मुक्ता बर्वे या सुप्रसिद्ध रंगकर्मी म्हणून ओळखल्या जातात. २००१ साली सुयोगच्या ‘आम्हाला वेगळे व्हायचंय’ या नाटकातून त्यांचे व्यावसायिक नाटकात पदार्पण झाले. ‘देहभान’, ‘फायनल ड्रॅफ्ट’, ‘कबड्डी कबड्डी’, ‘छापा काटा’ आणि ‘कोडमंत्र’ ही त्यांची काही गाजलेली नाटकं आहेत. २००६ च्या ‘हम तो तेरे आशिक है’ या व्यावसायिक नाटकात तिने साकारलेली ‘रुकसाना साहिल’ या प्रमुख भूमिकेने प्रेक्षकांचे मन जिंकले, ज्यासाठी तिला महाराष्ट्र शासनाच्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ‘रसिका प्रॉडक्शन’ या प्रोडक्शन हाऊस अंतर्गत ती नाटकांची निर्मिती करते. सध्या तिचं प्रशांत दळवी लिखित, चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित, ‘चारचौघी‘ हे नाटक रंगभूमीवर गाजतय.