Author: गायत्री देवरुखकर

नाटक ही एक लोकप्रिय आणि मानाची कला मानली जाते. महाराष्ट्रातील रसिक मायबाप प्रेक्षकांच्या आयुष्यात नाटकासाठी एक वेगळी जागा कोरली आहे. वाढत्या लोकप्रियतेसोबत ही कला व्यवसाय म्हणूनही नावारुपाला आला आहे. व्यावसायिक नाटकांमधून कितीतरी कलाकारांचा उदर्निरवाह होत आहे. एकीकडे मराठी नाटकं मोठी होत आहेत आणि दुसरीकडे नाट्यगृहे मात्र अजूनही खराब अवस्थेत आहेत. काल पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिरात भरलेल्या सर्वसाधारण सभेत अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी आमदार शिरोळे यांच्या समोर परत या सर्व तक्रारींचा पाढा वाचून दाखवला. प्रशांत दामले हे त्यांच्या परखड स्वभावासाठी ओळखले जातात. त्यांनी स्पष्टपणे विचारलं की, ‘नाट्यगृह नूतनीकरण होत असताना आवश्यक गोष्टीकडे दुर्लक्ष कसं केलं जातं?’ एकाच…

Read More

सध्या नाट्यप्रेमींमध्ये स्पर्धात्मक मौसम बहरला आहे. स्पर्धा म्हणजे प्रत्येक रंगकर्मीचा जिव्हाळ्याचा विषय! त्यातही एकांकिका स्पर्धा म्हणजे वेगळीच धमाल! स्पर्धेआधीच्या तालमीचे दिवस एक वेगळीच ऊर्जा देऊन जातात. काही नावाजलेल्या स्पर्धांपैकी एक महत्त्वाची स्पर्धा म्हणजे ‘कल्पना एक आविष्कार अनेक’! ‘नाट्यदर्पण’ या संस्थेने सुरू केलेली ही स्पर्धा ‘अस्तित्व’ संस्थेने पुनर्जीवित केली. ‘अस्तित्व’ आणि ‘बेस्ट कला आणि क्रीडा मंडळ’ यांच्या संयुक्त विद्यमाने याही वर्षी ‘कल्पना एक आविष्कार अनेक’ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. Kalpana Ek Avishkar Anek 2024 – Ekankika Competition यंदाचे या स्पर्धेचे २१ वे वर्ष आहे. मान्यवरांनी सुचविलेल्या विषयावर आधारित एकांकिका लिहून ती सादर करणे, ही या स्पर्धेची सर्वसाधारण संकल्पना आहे.…

Read More

अभिनेता-अभिनेत्री यांना आपण त्यांच्या चांगल्या-वाईट कलाकृतीने ओळखतो. दिग्दर्शक या कलाकृतींना वळण देतात. तांत्रिक बाजू भक्कम करत त्या कलाकृतीच्या रुपात अधिकच भर पडत जाते. पण, एखादी कलाकृती घडण्याची प्रक्रिया सुरू होते ती लेखकापासून! लेखक जे लिहितो तेच आपल्या डोळ्यासमोर सादरीकरणाच्या स्वरुपात जिवंत उभं राहतं. याच लेखकाच्या अंगीभूत असलेल्या लेखन कलेच्या अस्मितेवर आणि पर्यायाने त्याच्या ‘कलाकार’ असण्यावरच सांस्कृतिक कार्य संचालनालकडून प्रश्नचिन्ह उभं करण्यात आलेलं आहे. एका लेखकाला म्हाडाच्या सोडतीमध्ये ‘कलाकार’ कोट्यातून घर लागलं. परंतु, पुढील प्रक्रिया पूर्ण करताना त्यांना एका विचित्र पेचात अडकविण्यात येत आहे. प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडे ‘कलाकार प्रमाणपत्र’ मागितले असता, ‘लेखक हे कलाकार नाहीत’, असे खळबळजनक उत्तर…

Read More

महाराष्ट्रातील कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृहाला गुरुवारी रात्री साधारण ११ च्या सुमारास भीषण आग लागली आहे. आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार सायंकाळी नाट्यगृहात एक कार्यक्रम पार पडला. त्यानंतर, संगीतसूर्य नटसम्राट केशवराव भोसले यांच्या १३४ व्या जयंती दिनानिमित्त (जो ९ ऑगस्ट रोजी साजरा होणार होता) आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाची पूर्वतयारी करुन रंगकर्मी नाट्यगृहातून बाहेर पडले होते. अपघात प्रसंगी नाट्यगृह रिक्त असल्यामुळे कोणतीही दुखापत झाल्याचे वृत्त नाही. परंतु कार्यक्रमासाठी आणलेल्या सामग्रीचे आणि एकंदर नाट्यगृहाचे अतोनात नुकसान झाल्याचे निदर्शनास येत आहे. Note: This is a developing story… Fire at Keshavrao Bhosale Natyagruha in Maharashtra’s Kolhapur View this post on Instagram A post shared by रंगभूमी.com (@myrangabhoomi)…

Read More

एक कुटुंब जे सुखाने राहत असतं. आई, वडील, मुलगा, मुलगी! अचानक कोरोनाची लाट पसरते आणि या घराचा आधारस्तंभ घेऊन जाते. या आणि अशा प्रकारच्या कितीतरी घटना आपण कोरोना काळात ऐकल्या. तो काळ सगळ्यांसाठीच अत्यंत कठीण गेला. या काळात कित्येकांनी आपल्या जवळच्या व्यक्तींना गमावलं. हसत खेळत जगणाऱ्या कित्येकांचे परिवार एकाकी झाले. काहींनी या काळात आपले आई बाबा गमावले. ज्या घरांमध्ये हसण्या-खिदळण्याचे आवाज घुमायचे त्याच घरातून आक्रोशाने रडण्याचे आवाज ऐकू येत होते. जे मागे जीवित राहिले त्यांनी स्वतःला कसं सावरलं असेल असा साधा विचार केला तरी मनाला चटका बसतो. पण त्यांनी स्वतःला सावरलं. ते लढले आणि पुढे गेले. नेमकी हीच गोष्ट आहे…

Read More

नीरज शिरवईकर लिखित व विजय केंकरे दिग्दर्शित ‘अ परफेक्ट मर्डर’ हे नाटक बऱ्याच कारणांसाठी लोकप्रिय आहे. गूढ रहस्यप्रधान कथानक, कलाकारांचा उत्तम अभिनय, त्याला साजेसं दिग्दर्शन आणि उल्लेखनीय तांत्रिक कामगिरी या सगळ्याच्या जोरावर ३ फेब्रुवारी, २०२४ रोजी या नाटकाचा ३५० वा प्रयोग पार पडला. ५ ऑगस्ट रोजी, गिरगावमधील रॉयल ऑपेरा हाऊसमध्ये सादर होणाऱ्या प्रयोगात प्रेक्षकांसाठी एक छान सरप्राईझ आहे. नाटकात पूर्वीच्या मुख्य नायिकेचं म्हणजेच लेखिका व अभिनेत्री डॉ. श्वेता पेंडसे हिचं पुन:पदार्पण होणार आहे. पण एका वेगळ्या भूमिकेत! ‘अ परफेक्ट मर्डर’ नाटकाच्या पहिल्या ७० प्रयोगांमध्ये डॉ. श्वेता पेंडसे मुख्य नायिकेच्या भूमिकेत दिसल्या होत्या. त्यानंतर, आजवर प्रिया मराठे ही व्यक्तिरेखा साकारताना दिसत…

Read More

१०० वर्षांची सांस्कृतिक परंपरा लाभलेलं दामोदर नाट्यगृह नामशेष होईल की काय अशी भीती निर्माण झाली आहे. दामोदर नाट्यगृह आणि सहकारी मनोरंजन मंडळ नोव्हेंबर २०२३ पासून दामोदर नाट्यगृह वाचवण्यासाठी सोशल सर्विस लीगशी झगडा करत आहेत. परंतु, पुनर्बांधणीचे गाजर दाखवत हे नाट्यगृह जमीनदोस्त करण्याचा घाट आहे, असे लक्षात आल्याने रंगकर्मींमध्ये नाराजीचे वातावरण पसरले आहे. सहकारी मनोरंजन मंडळाने अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेकडे या प्रकरणाबद्दल दाद मागितली. नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी या प्रकरणासंबंधी पत्रकार परिषद बोलावली. त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांना २८ मे पर्यंतची मुदत देत, ‘दामोदर नाट्यगृहासंबंधी एकदाच चर्चा करुन विषय संपवावा. नाहीतर उपोषणाला बसू’, असा इशारा दिला आहे. दामोदर नाट्यगृहाच्या अस्तित्वावर…

Read More

भारतीय संस्कृती, भारतीय परंपरा, इथली नातीगोती, भाषाशैली इतकी समृद्ध आहेत की त्याचे जितके गोडवे आपण गाऊ तितके कमीच आहेत. पण आपण हे गोडवे गाऊ शकतो कारण आपल्याला आपली भारतीय संस्कृती जन्मत:च ज्ञात झाली होती. आपण ‘भारतीय’ मातीत जन्मलो. म्हणून आपण विविधतेत एकता जाणतो. विविध जातीच्या, स्वभावाच्या लोकांना आपलंसं करू शकतो. पण, भारतात जन्मलेले बरेच तरुण आज परदेशात जाऊन स्थायिक होताना दिसत आहेत. हे तरुण भारतात सहसा परतत नाहीत. अगदी वयोवृद्ध आई वडील गंभीर आजारी असतील तरीही मुलांना परदेशातून भारतात सहज परतता येत नाही. या परदेशी स्थायिक झालेल्या तरुणांना मुलं होतात तेव्हा त्या मुलांना लहानपणीपासूनच पाश्चात्य संस्कृतीची ओळख होते. भारतीय संस्कृतीचा…

Read More

‘मानाची’ संघटनेच्या, अर्थात, मालिका नाटक चित्रपट लेखक संघटनेच्या ९ व्या वर्धापन दिनानिमित्त उत्स्फूर्त एकांकिका स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेची अंतिम फेरी ६ मे, २०२४ रोजी श्री शिवाजी मंदिर, दादर येथे पार पडली. अटीतटीचा सामना झाला. अंतिम फेरीत ‘चौदा इंचाचा वनवास’ (संहिता क्रिएशन्स, मीरा रोड) आणि ‘A Tale of Two’ (BMCC, पुणे) या दोन एकांकिकांनी बाजी मारली! ‘मानाची’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या मानाची लेखक संघटनेचं ब्रीदवाक्य आहे ‘लेखकांनी लेखकांची लेखकांसाठी स्थापन केलेली संघटना’! लेखकांसाठी इतका भव्य सोहळा आयोजित करणाऱ्या या संघटनेच्या कार्यकारी समितीचे सर्वप्रथम आभार आणि कौतुक! उत्स्फूर्त एकांकिका स्पर्धेचे स्वरूप स्पर्धक संघाना देण्यात आलेल्या २० विषयांमधून दोन विषयांच्या…

Read More

‘खरा इन्स्पेक्टर मागावर’ हे नाटकाचं नाव वाचून तुम्हाला यात चोर पोलिसाचा खेळ असेल किंवा ही एखादी मर्डर मिस्टरी असेल याचा अंदाज आलाच असेल. ‘आजकल’ची प्रस्तुती असलेल्या या नाटकात खून, पोलीस आणि खुनी अशी साखळी आहे. पण, संपूर्ण घटनेकडे बघण्याची किंवा संपूर्ण घटना प्रेक्षकांना दाखविण्याची पद्धत एकदम वेगळी आहे. समीक्षकाच्या चष्म्यातून या नाटकातील रहस्य प्रेक्षकांसमोर उलगडत जातं. म्हणजे नाटक सुरू आहे आणि समीक्षकही हजर आहेत… रंगमंचावरच! Khara Inspector Magavar ‘खरा इन्स्पेक्टर मागावर’ हे नाटक टॉम स्टॉप्पार्ड नामक लेखकाच्या ‘रिअल इन्स्पेक्टर हाऊंड’ या इंग्रजी नाटकाचे भाषांतर आहे. हा इंग्रजी नाटककार त्याच्या बौधिक खोली, शब्दखेळ, विचारप्रधान पण भावनिक आणि तरीही हसवणाऱ्या अशा अनोख्या…

Read More

‘प्रिय भाई… एक कविता हवी आहे’ अशा नावाचा एक कार्यक्रम मुक्ता बर्वे सादर करत आहेत असं काही दिवसांपूर्वी कानावर आलं. भाई म्हणजे पु.ल. देशपांडे. म्हणजे, पुलंशी संबंधित काहीतरी नाट्यवाचन असावं. पण मग ‘एक कविता हवी आहे’, असं का म्हटलंय? हां! त्यांच्या आवडीच्या कवितांचं वाचन असणार. पण मग मुक्ता बर्वे? नाटकाचे दौरे, सिनेमाचं शूट संभाळून ही ती हा कार्यक्रम पण करतेय? इतका महत्वाचा का बरं असावा हा कार्यक्रम? असे अनेक तर्क मनात सतत कुतूहल निर्माण करत होते. मग हळूहळू प्रेक्षकांच्या प्रतिक्रियांचे व्हिडिओज समोर येऊ लागले. प्रेक्षकांच्या भारावून गेलेल्या त्या प्रतिक्रिया ऐकून लक्षात आलं की ही काही साधीसुधी कलाकृती नोहे! हे काहीतरी…

Read More

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे दरवर्षी गोविंद बल्लाळ देवल स्मृतिदिनाप्रीत्यर्थ आयोजित करण्यात येणारा पुरस्कार वितरण सोहळा यावर्षीही दणक्यात पर पडला. यावर्षी सोहळ्याचं प्रमुख आकर्षण होतं ते म्हणजे सोहळ्याचं स्थळ! गेले काही वर्षे बंद पडलेलं माटुंगा येथील यशवंतराव चव्हाण नाट्य संकुल या सोहळ्याच्या प्रेक्षक आणि रंगकर्मींसाठी सुरू करण्यात आले आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष आणि आपले लाडके अभिनेते प्रशांत दामले यांनी नाट्यगृहाच्या नूतनीकरणाचे काम ३० मे रोजी सुरू केल्याचे कळविले. तसेच तब्बल १४ दिवस कसोशीने पाठपुरावा करत नाट्य संकुल पुनर्जीवित करण्यासाठी १४ जून ही तारीख गाठता आली याबद्दल हर्षही याप्रसंगी व्यक्त केला. अजूनही ७०% च काम झाले आहे आणि…

Read More