निहारिका राजदत्त या एक बहुआयामी कलाकार आहेत. त्यांनी वयाच्या ५ व्या वर्षापासून अभिनयाची सुरुवात केली असून, गेली २० वर्षे रंगभूमी आणि पडद्यावर काम करत आहेत. मुंबई विद्यापीठातून “फिल्म, टेलिव्हिजन न्यू मिडिया प्रॉडक्शन” मध्ये पदवीधर असलेल्या निहारिका यांना अभिनयासोबतच गायन, लेखन, दिग्दर्शन आणि नृत्यातही रुची आहे. त्यांनी राजश्री प्रॉडक्शनच्या “उफ! क्या जादू मोहोब्बत हैं” या चित्रपटातून आणि “महालक्ष्मी” दिनदर्शिकेतून मोठ्या व छोट्या पडद्यावर अभिनयाची सुरुवात केली. अनेक एकांकिका स्पर्धा आणि राज्य नाट्य स्पर्धेत अभिनयासाठी पारितोषिके मिळवलेल्या निहारिका यांनी नाटक, लघुपट आणि चित्रपटांसाठी लेखन आणि दिग्दर्शनही केले आहे. सध्या त्या व्यावसायिक रंगभूमीवर सक्रिय आहेत. “पाहिले न मी तुला” या व्यावसायिक नाटकासाठी त्यांनी गीते लिहिली आहेत.