विराजस गेली तेरा वर्षे रंगमंचावर आणि मोठ्या पडद्यावर अभिनय, दिग्दर्शन आणि लेखन करत आहे. व्यावसायिक आणि प्रायोगिक रंगमंचावर विविध नाटक गटांमध्ये तो सक्रिय आहे. तो थेटरॉन एंटरटेनमेंट या थिएटर ग्रुपचे सह-संस्थापक देखील आहे. या बॅनरखाली, त्यानी अनेक नाटके लिहिली, दिग्दर्शित केली आणि त्यात अभिनय केला आहे – त्यापैकी बहू प्रशंसित इंग्रजी नाटक “Anathema”, हिंदी नाटक “भंवर” आणि मराठी नाटक “मिकी” सध्या पुणे आणि मुंबईत यशस्वीपणे चालू आहेत. चिन्मय मांडलेकर लिखित आणि दिग्दर्शित ‘गालिब’ या गाजलेल्या व्यावसायिक मराठी नाटकातही विराजसने अभिनय केला आहे.

सध्या बहू चर्चित ‘वरवरचे वधू-वर’ ह्या नाटकाचा तो लेखक, दिग्दर्शक, व गीतकार आहे.