भारताला नाट्यपरंपरेचा समृद्ध असा वारसा लाभलेला आहे. हा वारसा जोपासत, पुढील पिढीकडे सशक्तपणे संक्रमित करणे हे आपले कर्तव्य आहे. भविष्यातील पिढ्यांना उत्कृष्ट दर्जाचे नाट्य शिक्षण मिळावे यासाठी अनेक शिक्षणसंस्था कार्यरत आहेत. देशभरातील कानाकोपऱ्यात नवनवीन कलाकार उमलत असतात. परंतु, संधींची कमतरता आणि वाढती स्पर्धा या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी अभिनयाचे शास्त्रोक्त शिक्षण घेणे महत्त्वाचे आहे. देशभरातून, प्रसिद्धी व पैसा कमवण्याचे स्वप्न घेउन मुंबईत येणाऱ्या कलाकारांना असे प्रगल्भ शिक्षण मुंबई शहरातही मिळाले तर? होय, कारण क्रेसेंट थिएटर घेऊन आलंय ‘मुंबई स्कूल ऑफ ड्रामा’!
Crescent Theatre’s Mumbai School of Drama
नाटकांसाठी आणि रंगकर्मींसाठी व्यासपीठ उपलब्ध करुन देणे, या उद्देशाने क्रेसेंट थिएटर २०२१ सालापासून रंगभूमीसाठी कार्यरत आहे. क्रेसेंट थिएटरचे अध्यक्ष संतोष पाटील आणि सचिव रविंद्र वीरकर हे दोघेही ‘मुंबई स्कूल ऑफ ड्रामा’ या कार्यशाळेतून कलाकारांना उत्तम दर्जाचे शिक्षण मिळावे, यासाठी सातत्याने प्रयत्नशील असतात.
“देशात अनेक ठिकाणी नाट्य शाळा आहेत. पण, प्रत्येक शाळांमध्ये वयोमर्यादा असल्यामुळे नोकरी व्यवसाय करणाऱ्यांना नाटकाची आवड जपता येत नाही असे प्रकर्षाने जाणवले. म्हणून, नटराजाच्या कृपेने मुंबई स्कूल ऑफ ड्रामा सुरू करण्यात आले. यासाठी अनेक मान्यवरांचे मार्गदर्शन लाभले. आम्हाला या संस्थेतून कोणत्याही नफ्याची अपेक्षा नसून आम्ही फी ची रक्कम वर्षाच्या शेवटी नाटकाच्या निर्मितीसाठी वापरतो.”, असे संतोष पाटील यांनी व्यक्त केले.
Acting School in Mumbai
‘मुंबई स्कूल ऑफ ड्रामा’ या उपक्रमांतर्गत तुम्हालाही नाट्यशिक्षण घेता येणार आहे. अभिनय व नाट्यक्षेत्रात काम करण्याची इच्छा असणारे, तसेच नोकरी-व्यवसाय सांभाळून नाटकाची आवड जपणाऱ्यांकरिता, मुंबई स्कूल ऑफ ड्रामा (मुंबई नाटक शाळा) सुरु करण्यात आले. मुंबईतील विलेपार्ले येथे ही नाट्य शाळा घेतली जाते. अभिनय कला प्रमाणपत्र अभ्यासक्रम आणि नाट्य कला प्रमाणपत्र अभ्यासक्रम अशा दोन भागात या कार्यशाळेची विभागणी करण्यात आली आहे. मुंबई स्कूल ऑफ ड्रामाला तीन वर्ष झाली असून यंदा ऑगस्ट २०२४ पासून नाट्यशाळेचे चौथे वर्ष सुरू होणार आहे. या शाळेत सहभागी होण्यासाठी मर्यादित जागा आहेत. तसेच, तुमचे वय १८ वर्ष पूर्ण असेल तर नक्कीच तूम्ही या नाट्य शाळेत प्रवेश घेऊ शकता. नाट्यशास्त्र, अभिनय आणि नाटकासंबंधी शिक्षण-प्रशिक्षण घेण्यासाठी मुलाखतीच्या मध्यामातून प्रवेशप्रक्रिया पूर्ण होणार आहे.
मुंबई स्कूल ऑफ ड्रामा – अभ्यासक्रम
अभिनय कला प्रमाणपत्र अभ्यासक्रम
अभ्यासक्रमाचे स्वरूप
• नाट्य अभिनयाचे मूळ घटक
• मूक अभिनय
• लघु नाटक सादरीकरण
कालावधी: चार महीने (शनिवार-रविवार)
नाट्य कला प्रमाणपत्र अभ्यासक्रम
अभ्यासक्रमाचे स्वरुप
• नाटय अभिनयाचे मूळ घटक
• आवाजाचे तंत्र
• रंगमंच परिचय
• भारतीय नाटक-रंगभूमी परिचय
• मूक अभिनय
• नेपथ्य
• नाटक सादरीकरण
कालावधी: एक वर्ष (शनिवार-रविवार)
नाट्य परंपरेचा वारसा पुढे नेण्याची जबाबदारी आपल्या पिढीतील कलाकारांची आहे. म्हणून, आजच मुंबई स्कूल ऑफ ड्रामा (मुंबई नाटक शाळा) मध्ये सहभागी व्हा!
अधिक माहितीसाठी संपर्क: ८३६९०६६८०९ • www.mumbaischoolofdrama.com