रमेश वाणी या बहुगुणी अभिनेत्याने १९९१ साली वामन केंद्रे यांच्या शिबिरातून नाट्यशिक्षण घेतलं. त्यानंतर, राज्यनाट्य स्पर्धा आणि विविध एकांकिका स्पर्धा असा त्यांचा प्रवास सुरू झाला. गेली ३० वर्षे रंगभूमीवर व्यावसायिक आणि समांतर अशा दोन्ही पातळीवर कार्यरत आहेत. त्यांना ‘गोपाळा रे गोपाळा’ आणि ‘हीच तर फॅमिलीची गंमत आहे‘ या दोन्ही नाटकांसाठी साहाय्यक अभिनेत्याचं झी अवॉर्ड मिळालं होतं. सध्या ते चं. प्र. देशपांडे लिखित, अभिजित झुंजरराव दिग्दर्शित ‘मन’ हे एकपात्री दीर्घांक (कालावधी: सलग ११० मिनिटे) करत आहेत.