To submit a review for this Marathi Natak, you need to be logged in. Please Register an account, or Log In if you already have one.
- नवनित प्रॉडक्शन्स निर्मित, रूपकथा प्रकाशित
नकळत सारे घडले • मराठी नाटक
Drama Natak
- लेखक: शेखर ढवळीकर
- दिग्दर्शक: विजय केंकरे
- कलाकार: डॉ. श्वेता पेंडसे, प्रशांत केणी, तनिषा वर्दे, आणि आनंद इंगळे
- नेपथ्य: राजन भिसे
- प्रकाश: शीतल तळपदे
- संगीत: अशोक पत्की
- निर्माते: राहुल पेठे, नितीन भालचंद्र नाईक
- सूत्रधार: दीपक जोशी
Online Ticket Booking
Natak Info
- Synopsis: फिल्मी दुनियेची स्वप्ने पाहणारा राहुल MBA चे शिक्षण घेत आहे. त्याचा मामा बटू नेने या स्वप्नांच्या आड येत असतो. या दोघांच्या मनात एकमेकांबद्दल असलेली अढी सोडविण्यासाठी समुपदेशक मिरानी या दोघांच्या आयुष्यात नकळतपणे पण येतात. राहुल च्या प्रत्येक सुख दुःखात त्याची साथ देणारी मोनिका मात्र यावेळी राहुलच्या स्वप्ना साठी त्याच्या पाठीशी उभी राहील की त्याला सत्य परिस्थिती ची जाणीव करून देईल? राहुल च्या अभिनयाचं कौतुक झाल्यामुळे त्याच्या व्यक्तिगत आयुष्यात किती बदल होतो? तो बदल बटू मामाच्या पचनी पडतो का? मामा जसं म्हणेल तस राहुल वागेल का? राहुल त्याच्या स्वप्नात मध्ये हरवून आजूबाजूला असलेले वास्तव विसरून जाईल? समुपदेशक मिरानी या दोघांचे एकमेकांबद्दल असलेले मतभेद मिटवू शकेल का? त्यासाठी पाहूया “नकळत सारे घडले”. रूपरेषा सौजन्य तिकीटालय.
Video Review
नाटकाचे पुढील प्रयोग →
- There are no upcoming मराठी नाटकं.
Related Artist Profiles
No results found.
User Submitted Ratings & Reviews
All Reviews
No Title
2 months ago
मानवी भावनांवर आधारित कथा पुन्हा पुन्हा वाचल्या आणि सादर केल्या तरीही त्या वर्तमान काळाशी सुसंगत वाटतात. २९ ऑक्टोबर २००२ रोजी पहिल्यांदा सादर करण्यात आलेलं ‘नकळत सारे घडले’ याचंच एक उदाहरण आहे.
दोन पिढ्यांमधील अंतर,विषारी पालकत्वाचा(toxic parenting)मुलांवर होणारा परिणाम आणि योग्य पद्धतीने केले तर समुपदेशन कसे उपयुक्त ठरू शकते हा या नाटकाच्या कथानकाचा गाभा आहे. नाटकातले उत्कृष्ट मोठे प्रसंग आणि जोडीला पल्लेदार संवाद प्रेक्षकांना गुंतवून ठेवतात.
“बटू नेने” ह्या विक्रम गोखले सरांनी अजरामर केलेल्या पात्राचे शिवधनुष्य आनंद इंगळे सरांनी ना फक्त पेललं आहे पण त्या पात्राला आपल्या अभिनयकौशल्याने आपलसं करून त्याला स्वतःच्या शैलीत परिणामकारकरित्या सादर केलं आहे.(रडलो मी काल नाटक पाहताना त्यात आलं सगळ 🥺❤️).
प्रोफेसर व यूथ एड सेंटरच संचालन करणार्या समुपदेशकाच्या(counselor)भूमिकेत डॉ.श्वेता पेंडसे पात्राला अपेक्षित आणि आवश्यक असलेली शांतता(calmness)आणि काही प्रसंगी दृढता प्रदान करतात. त्यांनी साकारलेली “मीरान्नी” पाहताना त्यांनी जुन्या नाटकातल्या स्वाती चिटणीस यांच्या तोडीसतोड काम केलं आहे हे मात्रं प्रकर्षाने जाणवलं.
नवोदित कलाकार प्रशांत केणी आणि तनिषा वर्दे आपल्या भूमिकांना योग्य न्याय देतात.आपल्या आवडत्या अभिनेत्रीने केलेल्या कौतुकाने भ्रामक झालेल्या मुलाच्या भूमिकेत प्रशांतच काम वाखाणण्यासारख झालं आहे.त्याचा अभिनय काही प्रसंगात विशेष खुलून आला आहे.
थोडक्यात सांगायचं झालं तर ,”नकळत सारे घडले” हे एकाच वेळी मंत्रमुग्ध करणारं आणि विचार कराला भाग पडणारं नाटक आहे ;जे मुख्य कलाकारांच्या उत्कृष्ट कामगिरीला तरुण कलाकारांनी दिलेल्या उत्तम साथीने एक अविस्मरणीय नाट्य-अनुभव प्रदान करण्यात यशस्वी ठरते.
Life
Khoop Sundar Natak
3 months ago
Nakki Baghava asa natak! saglyancha abhinay chan zala ahe.
गायत्री देवरुखकर