रंगभूमी.com चा प्रवास सुरू झाला तेव्हा नवनवीन कलाकार मंडळी आमच्याशी जोडली गेली. या कलाकार मंडळींमध्ये काही अभिनेते/अभिनेत्री होते तर काही लेखक/लेखिकाही होत्या. याच लेखकांपैकी एक महत्वाचं नाव म्हणजे राहुल हणमंत शिंदे! राहुल लिखित “मायेचा स्पर्श“, “महादू गेला“, “आभासी“, “अद(भूत) प्रकरण” अशा कितीतरी कथा तुम्ही आजवर रंगभूमी.com च्या Podcast वर किंवा YouTube चॅनेलवरही ऐकल्या असतील. या कथांचं वैशिष्टय असं आहे की सर्व कथा निरनिराळ्या धाटणीच्या आहेत. आज आम्हाला हे सांगायला खूप आनंद होत आहे की राहुलच्या अशाच विविध शैलींतील १२ कथांचा कथासंग्रह प्रकाशित झाला आहे ज्याचं नाव आहे “अज्ञात”!
अज्ञातबद्दल सांगताना राहुल म्हणतो की, “माझा अज्ञात हा पहिला स्वतंत्र कथासंग्रह स्टोरीमिरर प्रकाशनातर्फे प्रकाशित होत आहे.यातील अज्ञात,हृदयाची गोष्ट,मी आणि तो या दर्जेदार मासिकातील पूर्वप्रकाशित कथांना पारितोषिके मिळाली आहेतच,पण या कथांना वाचकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला होता,मिळत आहे. कथासंग्रहातील इतर बहुतांश कथा अप्रकाशित आहेत.संग्रहातील सर्व कथा आपल्याला समृद्ध करतील,खात्री वाटते.”
अज्ञात हे पुस्तक StoryMirror आणि Amazon वर विक्रीसाठी उपलब्ध आहे. पुढील लिंकवर क्लिक करून तुम्ही हे पुस्तक Online खरेदी करू शकता.
- StoryMirror – https://shop.storymirror.com/adnyat/p/16se70ecfkb7q4aul
- Amazon – https://amzn.to/3jGYbpI
आम्हाला खात्री आहे की जसं तुम्ही राहुलच्या रंगभूमी.com वरील लिखाणाला आजवर भरभरून प्रेम दिलं तसंच तुम्ही त्याच्या कथासंग्रहालाही प्रेम द्याल. तसंच, जर तुम्ही राहुलच्या रंगभूमी.com वरील कथा वाचल्या किंवा ऐकल्या नसतील तर पुढील लिंकवर क्लिक करून तुम्ही त्या सर्व कथांचा आस्वाद घेऊ शकता.
रंगभूमी.com च्या संपूर्ण टीमकडून राहुलला त्याच्या नवीन कथासंग्रहासाठी खूप खूप शुभेच्छा!