निनाद संतोष म्हैसाळकर, हे संगीतकार म्हणून रंगभूमीवर गेली १२ वर्ष कार्यरत आहेत. SIWS कॉलेज मधून बीकॉम चे शिक्षण झाले असून, त्यांनी २०१३ साली ‘साऊंड इंजिनीरिंग’ची पदवी D. A. फिल्म स्कूल येथून घेतली. या क्षेत्रातील त्यांच्या गुरूंचा, म्हणजेच ‘अजित भगत’ यांचा हात धरून त्यांनी संगीत क्षेत्रात पाऊल ठेवलं. त्यांची सध्या २ व्यावसायिक नाटकं रंगभूमीवर चालू आहेत — पाहिले न मी तुला आणि चाणक्य, ज्यासाठी यंदाचा झी गौरव पुरस्कार ही त्यांना प्राप्त आहे.