Author: अभिषेक महाडिक

‘सस्पेन्स थ्रीलर’ नाटक म्हटलं की कथेसोबत कलाकारांच्या अभिनयाने प्रेक्षकांची उत्सुकता सतत शिगेला असली पाहिजे. उत्कंठावर्धक वळण, अचानक लागलेला चकवा, पात्रांच्या गतिमान हालचालींचा मागोवा ह्या सगळ्यात प्रयोगाचे ‘ते’ दोन तास कसे निघून जातात आणि आपण कसे त्या कथेचा, एक तिर्हाईत म्हणून भाग होऊन जातो ते कळतच नाही. ह्या सगळ्यात ‘शेवट’ असतो तो म्हणजे खऱ्या आरोपीचा चेहरा समोर येणे. पण आपल्याला आरोपी पहिल्या काही मिनिटांतच समजला आणि मग त्याने केलेल्या ‘परफेक्ट’ खेळीचे जर आपण साक्षीदार झालो तर एक वेगळीच मजा अनुभवायला मिळते. संपूर्ण कथेत तो कुठे चूक करतोय आणि कुठे चलाखीने, शिताफीने पोलिसांच्या हातावर तुरी देतोय, हे पाहणे म्हणजे खरे ‘थ्रीलर’ अनुभवण्यासारखे…

Read More

‘Love’ In Relationship — मी, स्वरा आणि ते दोघं! आपल्यावर मनापासून निस्वार्थी प्रेम करणारं माणूस सापडायला मोठं भाग्य लागतं. अशी व्यक्ती प्रत्येकाला भेटतेच असे नाही; आणि भेटलीच तरी वयाच्या कोणत्या टप्प्यात भेटेल ह्याचा नेम नाही. पण समोरच्याने आपल्यावर केलेल्या प्रेमाला ओळखून त्याचा आदर केला, तर ते नातं अधिक बहरतं. तसेच नात्यात एकमेकांना समजून घेण्याची maturity असली की, ते तुटण्याचा प्रश्नच नसतो. ‘मी, स्वरा आणि ते दोघं’ हे नात्यांकडे आणि पर्यायाने आपल्या जोडीदाराकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन देणारे नवेकोरे नाटक रंगभूमीवर दाखल झाले आहे. Me Swara Aani Te Dogha Video https://www.youtube.com/watch?v=_i-K_mZC5w0 Me Swara Aani Te Dogha Natak Synopsis स्वरा (रश्मी अनपट)…

Read More

शुद्धता गॅरंटेड… अर्थात पाणी — सुमारे दीड तास खिळवून ठेवणारा एकपात्री दीर्घांक मराठी रंगभूमीवर नेहमीच निरनिराळे प्रयोग होत असतात. कलावंतांची सृजनशीलता त्यांच्याकरवी रंगभूमीची सेवा घडवत असते. मग त्यासाठी प्रत्येक वेळी भव्य नेपथ्य, अनेक व्यक्तीरेखा असणे गरजेचे असतेच असे नाही. कलाकाराची नाटकाबद्दलची समज, अभ्यास आणि उत्तम देहबोली ‘एकपात्री’ अभिनयातूनही दमदार प्रयोग रंगवू शकते. याचेच उदाहरण म्हणजे रंगकर्मी प्रमोद शेलार यांचा एकपात्री दिर्घांक ‘शुद्धता गॅरंटेड… अर्थात पाणी’. साधारण २०१७च्या सुमारास ‘कल्पना एक, आविष्कार अनेक’ ह्या एकांकिका स्पर्धेत जेष्ठ नाटककार महेश एलकुंचवार यांनी सुचवलेल्या ‘कृपा’ ह्या विषयाअंतर्गत एक एकांकिका सादर झालेली त्याच एकांकिकेचा हा दिर्घांक. विशेष म्हणजे प्रमोद शेलार यांनी एकांकिकेचा दिर्घांक करताना…

Read More

व्हॅक्यूम क्लीनर – मनोरंजन आणि एनर्जीचा ‘४४० वोल्ट’! हल्लीच्या जमान्यात नवरा-बायकोला प्रोफेशनल आयुष्यासमोर पर्सनल आयुष्य तसे कमीच मिळते. त्यात नवरा कमावता आणि बायको गृहिणी असेल तर संसाराची समीकरणे नव्याने तयार होतात. आपल्या बायकोला पिरीयड काळात काय त्रास होत असेल ? किंवा आपला नवरा ऑफिसात चौदा-पंधरा तास ड्युटी करून आल्यावर त्याची मन:स्थिती कशी असेल ? असा एकमेकांबद्दल विचार करणारी जोडपी दुर्मिळच. संसाराच्या रामरगाड्यात त्यांना एकमेकांसाठी ही काळजी वाटत असेल तर ठीक, परंतु जर दोघांमधील एक जरी त्याचा विचार करत नसेल तर नात्यात तेढ निर्माण होऊ लागते. त्यामुळे नवऱ्याने बायकोला आणि बायकोने नवऱ्याला त्यांच्या-त्यांच्या लाइफस्टाइल सकट समजून घ्यायला हवेच. याविषयी जर कोणी…

Read More

सुखी संसाराचा मूलमंत्र ‘तू म्हणशील तसं’ नवरा बायको जोवर मित्रमैत्रिण किंवा प्रियकर – प्रेयसी असतात तोवर त्यांच्यातील Understanding एका वेगळ्याच Level वर असते. सुख-दु:ख, रुसवे-फुगवे, गैरसमज हे सगळच प्रेमाने सोडवलं जातं. पण अनेकदा लग्न झाल्यावर गोष्टी बदलतात. कधीकाळी प्रियकराचा आवडणारा स्वभाव अचानक आवडेनासा होतो, तर कधीतरी प्रेयसीची असलेली एखादी जुनी सवय अचानकच खटकायला लागते. लग्नानंतर हेच खटके टाळण्यासाठी आणि संसाराची गाडी रुळावर ठेवण्यासाठी दोघांपैकी एकाला तरी म्हणावच लागतं – ‘तू म्हणशील तसं’. Tu Mhanshil Tasa Marathi Natak Review गौरव कुलकर्णी आणि आदिती कुलकर्णी हे दोघेही मित्र मैत्रीण, मग प्रियकर प्रेयसी असा नात्याचा प्रवास करून आता दीड वर्षे एकत्र नांदणारे नवरा…

Read More

विस्कटलेली नाती नव्याने सावरणारा ‘हरवलेल्या पत्त्यांचा बंगला’ शाळेत असताना आईवर चार ओळी लिहायला सांगितल्या असता कितीतरी वेळ काय लिहावे, असा प्रश्न पडत असे. आता मोठे झाल्यावर आईबद्दल लिहायला-बोलायला विचारल्यावर शब्दच अपुरे पडतात. आई म्हणजे फक्त माझीच आई नव्हे; आपल्या प्रत्येकाच्या बाबतीत असंच घडत असणार, हे नक्की. आजवर मराठी रंगभूमीवर किंवा एकंदर कलेच्या प्रत्येक विभागात आई आणि तिचे इतरांसोबतचे नातेसंबंध यावर भाष्य करणाऱ्या कलाकृती सादर झाल्या. पण एखादी लेखन स्पर्धा आयोजित केली जावी आणि त्यात येणाऱ्या कितीतरी संहितांमधून चाळण होत होत एक संहीता निवडली जावी, व त्याला पहिल्या क्रमांकाचे बक्षीस मिळून आज त्याचे ‘हरवलेल्या पत्त्यांचा बंगला’ नावाचे दर्जेदार मराठी नाटक व्हावे.…

Read More

खेळ नवा रंगेल गेलं दिड वर्षं आपण नाट्यरसिक ज्या दिवसाची वाट पाहत होतो, तो दिवस आज अखेर उगवला आहे. मार्च २०२० मधे कोरोनामुळे संपूर्ण जगालाचा ब्रेक लागलेला. त्या नाटकाचा पडदाही अनिश्चित काळासाठी पडला होता. डिसेंबर महिन्यात पुन्हा रंगभूमी तग धरू लागली पण दुसऱ्या लाटेने एप्रिल २०२१ मधे कोरोनाने पुन्हा डोकं वरं काढलं. पण आता तब्बल साडेसहा महिन्यांच्या विरहानंतर रंगभूमी आजपासून पुन्हा सज्ज होतेय. गेल्या दिड वर्षांत रंगकर्मी विविध अडचणींचा सामना करून संसाराच्या अर्थचक्राचा प्रयोग रंगवत होते. अनेक आघाड्यांवर लढत होते. त्यांना आपल्याच ‘रंगभूमी’च्या कुटुंबातून मदतही मिळाली होती. पण तरीही आस लागली होती नाटक सुरू होण्याची. अखेर आज २२ ऑक्टोबरपासून राज्य…

Read More

महाराष्ट्राला लोकसाहित्याचा एक मोठा वारसा लाभला आहे. त्यातीलच एक महत्त्वाचे नाव म्हणजे लोकशाहीर विठ्ठल उमप. आजवर १००० हून अधिक लोकगीते, अनेक कोळी गीते, भीम गीते त्यांनी रचली आणि गायली आहेत. त्यांच्या ‘जांभूळ आख्यान’ या गाजलेल्या नाटकाचे आजवर ५०० हून अधिक प्रयोग झाले आहेत. महाराष्ट्राला लाभलेल्या अशा थोर व्यक्तिमत्त्वाची यंदा १५ जुलै, २०२१ रोजी ९० वी जयंती आहे. त्यांच्या नावे सुरु असलेल्या ‘विठ्ठल उमप फाउंडेशन’ मार्फत आजवर अनेक सामाजिक उपक्रम राबविले गेले आहेत. यंदा त्यांचे पुत्र श्री. नंदेश उमप यांनी त्यांच्या जयंती निमित्त महाराष्ट्र शिरोमणी लोकशाहीर विठ्ठल उमप थिएटर ह्या संस्थेमार्फत ‘स्वरविठ्ठल नादविठ्ठल’ नावे शाहीरांनी रचलेल्या व गायलेल्या लोकगीतांची ‘ऑनलाईन गीतगायन…

Read More

आधी वाचा → वाड्यात जोडलेली माणसे – लेखकाचे मनोगतवाड्यात जोडलेली माणसे – भाग १: …आणि ही ‘वहिनी’ मला माझी वाटू लागली!वाड्यात जोडलेली माणसे – भाग २: भावना पोहचत नसल्या तरी मनात प्रेम राहतेच ना!आपण धरणगावकर देशपांडे यांच्या कुटुंबाची आपल्या घराशी तुलना केली तर आपल्याही घरात तशीच अनेक मंडळी वावरत आहेत, असे कळते. आपल्या कुटुंबात आपला एखादा दादा, आपले काका किंवा अगदी आपले बाबा खूप कर्तव्यदक्ष असतात. म्हणजे सण, समारंभ, अगदी दुखवटे इत्यादी गोष्टीत त्यांचे योगदान किंवा त्या कामात त्यांचा वाटा जरा जास्तच असतो. घरातील महत्त्वाच्या कार्याना त्यांच्या मेहनतीची जोड असल्याशिवाय ती कार्ये सफलसंपन्न होत नाहीत. देशपांडेच्या वाड्यातसुद्धा अशीच एक व्यक्ती…

Read More

आधी वाचा → वाड्यात जोडलेली माणसे — प्रस्तावनावहिनी… म्हणजे घरात आईनंतर महत्त्वाची जबाबदारी पेलणारी स्त्री. धरणगावकर देशपांडे यांच्या घरातही अशीच एक वहिनी आहे. थोरला मुलगा भास्कर याची पत्नी. घरातील कर्ते म्हणजेच भास्करचे वडील तात्याजी यांच्या निधनानंतर घराची मुख्य जबाबदारी ह्या दोघांवरच आली. घरातील वडील मंडळीं बनून सर्व कार्ये यांच्याच माथ्यावर आली. ‘वाडा चिरेबंदी’ मध्ये जेव्हा प्रथम मी वहिनीला पाहिलं तेव्हा असं वाटलं कि ह्या बाईच्या हातात आता सत्ता आली आहे आणि त्यामुळे ही आता वाड्यावर हुकुमत सांगेल, आता आपणच इथे मोठे आहोत असा तोरा मिरवेल वगैरे वगैरे. किंबहुना जेव्हा सुधीर तात्याजीच्या मृत्यूपश्चात पाचव्या दिवशी वाड्यात आला तेव्हा त्यांची बहिण प्रभा…

Read More

आधी वाचा → वाड्यात जोडलेली माणसे – लेखकाचे मनोगतआधी वाचा → वाड्यात जोडलेली माणसे – भाग १ – …आणि ही ‘वहिनी’ मला माझी वाटू लागली!घरात एक आजी असली कि नातवंडाची मजा असते. आणि त्यात पणजीसुद्धा असली कि तर वेगळीच मजा. जेष्ठांकडून घरातील लहानांचे म्हणजेच नातवंडांचे आणि पतवंडांचे कोडकौतुक होणे खरंच दुर्मिळ असते. धडधाकट असलेल्या आजी-आजोबांसोबत आयुष्य सोबतीने घालवायला कोणालाही नक्कीच आवडेल. पण सतत चीडचीड करणारे एखादे आजोबा असले, किंवा सतत ओरडणारी एखादी आजी असली किंवा अगदीच एखादी आजारपणामुळे जागीच खिळलेली व्यक्ती असली तर मात्र घरात थोड्या संमिश्र भावना, स्वभाव पाहायला मिळतात. ‘वाडा चिरेबंदी’ मध्ये जेव्हा पहिल्यांदा आपली धरणगावकर देशपांडे यांच्या…

Read More

या ४ अंकी लेखातील तिसरा अंक तुम्ही वाचला नसेल तर येथे क्लिक करून नक्की वाचा! – भाग ३असं म्हणतात, तिकीट खिडकीवर नाटक ओळखलं जातं. मी आजपर्यंत जितकी नाटकं पाहिली, त्यांची तिकिटे मी माझा खजिना म्हणून संग्रही ठेवली आहेत. आज प्रत्येक तिकीट पाहताना नाटकाचं नाव, कधी पाहिलेलं, कोणाचं नाटक इत्यादी सगळ्या गोष्टी एकेक आठवण मनात ताजी करतात. इथे कधी लांबच लांब रांगा पाहिल्या, तर कधीकधी शुकशुकाट; कधी तिकिटासाठी लवकर येऊन सुद्धा ‘पुढचं’ तिकिट मिळालं नाही म्हणून झालेली निराशा आठवते तर कधी अचानकपणे पुढच्या रांगेत मध्यभागी सीट मिळाल्याचा आनंद. मध्यंतरात उठून बाहेर जात असताना प्रेक्षागृहात पाहून कायम एक विचार मनात येत असे…

Read More