aapla ghar khatara marathi natak cover

आपलं घर, अहमदनगर प्रस्तुत

खटारा

Marathi Natak • Online Ticket Booking

लेखक-दिग्दर्शक: अमोल देविदास साळवे

aapla ghar khatara marathi natak cover
Choose a Show Below

सध्याच्या काळात माणसाचं जगणं इतकं अपग्रेड झालंय की आता काही माणसं त्या जगण्याच्या शर्यतीत ‘खटारा’ बनत चाललीत. फक्त पैसे कमवण्याची गळेकापू स्पर्धा पैसे नसलेल्या माणसाला जगण्याच्या बाजारात किंमतच ठेवत नाही अशा स्पर्धेच्या केंद्रस्थानी भरडला जातोय तो ‘शेतकरी’
खटारा नाटकं शेतकऱ्यांच्या व्यथा सांगत बसत नाही. तर कठीण परिस्थितीत आपल्या मूल्यांना चिकटून राहून त्यावर कशी मात करायची हे सांगते.
नाटक हे आबा – आक्का त्यांचा परिवार आणि त्यांचा खटारा (बैलगाडी) ह्यावर बेतलेले आहे. समाजात आपल्याला मानाचं स्थान मिळावं. पाहुण्या राऊळ्यात इज्जत मिळावी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे वयात आलेल्या सुरेखाचं लग्न व्हावं. हे सगळं नं होण्यामागचं एकमेव कारण म्हणजे ‘खटारा’ असं आक्काला वाटतं रहात. त्यामुळे आक्का सुरुवातीपासूनच ‘खटारा’ विकून टाकावा आणि एखादी मोटारसायकल घ्यावी असा तगादा आबाच्या पाठी लावत असते. पण आबा हाडाचा शेतकरी त्याला आपला खटारा आणि बैलजोडी प्राणाहून प्रिय असते. कुठेतरी आबाला ह्याची पण जाणीव असते की आक्काची खटारा विकण्याची इच्छा नाहीये. पण लोकांच्या दारात असलेल्या गाड्या-घोड्या बघून त्यांची किंमत केली जाते. हे बघून नाईलाजाने ती विकावी अशी इच्छा आक्काची असते.
आबा आणि आक्काचा हा संघर्ष सुरु राहतो ह्या संघर्षात सुरेखाचं लग्न, शेतकरी म्हणुन वाट्याला आलेलं दुःख ह्याच्यापलीकडे जीवावर बेतलेली परिस्थिती आणि त्यावर केलेली मात. अशी संघर्षमय पण विनोदाची हलकीफूलकी झालर असलेली ही गोष्ट.

कलाकार :

हरिष बारस्कर
मोनिका बनकर
श्रुता भाटे
विशाल साठे
श्वेता पारखे
निरंजन केसकर
रचईता अपूर्वा
विनोद गरुड
समर्थ खळदकर
मनू शर्मा
आविष्कार ठाकूर
सई काळे
वैष्णवी लव्हाळे
स्वराज अपूर्वा

प्रकाशयोजना : अमोल साळवे
प्रकाशयोजना सहाय्यक : सोहम दायमा
संगीत : आविष्कार ठाकूर
नेपथ्य : विनोद गरुड आणि आपलं घर टीम
वेशभुषा : मोनिका बनकर
रंगभूषा : आपलं घर टीम
रंगमंच व्यवस्था : वैष्णवी लव्हाळे, निरंजन केसकर