सुनिल हरिश्चंद्र हे एक अनुभवी आणि बहुआयामी रंगकर्मी आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातून वाणिज्य विभागातून पदवीधर असलेले सुनिल गेल्या २६ वर्षांपासून नाट्यसृष्टीत सक्रिय आहेत. १९९७ सालापासून एकांकिकांमधून त्यांनी अभिनयाची सुरुवात केली, आणि नंतर लेखन व दिग्दर्शनातही पदार्पण केले. जगप्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक निर्मल पांडे यांच्यासोबत दोन वर्षे नाट्यअभ्यास केल्यानंतर, त्यांनी विविध नामांकित नाट्यसंस्थांसोबत काम केले. सुनिल यांनी प्रायोगिक आणि व्यावसायिक अशा दोन्ही प्रकारच्या नाटकांचे लेखन व दिग्दर्शन केले असून, मराठीबरोबरच हिंदी आणि गुजराती रंगभूमीवरही त्यांच्या कलाकृती सादर झाल्या आहेत. नाटक आणि एकांकिकांव्यतिरिक्त त्यांनी मालिका व चित्रपटांचेही लेखन केले आहे. “पाहिले न मी तुला” या व्यावसायिक नाटकाचे ते लेखक-दिग्दर्शक आहेत.