्यरत आहे. या प्रवासात बरीच नाटकं बघण्याचा योग आला. खरं तर नाटकांचे बरेच ‘प्रकार’ बघायला मिळाले. एकांकिका, दीर्घांक, दोन अंकी नाटक, तीन अंकी नाटक, लघुनाटिका आणि बरंच काही! बऱ्या-वाईट-चांगल्या अशा कित्येक नाट्यानुभवांचा ओघ आजही अव्याहत सुरू आहे. या ओघात वाहत आलेल्या नाट्यकृतींपैकी काही नाटकांनी मनात असं काही घर केलं की ती नाटकं जिवंतपणी विस्मृतीत जाणं निव्वळ अशक्यच! आपल्याला आवडलेली ही सुंदर नाटकं रंगभूमी.com च्या माध्यमातून जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याची कल्पना समोर आली. सहकाऱ्यांनी ही कल्पना उचलून धरली आणि बऱ्याच अथक प्रयत्नांनंतर आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत रंगभूमी.com आयोजित ‘नाट्यदरबार’ — निवडक आणि दर्जेदार नाट्यकलाकृती…
Author: गायत्री देवरुखकर
समाजात भ्रष्टाचार किती बळावला आहे याबद्दल आपण जितकी चर्चा करू ती कमीच आहे. सामाजिक, राजकीय, आध्यात्मिक अशा सर्वच स्तरांवर आज भ्रष्टाचाराचं काहूर माजलंय. याच ज्वलंत विषयाचे असंख्य पैलू विविध पात्रांमार्फत प्रेक्षकांना दाखवणारं एक नाटक येत्या १० फेब्रुवारी रोजी रंगभूमीवर पदार्पण करत आहे. ज्येष्ठ निर्माते कै.सुधीर भट यांचे सुपुत्र संदेश भट सादर करीत आहेत ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर लिखित आणि हृषिकेश जोशी दिग्दर्शित ‘येतोय तो खातोय’ हे नाटक! ही सुयोग नाट्यसंस्थेची ९० वी कलाकृती असणार आहे. कांचन सुधीर भट, मोहन दामले, मिलन टोपकर, चंद्रशेखर आठल्ये, यांनी या नाटकाची निर्मिती केली आहे. संतोष पवार, हृषिकेश जोशी, भार्गवी चिरमुले या कलाकारांसोबतच मयुरा रानडे,…
एक काळ होता जेव्हा माणूस सुखासाठी धडपडत होता. जीवनातही कुटुंब आणि मित्रपरिवारासाठी वेळ काढत होता. पण आजचा काळ वेगळा आहे. आज माणूस सुखी राहण्यासाठी नाही तर फक्त सुखी दिसण्यासाठी झगडतोय. कमालीचं औदासिन्य आलेलं असतानाही सोशल मीडियावर खूश दिसण्यासाठी आजकाल प्रत्येकामध्ये चढाओढ सुरू आहे. आजची पिढी सोशल मिडियाच्या आहारी गेलेली आहे. लाईक्स आणि फॉलोअर्सच्या विळख्यात अडकलेली दिसतेय. सहजसुंदर आयुष्यातील हेलकावे सहन करण्याची क्षमता या पिढीत उरलेली नाही. अशाच प्रकारचं, वरवरचं आयुष्य जगणारा आणि ‘आज’च्या पिढीचं दर्शन घडवणारा ‘Sad सखाराम’ आपल्या भेटीसाठी आला आहे. आविष्कार निर्मित, युगंधर देशपांडे लिखित आणि नीरज शिरवईकर दिग्दर्शित ‘Sad सखाराम’ हा एक भन्नाट, आगळा वेगळा पण तरीही…
मोजक्या शब्दांत यमाचं वर्णन करायला सांगितलं तर कसं कराल? दोन शिंगं असलेला, रेड्यावर बसलेला, यम म्हणजे मृत्यूदाता, यम म्हणजे काळ… बरोबर? पण यमाची एक नवीन व्याख्या करणारं विनोदी नाटक सद्ध्या रंगभूमीवर गाजतंय. प्रवीण धोपट लिखित स्वप्नील कोकाटे दिग्दर्शित आणि नयन बाठे, दीपा परब सादर करीत आहेत दोन अंकी नाटक ‘यम इंडिकेटर’ एक मध्यमवयीन जोडपं नातेवाईकांच्या लग्नाला जायला निघालेलं असतं. इतक्यात त्यांच्या दारात ‘यम’ येऊन उभा ठाकतो! त्या दोघांपैकी एकाची वेळ आल्याचे तो त्यांना सांगतो. परंतु, यमाच्या डेटाबेसमध्ये गडबड झाल्यामुळे नेमका कोणाचा मृत्यू आज लिहिला आहे ते त्याला माहीत नसते. इथेच खरी गंमत सुरू होते. पुढे काय होतं? यम नेमकं कोणाला…
गिरीश कुलकर्णी यांचं ‘होल बॉडी मसाज’ लवकरच रंगभूमीवर! नजीकच्या काळात बरीच प्रायोगिक आणि व्यावसायिक नाटकं प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहेत. या नाटकांच्या मांदियाळीत एक नाटक सध्या सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. ते नाटक म्हणजे महाराष्ट्र कल्चरल सेंटरचे ‘होल बॉडी मसाज’ हे नाटक! ९ डिसेंबर रोजी पुण्यातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग सादर होणार आहे. ‘बाई, मसाज म्हंजे बोटांचे डोळे करायचे आनि पेशंटच्या बॉडीमधील दुःख शोधायचं!’ अशा टॅगलाईनसोबत नाटकाचे पोस्टर इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आले आहे. विजय शिंदे नामक एक दारुडा इसम. पण त्याच्या बोटांमध्ये अशी काही जादू असते की त्याच्या मालीशने दुर्धर शारीरिक दुखणी बरी होत असतात. ‘ओल्ड गव्हर्नमेंट मेडिकल…
लॉकडाऊनपश्चात, रंगभूमी.com च्या माध्यमातून आम्ही नाटकांची समीक्षणे, प्रयोगांचे वेळापत्रक, कलाकारांच्या मुलाखती, नाटकांबद्दल संपूर्ण माहिती आणि नाटकांशी संबंधित बरंच काही तुमच्यापर्यंत पोहोचविण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहोत. रंगभूमी.com आणि प्रेक्षकांमधील प्रवास अखंड सुरू राहावा हाच आमचा मानस आहे. कुठलं नाटक कुठल्या नाट्यगृहात किती वाजता बघता येईल याची माहिती आम्ही देतच होतो आणि आता तमाम रसिक प्रेक्षकांच्या विनंतीचा मान ठेवत आम्ही तुमच्या आमच्या रंगभूमी.com वेबसाईटवर ऑनलाईन तिकीट बुकींग सुरू करत आहोत. रंगभूमी.com ने हे नवं पाऊल खास तुमच्या सोयीसाठी उचललं आहे आणि आम्हाला खात्री आहे की तुम्ही या ऑनलाईन सोयीचा पुरेपूर लाभ घ्याल. सध्या आमच्यासोबत मर्यादित नाटकं तिकीट विक्री साठी जोडली गेली असली…
‘आजकल’ आणि ‘आपलं घर’ प्रस्तुत एक सुंदर कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. पुरुषोत्तम करंडक विजेत्या दोन दर्जेदार आणि भिन्न धाटणीच्या एकांकिका सादर केल्या जाणार आहेत. १६ जुलै रोजी, रात्री ९ वाजल्यापासून यशवंतराव चव्हाण, पुणे येथे या एकांकिका प्रेक्षकांना बघता येणार आहेत. ऑनलाईन बुकींगसाठी ticketkhidakee.com या वेबसाईटला भेट द्या. तसेच, ग्रुप बुकींगसाठी ८४ २१०० ४४६४ या क्रमांकावर WhatsApp करा. सादर होणाऱ्या एकांकिकांची माहिती सॉरी परांजपे लेखन — चिन्मय देव दिग्दर्शन — ऋषी मनोहर आजकल सादर करत असलेल्या सॉरी परांजपे ह्या एकांकिकेचा पहिला प्रयोग पुरुषोत्तम करंडक २०१७ मध्ये सादर झाला. ह्या नाटकाचं लेखन चिन्मय देव ह्याने केलं असून दिग्दर्शन ऋषी मनोहर ह्याने केलं आहे.…
घरच्यांसोबत ३ तास धमाल मनोरंजन अनुभवता यावं, असे कार्यक्रम दूरदर्शनवर आजकाल फार क्वचित पाहायला मिळतात. शिव्यागाळ, अश्लील दृश्य यांचा तर बरेच वेळा मारा केला जातोय प्रेक्षकांवर! अशातच, प्रेक्षकांना तुफान हसवणारं आणि एक छानसा संदेश देऊन जाणारं वेद प्रोडक्शन हाऊसचं संतोष पवार लिखित-दिग्दर्शित ‘हीच तर फॅमिलीची गंमत आहे’ हे हलकं-फुलकं नाटक सध्या रंगभूमीवर खूप गाजतंय. आनंदाची बातमी अशी की, १६ जुलै रोजी हे नाटक सुवर्णमहोत्सवी प्रयोग सादर करणार आहे. यशस्वी ५० प्रयोगांचा टप्पा गाठल्यामुळे नाटकातील कलाकार अतिशय खुश आहेत. तसेच ते मायबाप रसिक प्रेक्षकांचे आभार व्यक्त करण्यासाठी आतुरही आहेत. हा ५० वा प्रयोग १६ जुलै रोजी ४ वाजता बोरिवली येथील प्रबोधनकार…
काही दिवसांपूर्वी आम्ही अभिनय, कल्याण आयोजित ‘अभिनय प्रमाणपत्र अभ्यासक्रम’ या उपक्रमाबद्दल तुम्हाला माहिती दिली होती. तज्ज्ञ मार्गदर्शकांच्या मार्गदर्शनाखाली हा संपूर्ण अभ्यासक्रम विकसित केला गेला होता. तुम्हाला अद्याप या अभ्यासक्रमाबद्दल माहिती नसेल तर पुढील लिंकला नक्की भेट द्या. कारण, लवकरच अभिनय प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचा द्वितीय वर्ग सुरू होणार आहे. अभिनय, कल्याण आयोजित अभिनय प्रमाणपत्र अभ्यासक्रम — अभिनयाचे शास्त्रीय शिक्षण खुशखबर अशी की या अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्गात तयार झालेल्या कलाकारांचं जगदीश पवार लिखित आणि अभिजीत झुंजारराव दिग्दर्शित ‘साम्राज्यम्’ हे नाटक लवकरच तुमच्या भेटीस येत आहे. अभिनय, कल्याण निर्मित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ललित कला केंद्र गुरूकुल प्रकाशित आणि केशव गोरे स्मारक आयोजित ‘साम्राज्यम्’…
बऱ्याच दिवसांपासून कार्यान्वित असलेला आणि नियोजनबद्ध केलेला आनंदयात्री या मोठ्या फेसबुक समूहाचा स्नेहसंमेलन GTG अर्थात गेट टुगेदर सोहळा १९ जून २०२२ रोजी ठाण्यात ब्राह्मण सेवा संघाच्या हॉल मध्ये भरगच्च उपस्थितीत अतिशय दिमाखदारपणे संपन्न झाला. साधारणपणे गेल्या एक महिना आधीपासून आनंदयात्री ठाणे विभागात असलेल्या आयोजक टीम मधील प्रत्येकानेच हा सोहळा यशस्वी करण्यासाठी खूप धडपड व मेहनत घेतली आहे. लॉकडाऊन मध्ये सुरू झालेल्या आनंदयात्री फेसबुक ग्रुपने महाराष्ट्रांतील तमाम उत्साही, हौशी, हुशार मंडळींना एकत्र आणलं आहे. फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राबाहेर व विदेशातून सुद्धा अनेक मराठी मंडळी या समूहाचा हिस्सा बनली. लॉकडाऊनपासून ते आजपर्यंतच्या या एका मोठ्या कालखंडात आनंदयात्री समूहाने AYPL म्हणजेच आनंदयात्री प्रीमियर…
क्लेअर डॉवी लिखित ‘why is jhon lennon wearing a skirt?’ या नाटकाचे अनुसर्जन म्हणजेच ‘शक्तीमान ने स्कर्ट का घातलाय?’ हे तेजस कुलकर्णी दिग्दर्शित एकलनाट्य आपल्या भेटीसाठी सज्ज झाले आहे. समाजात स्त्री अथवा पुरुष या दोन लिंगांपैकी एखादं लिंग स्वीकारणं प्रत्येक मनुष्याला अनिवार्य आहे. याव्यतिरिक्त काही भावना त्याने व्यक्त केली अथवा लक्षणं त्याने दर्शविली तर त्याला समाजमान्यता मिळत नाही. याच विषयाला अनुसरून समाजाच्या लिंगरचनेकडे बघण्याच्या निरर्थक स्वभावाबद्दल सडेतोड भाष्य करणारं हे नाटक आहे. भाग्यश्री पवार ही या नाटकातील अभिनेत्री आहे. ‘शक्तीमान ने स्कर्ट का घातलाय?’ हे नाटक क्लेअर डॉवीच्या why is jhon lennon wearing a skirt? या नाटकाचे अनुसर्जन. लिंगअपेक्षा (Gender…
फार क्वचित नाटकं आपल्याला संवाद, वाक्यरचना, शृंगार, नेपथ्य या सगळ्यापलीकडे जाऊन एक निखळ नाट्यानुभव देऊन जातात. नाटकघर, पुणे निर्मित, रामू रामनाथन लिखित आणि अमर देवगांवकर अनुवादित ‘शब्दांची रोजनिशी’ हेदेखील याच धाटणीतील एक अनोखं नाटक! आनंदाची बातमी अशी की या नाटकाचा सुवर्णमहोत्सवी प्रयोग १२ जून रोजी, औरंगाबाद येथे सादर होणार आहे. अतुल पेठे यांनी या नाटकाच्या दिग्दर्शनाची व प्रकाशयोजनेची धुरा सांभाळली आहे. या नाटकात दोन पात्रं आहेत. अतुल पेठे आणि केतकी थत्ते या बहुगुणी कलाकारांनी दोन्ही व्यक्तिरेखा अतिशय सुंदर साकारल्या आहेत. या नाटकाबद्दल सांगताना अतिशय मिश्किलपणे अतुल पेठे म्हणतात की, “या नाटकात दोन कथा आहेत. जगातील कुठल्याही भाषेत असतात तशा त्या…