‘तू तेव्हा तशी’ या मालिकेमधून ‘नील’च्या भूमिकेत दिसणारा स्वानंद केतकर आता घराघरात पोहोचला आहे. राधाची काळजी घेणारा, तिच्यावर जिवापाड प्रेम करणारा नील कमी वेळात अगदी सहजपणे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. याच तुमच्या लाडक्या कलाकाराची ‘मुशाफिरी’ ही एकदम हटके नाट्यमैफिल सद्ध्या रंगभूमीवर प्रेक्षकांची भरपूर वाहवा मिळवतेय. येत्या २२ मार्च रोजी म्हणजेच गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर वेध प्रोडक्शन आणि कलाश्रय संयुक्त विद्यमाने सादर करीत आहेत ‘मुशाफिरी’ चा प्रयोग रवींद्र नाट्य मंदिर येथे दुपारी ४ वाजता! या नाट्यकृतीची तिकिटे आपल्याच वेबसाईटवर पुढील लिंकवर उपलब्ध आहेत.
मुशाफिरी
महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व अर्थात पु. ल. देशपांडे स्वर्गातून पळून पृथ्वीवर येतात. पृथ्वीवर भ्रमण करताना त्यांना प्रवासात एकेक करुन अंतू बर्वा, सखाराम गटणे, रावसाहेब, हरी तात्या यांसारख्या त्यांच्याच परिचयातील काही व्यक्ती (किंवा वल्ली) भेटतात आणि त्यांच्यातील संभाषणातून म्हणजेच सूत्रसंचालनातून कार्यक्रम पुढे जातो.
आहे ना हटके विषय? म्हणूनच तुम्ही या नाट्यकृतीला भेट देणं अनिवार्य आहे.
यात मुख्यतः पारंपारिक मराठी मनोरंजन गद्य प्रकार (कथा, नाट्यप्रवेश, बतावणी, एकपात्री अभिनय, लेख) आणि पद्य प्रकार (नांदी, नाट्य-संगीत, भारुड, गवळण, पोवाडा, लावणी, कविता, भावगीत, लोकगीत, अभंग) व त्यांची प्रत्येकी ७ ते ८ मिनिटांची दमदार सादरीकरणे प्रेक्षकांस पाहायला आणि ऐकायला मिळतात.
नाटकातील कलाकार, तंत्रज्ञ व टीमचे इतर सदस्य
ऋग्वेद फडके, स्वानंद केतकर, अक्षता अतुल, ऋषिकेश धामापूरकर, रंजन प्रजापती, आकांक्षा अशोक, मधुरा राऊत, रोहन देशमुख, मयुर सुकाळे, मीरा निलाखे, संदीप मिस्त्री, अद्वैत काशीकर, प्रथमेश देवरुखकर, वेदांत लेले, योगेश लोरेकर, दीपंती दिनेश, ग्रीष्मा कांबळे, शंतनू साळवी, प्रणव अभ्यंकर, सौरभ खांडेकर, विभा पवार.
आजच पुढील लिंकवर क्लिक करुन तिकीट बुक करा.
https://www.rangabhoomi.com/tickets/mushafiri/
VEDH Production
ऋग्वेद फडके वेध प्रोडक्शनचे संस्थापक असून ‘वेध प्रोडक्शन’ मुख्यतः YouTube वर सक्रीय आहे. त्यांच्या YouTube Channel वर आतापर्यंत कलादिंडी, काव्यक्त, या Series बरोबर काही Short Film ची निर्मिती केली गेली आहे.
कलाश्रय
तुम्हाला ठाऊक आहे का? स्वानंद केतकर या गुणी अभिनेत्याच्या अभिनयकौशल्याची पाळंमूळं रंगभूमीशी जोडलेली आहेत. इतकंच नाही तर स्वानंद केतकर व अक्षता आपटे यांची विविध कलागुणांना वाव देणारी संस्थादेखील आहे. या संस्थेचं नाव आहे ‘कलाश्रय’! स्वानंद केतकर आणि अक्षता आपटे लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. या संस्थेतर्फे विविध कलांशी संबंधित वर्कशॉप्स आणि ऍक्टिविटिज आयोजित केल्या जातात. ‘मुशाफिरी’ ही नाट्यकृती म्हणजे अशाच वेगवेगळया उपक्रमांपैकी एक आहे.
स्वानंद केतकर या अभिनेत्याची भेट घेऊन आपण त्याच्या आजवरच्या वाटचालीबद्दल आणि कलाश्रय या संस्थेबद्दल अधिक माहिती मिळवणारच आहोत. पण त्याआधी तुम्ही ‘मुशाफिरी’ला अवश्य भेट द्या.