Author: अभिषेक महाडिक

या ४ अंकी लेखातील दुसरा अंक तुम्ही वाचला नसेल तर येथे क्लिक करून नक्की वाचा! – भाग २काहीतरी खाड्कन पडल्याचा आवाज झाला आणि माझी तंद्री भंगली. मी त्वरेने कपडेपटाच्या खोलीतून बाहेर आलो. बाहेर येताना गडबडीत सर्व उघडलेल्या पेट्या बंद करायला मात्र विसरलो. रंगपटाच्या खोलीजवळ आल्यावर त्या हृदयाची स्पंदने मला अधिक तीव्रतेने जाणवू लागली होती. हळूच पावले टाकीत मी रंगपटाच्या खोलीत प्रवेश केला. डाव्या बाजूला मोठ्ठाले आरसे, टेबल, खुर्च्या ठेवलेल्या होत्या. मेकपचं सगळं सामान तिथेच टेबलवर अस्ताव्यस्त पडलेलं होतं. इकडे तिकडे पाहताना जमिनीवर रंगांची एक पेटी पडलेली दिसली. बहुतेक तिच्याच पडण्याचा आता आवाज झाला. ‘रंग’ म्हणजे कलाकाराचं आभूषण. ज्याच्याशिवाय तो पूर्ण…

Read More

या ४ अंकी लेखातील पहिला अंक तुम्ही वाचला नसेल तर येथे क्लिक करून नक्की वाचा! – भाग १मन कासावीस होऊ लागले होते. म्हणून आता कसेबसे नाट्यगृहाच्या खुर्चीतून उठून सवयीप्रमाणे मी विंगेत आलो. आणि पाहतो तर काय ? तिथून रंगमंचावर फक्त एक स्पॉट त्या कलाकाराच्या हृदयाला अधोरेखित करीत होता. सबंध मंचावर नेपथ्य नसूनही त्या हृदयानेच सर्व नाट्यावकाश व्यापून टाकला होता. विंगेत एरवी असणारी धावपळ नव्हती. हीच ती विंग, जिथून वाडा चिरेबंदीच्या नेपथ्याला स्पर्श करून नाटकातील कुटुंबाचा भाग झाल्यासारखे मी वावरलो होतो. हीच ती विंग, जिथे बसून पहिल्यांदाच बॅकस्टेजहून ‘शेवग्याच्या शेंगा’ नाटकाचा काही प्रवेश पाहिले होता. हीच ती विंग, जिथून युगान्तच्या शेवटच्या…

Read More

एक गोष्ट राहून राहून मनाला सलतेय. का कोणास कुणास ठावूक पण ती बोलून दाखवण्याचे धाडस माझ्यात नाहीये. सद्यस्थिती पाहता ती जर भावनेच्या भरात बोलून बसलो तर मात्र टिकेला सामोरे जावे लागेल, अशी भिती मनात गेले कित्येक दिवस घर करून आहे. आज कोरोनाच्या प्रादुर्भावाने थांबलेल्या माझ्या नेहमीच्या जीवनचक्राला तब्बल दिड ते पावणेदोन महिने झाले. ह्या दिवसांत कोरोना वाढतोय, दिवसागणिक संख्या वाढतीच दिसते आहे. पण अशा वेळी थांबलेल्या जीवनचक्रात मला दिसतो नाटकाचा पडलेला पडदा.लोकांच्या जीवन-मरणाचा प्रश्न आहे आणि तुला नाटक सुचतय ? हा प्रश्न जर तुमच्या मनात येत असेल तर तो योग्यच आहे. कारण आपल्या जीवनापुढे काहीही महत्त्वाचे नाही. पण गेले कित्येक…

Read More